NZ Election : न्यूझीलंडमध्ये निवडणुकीनंतरही पेच; लक्सॉन बहुमताच्या जवळ पोहोचूनही सरकार स्थापनेस विलंब का? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
न्यूझीलंडमध्ये (NZ Election) पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल अत्यंत चुरशीचे आणि नाट्यमय वळणावर पोहोचले आहेत. देशाचे विद्यमान पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सॉन (Christopher Luxon) आणि त्यांच्या मित्रपक्षांची आघाडी बहुमताच्या अगदी जवळ पोहोचली आहे. प्राथमिक आकडेवारीनुसार सत्ताधारी पक्षांना आवश्यक संख्याबळ मिळताना दिसत असले, तरी देशात तात्काळ नवीन सरकार स्थापन होणे अशक्य झाले आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे अजूनही १४% मतांची मोजणी बाकी आहे. निवडणूक आयोगाचे अंतिम चित्र स्पष्ट होईपर्यंत न्यूझीलंडमधील नव्या सरकारचे भवितव्य अधांतरी लटकले असून, नवीन सरकार स्थापन होण्यासाठी आणखी काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.
न्यूझीलंड निवडणूक आयोगाने जारी केलेल्या प्राथमिक निकालांनुसार, लक्सॉन यांची ‘नॅशनल पार्टी’ (National Party) आणि त्यांचे सहकारी पक्ष ‘एसीटी’ (ACT) व ‘न्यूझीलंड फर्स्ट’ (NZ First) हे १३१-सदस्यीय संसदेत ६७ जागांपर्यंत पोहोचताना दिसत आहेत. संसदेत स्पष्ट बहुमतासाठी ६६ जागांची आवश्यकता असून, सध्याच्या चित्रानुसार आघाडीकडे केवळ एका जागेचे अत्यंत नाजूक बहुमत आहे.
परंतु, खरी अडचण मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. एकूण मतदानापैकी सुमारे १४% मते ही ‘विशेष मते’ (Special Votes) म्हणून वर्गीकृत केली जातात. यामध्ये परदेशात राहणारे न्यूझीलंडचे नागरिक आणि स्वतःच्या मतदारसंघाबाहेर जाऊन मतदान केलेल्या लोकांच्या मतांचा समावेश असतो. न्यूझीलंडच्या राजकीय इतिहासात असा अनुभव आहे की, ही पोस्टल किंवा विशेष मते नेहमी डाव्या विचारसरणीच्या पक्षांच्या बाजूने (उदा. लेबर आणि ग्रीन पार्टी) झुकतात. जर या १४% मतांमुळे लक्सॉन यांच्या आघाडीची एकही जागा कमी झाली, तर त्यांचे बहुमत धोक्यात येऊ शकते. निवडणूक आयोग २७ नोव्हेंबर रोजी अंतिम अधिकृत निकाल जाहीर करणार आहे. तोपर्यंत लक्सॉन यांना ‘प्रभारी पंतप्रधान’ (Caretaker Prime Minister) म्हणूनच कामकाज पाहावे लागणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Horizon Europe : भारताचा ‘होरायझन युरोप’मध्ये प्रवेश निश्चित; युरोपियन युनियनसोबतच्या वाटाघाटी यशस्वी, संशोधकांसाठी सुवर्णकाळ
या निवडणुकीतील धक्कादायक घडामोडींमुळे मध्यमार्गी विचारसरणीची ‘ऑपर्च्युनिटी पार्टी’ (The Opportunities Party) अचानक राजकीय केंद्रस्थानी आली आहे. जर २७ नोव्हेंबरच्या अंतिम निकालात लक्सॉन यांच्या आघाडीचे बहुमत निसटले, तर सरकार स्थापनेसाठी ऑपर्च्युनिटी पार्टीची भूमिका अत्यंत निर्णायक ठरेल. हा पक्ष इतिहास पहिल्यांदाच संसदेत प्रवेश करत असून, त्यांनी घेतलेली भूमिका देशाचा पुढील पंतप्रधान ठरवू शकते.
विशेष म्हणजे, निवडणुकीपूर्वी पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सॉन यांनी या पक्षासोबत कोणतीही युती करण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र, बदललेल्या समीकरणांनंतर लक्सॉन यांनी आपल्या भूमिकेत लवचिकता आणली आहे. व्हिक्टोरिया विद्यापीठातील वरिष्ठ राज्यशास्त्र प्राध्यापिका मोना क्रेव्हेल यांच्या मते, ‘ऑपर्च्युनिटी पार्टी’ ही अत्यंत व्यावहारिक आणि मध्यम मार्गाने जाणारी असल्याने, सत्तेचा मार्ग सुकर करण्यासाठी लक्सॉन किंवा विरोधी लेबर पार्टीचे नेते ख्रिस हिपकिन्स (Chris Hipkins) या पक्षाशी हातमिळवणी करू शकतात.
न्यूझीलंडमध्ये १९९६ मध्ये लागू करण्यात आलेल्या मिश्र सदस्य प्रमाणशीर (MMP) निवडणूक प्रणालीनंतरची ही सर्वात अनोखी निवडणूक ठरली आहे. या प्रणालीत मतदार पक्षाला आणि स्थानिक उमेदवाराला अशी दोन मते देतात. संसदेतील ७१ जागा थेट मतदारसंघातून आणि ६० जागा पक्षांच्या एकूण मतसंख्येनुसार ठरतात. या निवडणुकीत जनता आणि मतदार अत्यंत निराश असल्याचे चित्र समोर आले आहे. देशातील आघाडीचे दोन मुख्य पक्ष नॅशनल पार्टी आणि लेबर पार्टी दोघांनाही एकूण मतदानापैकी ३०% पेक्षा कमी मते मिळाली आहेत. १९९६ नंतर या दोन्ही मुख्य पक्षांची ही आजवरची सर्वात वाईट कामगिरी मानली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Diwali : ‘ट्रम्प यांच्या हाती ‘हनुमान चालिसा…’; ओव्हल ऑफिसमधील दिवाळी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल
राजकीय विश्लेषक बेन थॉमस यांच्या मते, जनतेने मंदावलेली अर्थव्यवस्था, गगनाला भिडलेली महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवरून प्रस्थापित पक्षांना जोरदार दणका दिला आहे. नॅशनल पार्टीला मिळालेल्या कमी मतांच्या टक्केवारीमुळे, सध्याच्या अर्थमंत्री निकोला विलिस (Nicola Willis) यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना पुढील संसदेतील आपले स्थान गमवावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे. या निकालांनंतर नॅशनल पार्टीचे ज्येष्ठ नेते सायमन ब्राऊन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “हे निकाल आमच्यासाठी जितके आनंददायी आहेत, तितकेच काही बाबतीत निराशाजनकही आहेत.” न्यूझीलंडचा पुढील कारभार कोण हाकणार याचा निर्णय आता २७ नोव्हेंबरच्या अंतिम मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.
Ans: : निवडणुकीतील सुमारे १४% विशेष मतांची (Special Votes) मोजणी बाकी असून, यामुळे अंतिम संख्याबळ बदलण्याची शक्यता असल्याने सरकार स्थापनेस विलंब होत आहे.
Ans: न्यूझीलंड निवडणूक आयोग २७ नोव्हेंबर रोजी सर्व प्रलंबित मतांची मोजणी पूर्ण करून अधिकृत अंतिम निकाल जाहीर करणार आहे.
Ans: अंतिम निकाल लागेपर्यंत आणि नवीन सरकारची स्थापना होईपर्यंत ख्रिस्तोफर लक्सॉन (Christopher Luxon) हेच प्रभारी पंतप्रधान म्हणून काम पाहत आहेत.






