Trump Condemns on Murder on Indian-Origin Man in Cuba
America News in Marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेत एका भारतीय नागरिकाची निर्घृण हत्या करण्यता आली आहे. त्याचे मुंडके कुऱ्हाडीने कापण्यात आले आहे. ही घटना १० सप्टेंबर रोजी क्यूबामध्ये घडली असून या घटनेने भारतासह अमेरिका देखील हादरला आहे. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, टेक्सासच्या डलासमधील नागमल्लैय्या चंद्र यांची भयानकपणे हत्या करण्यात आली.
नागमल्लैय्य एक आदरणीय व्यक्ती होते असेही त्यांनी म्हटले. मिळालेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबर रोजी ते ऑफिसमधून घरी जात असताना त्यांच्यावर वार करण्यात आला. त्यांच्या पत्नी आणि मुलासमोर त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्राणघातक हल्ला अमेरिकेत राहणाऱ्या एका बेकायदेशीर क्यूबा रहिवाशाने केला आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील वाढत्या बेकायदेशीर स्थलांतरितांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आता बेकायदेशीरपण अमेरिकेत शिरलेल्यांवर आणि गुन्हेगारांव कोणतीही दया दाखवली जाणार नाही. यासाठी आता ट्रम्प प्रशासन कठोरात ले कठोर पाऊल उचलेल आणि त्यांना गंभीर शिक्षा दिली जाईल. कोणलाही बक्षले जाणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले.
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये शरिया कायद्यावर बंदी ; मुस्लिम संघटनांमध्ये उसळली संतापाची लाट
I am aware of the terrible reports regarding the murder of Chandra Nagamallaiah, a well respected person in Dallas, Texas, who was brutally beheaded, in front of his wife and son, by an ILLEGAL ALIEN from Cuba who should have never been in our Country. This individual was…
— Trump Truth Social Posts On X (@TrumpTruthOnX) September 15, 2025
काय आहे नेमकं प्रकरण?
क्यूबाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डला,मधील मोटेलचे मॅनेजर चंद्र मौली नागमल्लैय्या आणि कर्मचारी योर्डानिस यांच्यात वाद झाला होता. एका वॉशिंग मशीन वरून दोघांमध्ये भांडणे झाली होती. नागामल्लैय्या यांनी योर्डानिस यांना तुटलेली वॉशिंग मशीन न वापरण्याचा सल्ला दिला होता. ही सूचाना योर्डासिन यांना एका कर्मचाऱ्यामार्फत देण्यात आली होती. यामुळे योर्डासिन यांना राग आला.
त्यांनी रागाच्या भरात येऊ नागामल्लैय्या यांच्यावर कुऱ्हाडीने वार करत एकामागून एक हल्ला केला. यावेळी नागामल्लेय्या पार्किंगमधूम ऑफिसमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगा देखील होती. परंतु याच वेळी योर्डासिन यांना तीव्र नागमल्लैय्या यांच्या गळ्यावर वार करत त्यांचे मुंडके कापले. सध्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे.
भारतीय उच्चायुक्तालयाने केला शोक व्यक्त
तसेच यावर भारतीय उच्चायुक्तालयाने शोक व्यक्त केला आहे. भारतीय उच्चुयक्तालयाने म्हटले आहे की, नागामल्लैय्या यांच्या हत्येबद्दल ऐकून दु:ख झाले. आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत, त्यांना सर्वतोपरी मदत करत आहोत. आरोपी डलास पोलिसांच्या ताब्यात आहे. तसेच या संपूर्ण प्रकरमावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत.