Tropical storm Fengshen hits Philippines, kills seven, displaces thousand
Philippines Fengshen Storm : मनिला : फिलिपिन्समध्ये बुआलोई वादळ आणि भूकंपानंतर (Earthquake)आता आणखी एक मोठे संकट उभे राहिले आहे. फेंगशेन वादळाने फिलिपिन्समध्ये कहर माजवला आहे. या उष्णकटिबंधीय वादळामुळे फिलिपिन्समध्ये किमान ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वादळामुळे मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाची भीती वाढली आहे. यामुळे याचा धोका असणाऱ्या भागातून २२ हजारांहून अधिक लोकांचे स्थलांतर केले जात आहे. फिलिपिन्सच्या राष्ट्रीय हवामान विभागाने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी (१९ ऑक्टोबर) रात्री उशिरा फिलिपिन्समध्ये लुझोनहून दक्षिण चीन समुद्राच्या दिशेने निघाले आहे. यामुळे वाऱ्याचा वेग ६५ ते ८० किलोमीटर आहे.
फिलिपिन्सच्या सरकारी आपत्ती व्यवस्थापन संस्थेने सध्या लोकांच्या स्थलांतरचे कार्य सुरु केले आहे. संस्थेने ७ जणांच्या मृत्यूची पुष्ट केली आहे. तसेच फिलिपिन्सच्या मध्य कॅपिझ प्रांततील रोक्सास सिटीमध्ये देखील परिस्थिती बिकट होण्याची शक्यता वर्तवली आहे. पूर आणि भूस्खलनाचा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने बचाव आणि मदक कार्य सुरु केले आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.
At least five people have been killed and two reported missing as Tropical Storm Fengshen sweeps through the Philippines https://t.co/rb2qCSpyil pic.twitter.com/gUQxwLabYg — Al Jazeera English (@AJEnglish) October 19, 2025
आपत्ती व्यवस्थापन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुरात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल आहे. तसेच फिलिपिन्सच्या पूर्व क्वेझोन प्रांतात पिटोगोमध्ये एका घरावर झाड कोसळले आहे. यामुळे दोन लहान मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. १४ हजाराहून अधिक लोक बेघर झाले आहे. वादळ सध्या चीन समुद्रातून व्हिएतनामच्या दिशेने जात आहे. यामुळे व्हिएतनामध्ये देखील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या सप्टेंबर महिन्यात ३० तारखेला फिलिपिन्समध्ये ६.९ तीव्रतेचा भूकंप झाला होता. यामुळे फिलिपिन्सच्या सेबू प्रांतातील बोगो शहरात आणि आसपासच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला होता. अनेक गांवामध्ये भूकंपामुळे इमारती कोसळल्या होत्या. यामुळे ७२ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २०० हून अधिक लोक जखमी झाले होते.
तर या भूकंपापूर्वी बुआलोई वादळाचा देखील फिलिपिन्सला तडाखा बसला होता. ज्यामुळे प्रचंड पाऊस पडला होता. यामध्ये पूरात बुडून २० लोकांचा मृत्यू झाला होता. वादळामुळे अनेक लोक बेघर झाले होते.
Philippines Earthquake : फिलिपिन्समध्ये भूकंपाचा कहर ; मृतांचा आकडा ६० पार, बचाव कार्य सुरुच