Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump Jr: ट्रम्प ज्युनियरचा हाय-प्रोफाइल भारत दौरा; ताजमहाल ते वनतारा आणि उदयपूरच्या शाही लग्नालाही राहणार उपस्थित

Donald Trump Jr : डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनी त्यांच्या भारत भेटीदरम्यान ताजमहाल, जामनगरमधील अंबानींच्या 'वंतारा' आणि उदयपूरमधील शाही लग्नाला हजेरी लावली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 21, 2025 | 11:29 AM
Trump Jr high-profile India tour Will also attend the royal wedding in Udaipur from the Taj Mahal to Vantara

Trump Jr high-profile India tour Will also attend the royal wedding in Udaipur from the Taj Mahal to Vantara

Follow Us
Close
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर सध्या भारताच्या हाय-प्रोफाइल प्रवासावर असून ताजमहाल, वंतारा आणि उदयपूरच्या रॉयल वेडिंगला भेट देत आहेत.
  • अनंत अंबानी यांच्या निमंत्रणावरून त्यांनी जामनगरस्थित वंतारा वन्यजीव केंद्राचा खास दौरा केला.
  • उदयपूरमध्ये आयोजित दक्षिण भारतीय व्यावसायिक कुटुंबाच्या आलिशान डेस्टिनेशन वेडिंगमध्ये ते विशेष पाहुणे म्हणून सहभागी होत आहेत.

Trump Jr high-profile India Tour : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर (Trump Jr )हे सध्या भारताच्या एका अतिशय चर्चित आणि हाय-प्रोफाइल दौऱ्यावर आले आहेत. या भेटीने केवळ भारतीय माध्यमांचेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही लक्ष वेधले आहे. त्यांच्या या खास आणि ग्लॅमरस दौऱ्याची सुरुवात ऐतिहासिक आणि जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या आग्रा येथील ताजमहालपासून झाली.

ताजमहालाचा अनुभव : इतिहासाच्या सान्निध्यात ट्रम्प ज्युनियर

आग्रा येथे पोहोचताच, कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये ट्रम्प ज्युनियर यांनी ताजमहालला भेट दिली. जवळजवळ एक तास त्यांनी या स्मारकाची भव्यता, कलात्मकता आणि इतिहासाचा अनुभव घेतला. ताजमहालसमोर असलेल्या लोकप्रिय “डायना बेंच” वर त्यांनी फोटोसुद्धा घेतला, ज्याने सोशल मीडियावर प्रचंड चर्चा निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, २०२० मध्ये त्यांच्या वडिलांनी, तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हाच मार्गदर्शक नितीन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ताजमहालाला भेट दिली होती. या दौऱ्यात अमेरिकन सुरक्षा पथक, स्थानिक पोलिस आणि CISF यांच्या तुफान सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्या होत्या.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Japan Crisis : ‘चीनने जपानला दिला मोठा धक्का…’आणि भारताची लागली लॉटरी; आता Trump tariffsचे टेन्शनही संपले

जामनगरमधील ‘वंतारा’ : अनंत अंबानींच्या स्वप्नातील प्रकल्पाचा खास दौरा

ताजमहाल भेटीनंतर त्यांचा ताफा थेट जामनगरकडे रवाना झाला, जिथे ते अनंत अंबानी आणि अंबानी परिवाराचे विशेष पाहुणे होते. या भेटीदरम्यान त्यांनी वंतारा वन्यजीव संरक्षण आणि पुनर्वसन केंद्राला भेट दिली. हे केंद्र भारतातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक वन्यजीव संवर्धन प्रकल्पांपैकी एक मानले जाते. ट्रम्प ज्युनियर यांनी वनताऱ्याचा परिसर पाहताना प्राणिसंवर्धन, पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक मूल्यांबद्दल अंबानी परिवाराचे समर्पण पाहून खूप प्रशंसा व्यक्त केली. याच ठिकाणी त्यांनी गणपती मंदिर आणि इतर पवित्र स्थळांना भेट देत पूजा-अर्चनाही केली. त्यांनी हा अनुभव “अविस्मरणीय, आध्यात्मिक आणि भारताच्या आदरातिथ्याचा अद्वितीय नमुना” असे सांगितले.

 पुढचा मुक्काम उदयपूर : रॉयल डेस्टिनेशन वेडिंगमध्ये विशेष उपस्थिती

या ग्लॅमरस दौऱ्याचा तिसरा आणि सर्वात चर्चित टप्पा आहे उदयपूर. इथे ते एका हाय-प्रोफाइल डेस्टिनेशन वेडिंगमध्ये सहभागी होणार आहेत. हे लग्न दक्षिण भारतातील मोठ्या व्यापारी राजू मंटेना यांच्या मुलाचे असून वधू अमेरिकन वंशाची आहे. दोन्ही कुटुंबांचे अमेरिकेशी व्यावसायिक आणि राजकीय संबंध असून ट्रम्प परिवाराशी जवळचे संबंध असल्यामुळे ट्रम्प ज्युनियर यांचे आगमन विशेष ठरते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Climate Summit 2025 : COP30 ब्लू झोनमध्ये भीषण आग;UN प्रमुख आणि भारतीय नेते थोडक्यात बचावले

लग्नसोहळ्याची ठिकाणे,

 सिटी पॅलेस

 जगमंदिर पॅलेस

ट्रम्प ज्युनियर लीला पॅलेस, पिचोला लेकच्या मध्यभागी असलेल्या आलिशान पॅलेसमध्ये थांबले आहेत. या शाही लग्नाला हृतिक रोशन, जॅकलिन फर्नांडिस, कृती सॅनन यांसारखे बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ही त्यांची भारताची दुसरी भेट असून पूर्वी ते २०१८ मध्ये आले होते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Donald Trump Jr भारतात का आले आहेत?

    Ans: ते हाय-प्रोफाइल खाजगी भेटीसाठी, वंतारा दौरा आणि उदयपूरच्या लग्नासाठी भारतात आले आहेत.

  • Que: ट्रम्प ज्युनियर यांनी भारतात कोणकोणत्या ठिकाणी भेट दिली?

    Ans: ताजमहाल, जामनगर वंतारा सेंटर आणि उदयपूर लग्नस्थळ.

  • Que: या लग्नाला कोणते सेलिब्रिटी उपस्थित राहणार?

    Ans: हृतिक रोशन, कृती सॅनन, जॅकलिन फर्नांडिस व इतर नामांकित व्यक्तींंची उपस्थिती अपेक्षित.

Web Title: Trump jr high profile india tour will also attend the royal wedding in udaipur from the taj mahal to vantara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 11:29 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • India Tour
  • World news

संबंधित बातम्या

डोनाल्ड ट्रम्पचा अहंकार येतो नेहमी आडवा; अमेरिकेनेही वाचावा भारताच्या कुटनीतीचा पाढा
1

डोनाल्ड ट्रम्पचा अहंकार येतो नेहमी आडवा; अमेरिकेनेही वाचावा भारताच्या कुटनीतीचा पाढा

Iran Civil War : खामेनेईंच्या सत्तेला सुरुंग! 45 जणांचा बळी आणि 2200 अटकेनंतर इराणमध्ये रक्ताचा सडा; ट्रम्पला ठरवले जबाबदार
2

Iran Civil War : खामेनेईंच्या सत्तेला सुरुंग! 45 जणांचा बळी आणि 2200 अटकेनंतर इराणमध्ये रक्ताचा सडा; ट्रम्पला ठरवले जबाबदार

Trump Tariff Impact on India: रशियन तेलावरून भारताला ५००% टॅरिफची धमकी! ट्रम्पच्या धमकीने शेअर बाजारात घसरण
3

Trump Tariff Impact on India: रशियन तेलावरून भारताला ५००% टॅरिफची धमकी! ट्रम्पच्या धमकीने शेअर बाजारात घसरण

Trump Greenland Strategy: अंतराळातून हल्ला झाल्यास ‘ग्रीनलँड’ बनेल ढाल; 75 वर्षांपासून अमेरिकन सैन्य गोठले बर्फात, वाचा सविस्तर
4

Trump Greenland Strategy: अंतराळातून हल्ला झाल्यास ‘ग्रीनलँड’ बनेल ढाल; 75 वर्षांपासून अमेरिकन सैन्य गोठले बर्फात, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.