Who Is Tommy Robinson, Far-Right Activist Behind Massive London Rally
Protest against Illegal Immigration in Britain : लंडन : नेपाळ आणि फ्रान्स नंतर आता ब्रिटनमध्येही हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात हे आंदोलन सुरु आहे. शनिवारी (१३ सप्टेंबर) ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये १ लाखाहून लोक रस्त्यावर उतरले आहेत. या निदर्शनाचे नाव, ‘United The Kingdom’ असे ठेवण्यात आले आहे. याचे नेतृत्त्व स्थलांतरविरोधी नेते टॉमी रॉबिन्सन करत आहेत. यामुळे सध्या सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरु आहे. या निदर्शनांमध्ये १ लाखांहून अधिक लोक सहभागी झाले आहेत. यावेळी पोलिसांवरही निदर्शकांनी हल्ला केला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. पण कोण आहेत हे टॉमी रॉबिन्सन असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
कोण आहेत टॉमी रॉबिन्सन ?
मिळालेल्या माहितीनुसार, टॉमी रॉबिन्सन हे ४१ वर्षांचे असून त्यांचे खरे नाव स्टीफन याक्सली-लेनन असे आहे. त्यांच्यावर अनेक गुन्ह्याचे आरोप देखील आहेत. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ब्रिटनमध्ये वाढत्या इस्लामच्या स्थलांतरावर विरोध केला आहे. २००९ मध्ये टॉमी रॉबिन्सन यांनी इंग्लीश डिफेन्स लिगची स्थापना केली होती. ही एक अशी चळबळ होती ज्यामध्ये फुटबॉल संबंधित गुंडागिरी आणि हिंसक संघर्षांविरोधात आवाज उठवण्यात आला होता. रॉबिन्सन यांनी वाढत्या अतिरेकीपणाच्या कारणाने २०२३ मध्ये आपले नेतेपद सोडले आणि एक कार्यकर्ता आणि ऑनलाइ प्रचारक म्हणून काम पाहिले.
रॉबिन्सनविरोधात गुन्ह्याचे खटले दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, टॉमी रॉबिन्सन यांच्यावर अनेक गुन्हेगारीचे रेकॉर्ड करण्यात आले आहे. त्यांच्यावर लोकांना बंदी बनवणे, फसवणूक करणे, हल्ला करणे आणि न्यायालयाचा अवमान यांसारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २०१८ मध्ये एका लाईव्ह स्ट्रीमिंगमुळे त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही भोगावी लागली होती. तसेच २०२४ मध्ये न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांना १८ महिने तुरुंगावासात राहावे लागले होते.
आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये चकामक
सध्या लंडनमधील परिस्थिती बिघडत चालली असून १६०० हून अधिक पोलिस आणि सुरक्षा अधिकारी तैनात करण्यात आलेले आहे. दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे आंदोलन कर्त्यांनी पोलिसांवर बाटल्या फेकल्या, लाथा मारल्या. सध्या लोकांची प्रचंड गर्दी लंडनच्या रस्त्यावर जमली असून सरकारविरोधी घोषणाबाजी सुरु आहे.
ब्रिटनमध्ये का सुरु होते आंदोलन?
ब्रिटनमध्ये दोन कारणांमुळे तीव्र निदर्शने झाली, यामध्ये एका गटाने बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात निदर्शने केली. तर दुसऱ्या गटाने रेसिझमविरोधात निदर्शने केले.
आंदोलनात काय घोषणाबाजी करण्यात आली?
आंदोलनात सराकराविरोधी घोषणाबाजी करत, बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठवा असे नारे देण्यात आले.
कोण आहेत टॉमी रॉबिन्सन?
टॉमी रॉबिन्सन हे ४१ वर्षाचे असून ते एक स्थलांतरविरोधी नेते आहे. त्यांचे खरे नाव स्टीफन याक्सली-लेनन असे आहे.