
trump deploys uss george bush aircraft carrier iran war day 8
USS George H.W. Bush deployed to Iran 2026 : अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण या युद्धाचा (US-Israel Iran War) आज आठवा दिवस असून हे युद्ध आता निर्णायक वळणावर पोहोचले आहे. इराणवर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आपली सर्वात मोठी शक्ती म्हणजेच ‘यूएसएस जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश’ ही तिसरी विमानवाहू युद्धनौका (Aircraft Carrier) इराणच्या समुद्रकिनाऱ्याकडे रवाना केली आहे. २००३ मधील इराक युद्धानंतर अमेरिकेने एकाच वेळी तीन युद्धनौका युद्धभूमीवर तैनात करण्याची ही पहिलीच वेळ आहे, ज्यामुळे युद्धाचा भडका अधिक उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘यूएसएस जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश’च्या आगमनामुळे इराणची चहूबाजूंनी कोंडी करण्याची तयारी अमेरिकेने पूर्ण केली आहे. मध्य पूर्वेत आधीच दोन विमानवाहू युद्धनौका तैनात असताना तिसऱ्या युद्धनौकेची एन्ट्री ही केवळ लष्करी हालचाल नसून तो इराणला दिलेला अंतिम इशारा मानला जात आहे. या युद्धनौकेवर डझनावारी फायटर जेट्स आणि अत्याधुनिक क्षेपणास्त्रे तैनात आहेत, जी इराणच्या अणुकेंद्र आणि लष्करी तळांना काही मिनिटांत उद्ध्वस्त करू शकतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : WorldWar3: ‘यहूदी राजवटीने मोठी चूक केली’ अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच ‘X’ अकाउंटवरून इस्रायलसाठी स्फोटक धमकी
एकीकडे अमेरिका आपली शक्ती वाढवत असताना, इराणनेही जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. जॉर्डनमध्ये अमेरिकेने तैनात केलेली अत्यंत प्रगत अशी ‘यूएस टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स’ (THAAD) यंत्रणा इराणने नष्ट केल्याचा खळबळजनक दावा केला आहे. ही यंत्रणा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यासाठी वापरली जाते. इराणने ट्रम्प प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे की, “जर हिंमत असेल तर अमेरिकन युद्धनौकांच्या संरक्षणाखाली होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल टँकर नेऊन दाखवावे.”
BIG US deploying 3rd carrier strike group near middle east 😳 USS George H.W. Bush is deploying to the eastern Mediterranean. This will be the third carrier strike group in the region — Fox News pic.twitter.com/v0emhfHy8S — Frontalforce 🇮🇳 (@FrontalForce) March 7, 2026
credit – social media and Twitter
या महायुद्धाच्या रणधुमाळीत भारताची भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इराणची ‘आयआरआयएस लावन’ (IRIS Lavan) ही युद्धनौका २८ फेब्रुवारी रोजी तांत्रिक बिघाडामुळे समुद्रात अडकली होती. इराणच्या विनंतीनंतर भारताने मानवतावादी दृष्टिकोनातून १ मार्च रोजी या जहाजाला कोची बंदरात येण्याची परवानगी दिली. ४ मार्च रोजी १८३ खलाशांसह हे जहाज कोचीमध्ये दाखल झाले. सध्या हे सर्व इराणी खलाशी भारतीय नौदलाच्या देखरेखीखाली सुरक्षित स्थळी असून जहाजाची दुरुस्ती सुरू आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Prices: ‘बाजारात तेल हवं, मग भारताला साथ द्या!’अमेरिकेच्या दुटप्पी पण ‘फायदेशीर’ निर्णयाने जग अवाक; ‘या’ विधानामुळे स्पष्टता
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर एक महत्त्वाची पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “इराणने बिनशर्त आत्मसमर्पण केल्याशिवाय कोणताही करार किंवा चर्चा होणार नाही.” गेल्या वर्षीच्या १२ दिवसांच्या युद्धादरम्यानही ट्रम्प यांनी असाच इशारा दिला होता आणि त्यानंतर अवघ्या सहा दिवसांत युद्धबंदी झाली होती. त्यामुळे, आता ही तिसरी युद्धनौका आल्यानंतर इराण गुडघे टेकणार की युद्ध सहा दिवसांत संपणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Ans: इराणवर जास्तीत जास्त लष्करी दबाव निर्माण करण्यासाठी आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवर ताबा मिळवण्यासाठी अमेरिकेने ही तिसरी युद्धनौका तैनात केली आहे.
Ans: इराणच्या 'आयआरआयएस लावन' या जहाजात २८ फेब्रुवारी रोजी तांत्रिक बिघाड झाला होता. मानवतावादी कारणास्तव भारताने त्याला कोची बंदरात आश्रय आणि दुरुस्तीसाठी परवानगी दिली आहे.
Ans: ट्रम्प यांचा असा संकेत आहे की, जोपर्यंत इराण हार मानत नाही, तोपर्यंत युद्ध थांबणार नाही. जाणकारांच्या मते हे संभाव्य युद्धबंदीचे लक्षण असू शकते.