
trump and epstein news
Jeffery Epstine and Donald Trump Files : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना सतत चर्चेत राहण्याची सवय आहे. पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे. पण यावेळी मात्र ते मोठ्या वादात सापडले आहेत. जेफ्री एपस्टाईन प्रकरणाशी त्यांचे पुन्हा एकदा नाव जोडण्यात आले आहे. यामुळे अमेरिकेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
ट्रम्प-मस्क वादामुळे चर्चेत आलेलं एपस्टिन प्रकरण नेमकं काय? एलॉनचे आरोप किती गंभीर? जाणून घ्या
बुधवारी (१२ नोव्हेंबर) एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित काही कागपत्रे सार्वजनिक करण्यात आली. यानंतर ट्रम्प मोठ्या पेचात पडले. डेमोक्रॅट्स पक्षाने ई-मेलद्वारे ही कागदपत्रे प्रसिद्ध केली. या पत्रांमध्ये आरोप करण्यात आला आहे की, लैगिंक गुन्हेगा एपस्टाईन यांनी ट्रम्प त्यांच्या संपर्कात असल्याचा आणि अगदी जवळचा संबंध असल्याचा दावा केला होता. अनेक वेळा दोघांची भेट झाली होती.
सध्या या ईमेलमुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. परंतु व्हाइट हाऊने सर्व दावे तातडीने फेटाळून लावले आहे. व्हाइट हाऊसन या दाव्यांना केवळ राजकीय खेळ म्हटले आहे. व्हाइट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी जेफ्री प्रकरणाशी संबंधित नव्या खुलाशांवर एक निवदेन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा जेफ्री एपस्टाइन प्रकरणाशी कोणताही संबंध नाही.
त्यांची प्रतिष्ठा खराब करण्याच्या हेतून हे ई-मेल पाठवण्यात आले आहे. पण लेविट यांनी मान्य केले की, एक महिलेसोबत ट्रम्प यांनी अनेक तास टाईम स्पेंड केला होता, ज्याचा जेफ्रीशी संबंध होता. लेविट यांनी म्हटले की, ट्रम्प यांनी जेफ्रीच्या गुन्ह्यांबद्दल समजताच त्यांना फ्लोरिडा क्लबमधून काढून टाकले होते. जेफ्रीचे सत्य समोर येताच अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्यापासून दूरी बनवली होती.
हा वाद २०११ चा आहे. एपस्टाईनने हे ई-मेल घिसलेन मॅक्सवेलला पाठवले होते. मॅक्सवेल जेफ्रीची जवळती सहकारी होती. तिच्यावरही लैंगिक तस्करीचा आरोप आहे. तसेच ईमेलमध्ये एपस्टाइने ट्रम्प यांनी एका महिलेसोबत त्याच्या घरी वेळ घालवल्याचा जो दावा करण्यात आला होता, त्या महिलेची ओळख व्हर्जिनिया ग्रिफे म्हणून नंतर ओळख पटवण्यात आली होती.
व्हर्जिनिया ग्रिफे हिनेच जेफ्री एपस्टाईनवर तिला लैंगिक शोषणात अडकवल्याचा आरोप केला होता. २०१९ मध्ये तिने एका मुलाखतीदरम्यान उघड केले होते. यामध्ये ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू आणि फ्रेंच मॉडेलिंग एजंट जीन-ल्यूक ब्रुनेल यांचा देखील समावेश होता. तिच्या या दाव्याने जगभरात खळबळ उडाली होती. सध्या डोनाल्ड ट्रम्पशी संबंधित खुलाशांमुळे अमेरिकेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. डेमोक्रॅट्सने ट्रम्पविरोधात महत्त्वाचे पुरावे असल्याचा दावा करत आहे. सध्या हा वाद पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
राजकुमारी डायना आणि एपस्टिन ‘Date’ वर? लंडनमधील भेटीचा दावा पुन्हा चर्चेत