Trump claims PM Modi agrred to stop buying russian oil
Donald Trump on Russian Oil : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशियन तेल खरेदीवरुन पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधला आहे. ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.
ट्रम्प यांनी दावा केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांना रशियाकडून तेल खरेदी न करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी भारताच्या या आश्वासनाला रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) थांबवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून वर्णन केले आहे. मात्र, अद्याप भारताकडून ट्रम्प यांच्या दाव्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
व्हाइट हाउसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी भारत आणि रशियाच्या तेल खरेदीवर वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, मी पंतप्रधान मोदींकडे रशियाच्या कच्च्या तेलाच्या भारताच्या आयातीवर चिंता व्यक्त केली. मी त्यांना सांगितले की, यामुळे व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांना युक्रेन युद्धात भारताकडून निधी पुरवला जात आहे. यामुळे मी त्यांच्यावर नाराज असल्याचे त्यांना सांगितले.
ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, पंतप्रधान मोदींनी मला आश्वासन दिले आहे की, भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाहीत. ट्रम्प यांच्या मते हे युक्रेन युद्ध संपवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोदींना चांगले मित्र संबोधत, भारत अमेरिकेचा विश्वासार्ह भागीदार आहे.
याशिवाय ट्रम्प यांनी चीनलाही असेच सांगावे लागेल असे म्हटले. त्यांनी दावा केला की, मध्य पूर्वेतील गाझा युद्ध थांबवण्यापेक्षा चीनशी संवाद साधणे सोपे असेल.
ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिका पाश्चात्य देशांना रशियावर निर्बंध लादण्याचा दबाव वाढवत आहे. ट्रम्प यांच्या मते, भारताच्या तेल खरेदीमुळे युक्रेन युद्धाला हातभार लागत आहे. यामुळे १,५०,००० लोकांनी प्राण गमावले आहेत. हे युद्ध थांबवणे आता आवश्यक असून मी त्यासाठी प्रयत्न करेन. ट्रम्प यांनी यापूर्वीही अनेक वेळा असे दावे केले आहेत.
प्रश्न १. ट्रम्प यांनी भारताबद्दल काय दावा केला?
ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार असल्याचे पुन्हा एकदा दावा केला आहे.
प्रश्न २. ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताने काय प्रतिक्रिया दिली?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याच्य दाव्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
प्रश्न ३. ट्रम्प यांच्या मते भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवले तर काय होईल?
ट्रम्प यांच्या मते भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली तर युक्रेन युद्धात मॉस्कोला मिळणारा निधी बंद होईल, ज्यामुळे व्लादिमिर पुतिन युद्ध थांबवण्यास भाग पडतील.
जागतिक समीकरण बदलतंय! अमेरिकेचा पासपोर्ट जगाच्या टॉप १० यादीतून बाहेर तर भारताने उंचावले स्थान