WorldWar3: 'यहूदी राजवटीने मोठी चूक केली' अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच 'X' अकाउंटवरून इस्रायलसाठी पहिली स्फोटक धमकी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Ayatollah Ali Khamenei death news March 2026 : मध्यपूर्वेतील संघर्ष आता अशा टप्प्यावर पोहोचला आहे जिथे प्रत्येक क्षण विनाशाची चाहूल देत आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांचा २८ फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेच्या(US-Israel Iran War) संयुक्त हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याची बातमी ताजी असतानाच, त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून एक अत्यंत भीतीदायक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टने केवळ इस्रायललाच नव्हे, तर संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे.
खामेनी यांच्या मृत्यूची पुष्टी होऊन सहा दिवस उलटल्यानंतर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक संदेश झळकला. यात म्हटले आहे की, “झायोनिस्ट (इस्रायली) राजवटीने एक गंभीर चूक केली आहे आणि अल्लाहच्या कृपेने, त्याचे परिणाम या राजवटीला निराश करतील.” या संदेशासोबत एक एआय-जनरेटेड प्रतिमा जोडण्यात आली आहे. या प्रतिमेत इराणचे हायपरसोनिक क्षेपणास्त्र तयार करण्यापासून ते डागण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे. शास्त्रज्ञ क्षेपणास्त्र जोडताना आणि सैनिक ते लक्ष्यावर प्रहार करण्यासाठी सज्ज असल्याचे पाहून इराण आता कोणत्याही क्षणी मोठा क्षेपणास्त्र हल्ला करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War: ‘शेवटच्या गोळीपर्यंत लढू’ इराणचे अमेरिकेला आव्हान; 100 तासांत USचे 31,000 कोटी फस्त; 6 क्षेपणास्त्र लाँचर्स उद्ध्वस्त
२८ फेब्रुवारी रोजी पहाटे अमेरिकन आणि इस्रायली सैन्याने इराणवर भीषण हवाई हल्ल्यांची मालिका सुरू केली होती. अमेरिकन सेंट्रल कमांडने दावा केला होता की पहिल्या २४ तासांत त्यांनी इराणमधील १,००० लष्करी लक्ष्यांवर बॉम्बफेक केली. यातील सर्वात मोठा तडाखा तेहरानमधील खामेनी यांच्या कार्यालयाला बसला. जेव्हा ते उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत बैठकीत होते, तेव्हा अचूक क्षेपणास्त्र डागून ते कार्यालय उद्ध्वस्त करण्यात आले. १ मार्च रोजी इराणच्या सरकारी टीव्हीने अखेर त्यांच्या निधनाची पुष्टी केली. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, खामेनी यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानाच्या ढिगाऱ्याखाली सापडला होता.
خرمشهرها در پیش است… pic.twitter.com/i4fjnMR7x3 — KHAMENEI.IR | فارسی (@Khamenei_fa) March 5, 2026
credit – social media and Twitter
खामेनी यांच्या मृत्यूनंतर ही दुसरी महत्त्वाची पोस्ट आहे. १ मार्च रोजी त्यांच्या मृत्यूच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर कुराणातील एक पवित्र श्लोक शेअर करण्यात आला होता. “विश्वासूंमध्ये ते आहेत जे अल्लाहला दिलेले वचन पूर्ण करतात,” अशा अर्थाची ती पोस्ट होती. मात्र, आता थेट युद्धाचा आणि विनाशाचा इशारा देणारी पोस्ट आल्याने हे अकाउंट आता इराणमधील कट्टरपंथी लष्करी अधिकारी किंवा रिव्होल्युशनरी गार्ड्स (IRGC) चालवत असल्याचे बोलले जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump2026: ‘आधी इराणचा गेम, मग ‘या’ देशावर नेम!’ ‘मैत्रीपूर्ण कब्जा’ करण्याच्या घोषणेने जागतिक सत्तासंतुलन निघाले ढवळून
खामेनी यांच्या हत्येनंतर इराण शांत बसलेला नाही. इराणने आधीच आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली आहेत. आता हायपरसोनिक क्षेपणास्त्राचा उल्लेख असलेली ही पोस्ट इस्रायलसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. जर इराणने खरंच या अत्याधुनिक अस्त्राचा वापर केला, तर इस्रायलचे सुरक्षा कवच (एअर डिफेन्स) त्याला रोखू शकेल का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. संपूर्ण प्रदेश सध्या एका मोठ्या ज्वालामुखीय वळणावर उभा आहे.
Ans: २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात तेहरानमधील कार्यालयावर बॉम्बफेक करण्यात आली, ज्यात खामेनी यांचा मृत्यू झाला.
Ans: त्यांच्या 'X' अकाउंटवरून "इस्रायलने मोठी चूक केली असून त्याचे परिणाम भीषण असतील" अशा आशयाची पोस्ट हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या प्रतिमेसह शेअर करण्यात आली आहे.
Ans: हे क्षेपणास्त्र आवाजाच्या वेगापेक्षा पाचपट जास्त वेगाने धावते, ज्यामुळे सध्याची कोणतीही एअर डिफेन्स सिस्टिम त्याला रोखणे अत्यंत कठीण असते.






