Philippines Earthquake : फिलिपिन्समध्ये भूकंपाचा कहर ; मृतांचा आकडा ६० पार, बचाव कार्य सुरुच (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Philippines Earthquake Update : मनिला : फिलिपिन्समध्ये मंगळवारी (३० सप्टेंबर) झालेल्या भूकंपाने (Earthquake) हाहा:कार माजवला आहे. यामुळे मध्य फिलिपिन्समध्ये मोठे नुकसान झाले आहे. अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. सध्या बचाव कार्य सुरु आहे. फिलिपिन्समध्ये झालेल्या भूकंपामुळे ७२ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
३० सप्टेंबर रोजी फिलिपिन्समध्ये ६.९ तीव्रतेचा भूकंप झाला होता. यामुळे फिलिपिन्सच्या सेबू प्रांतातील बोगो शहरात आणि आसपासच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला होता. अनेक गांवामध्ये भूकंपामुळे इमारती कोसळल्या होत्या. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले आहते. लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु असून मृतदेहांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. शिवाय भूकंपाच्या दोन दिवस आधीच बुआलोई वादळामुळे फिलिपिन्समध्ये प्रचंड विध्वंस झाला होता. यामुळे २० लोकांचा मृत्यू झाला होता. सध्या यामुळे मुसधार पाऊस आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना वाचवण्यात अडथळा येते आहे.
पुतिनचा डबल गेम? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानला करणार ‘ही’ मोठी मदत
लोकांमध्ये घबराटीचे वातावरण
फिलिपिन्सच्या इन्स्टिट्यूट ऑफ ज्वालामुखी आणि भूकंपाशास्त्र संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्सुनामीचाही इशारा जारी करण्यात आला आहे. यामुळे लोकांना किनारी भागांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. सध्या लोकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण आहे. लोकांनी घरी परतण्यासही नकार दिला आहे. भूकंपग्रस्त शहरे आणि गावातील शाळा, सरकारी कार्यालये बंद करण्यात आली आहेत.
फिलिपिन्स हा जगातील सर्वाधिक आपत्तीग्रस्त देशांपैकी एक आहे. फिलिपिन्स हा पॅसिफिक महासागराच्या रिंग ऑफ फायवर स्थित आहे. यामुळे फिलिपिन्समध्ये सतत भूकंप होत असतात. दरवर्षी फिलिपिन्समध्ये चक्रीवादळे, भूकंप सतत होत असतात. यामुळे येथील लोकांमध्ये सध्या प्रचंड भीतीचे वातावर आहे. लोक आपला जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धावत आहे.
प्रश्न १. फिलिपिन्समध्ये किती रिश्टर स्केलचा भूकंप झाला?
फिलिपिन्समध्ये ६.७ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला आहे.
प्रश्न २. फिलिपिन्समध्ये भूकंपामुळे किती जीवितहानी झाली आहे?
फिलिपिन्समध्ये भूकंपामुळे ७२ लोकांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यात व्यक्त केली जात आहे.
प्रश्न ३. फिलिपाइन्समध्ये भूकंप का होत असतात?
फिलिपिन्स हा पॅसिफिक महासागराच्या रिंग ऑफ फायवर स्थित आहे, यामुळे या भागात सतत भूकंप होत असतात.