
Donald Trump to meet Zohran Mamdani
Trump Plans to Meet Zohran Mamdani : वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी नुकतेच न्यूयॉर्कच्या (Newyork) महापौर पदाची निवडणूक जिंकली आहे. यामध्ये त्यांना प्रचंड विजय मिळाला असून त्यांनी प्रसिस्पर्धी आणि माजी गव्हर्नर ॲंड्र्यू कुओमो यांचा पराभव केला आहे. ममदानी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे कट्टर विरोधक मानले जातात.
कोण आहेत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी? न्यूयॉर्कच्या महापौर डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये मिळवला विजय
दरम्यान ट्रम्प यांनी जोहरान ममदानी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ट्रम्प यांचा विरोध असतानाही ममदानी महापौर बनले. त्यांच्या विजयाने ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प यांनी त्यांना धमकीही दिली होती की, ममदानी जिंकल्यानंतर न्यूयॉर्कचा निधी थांबवला जाईल. पण ट्रम्पच्या दबावाला न जुमानता ममदानी मोठ्या विजयाने जिंकले. सध्या त्यांच्या विजयानंतर ट्रम्प दबावात असल्याचे दिसून येते. यामुळेच त्यांनी ममदानींना भेटण्याचे संकेत दिले आहेत.
जोहरान ममदानी हे विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाचे वनेते आहे. सध्या त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. न्यूयॉर्कच्या ख्रिश्चन बहुसंख्यांकीक लोकांना त्यांना निवडून दिली आहे. दरम्यान ट्रम्प यांनी म्हटले की, “मला न्यूयॉर्कच्या महापौरांना भेटायचे आहे. लवकरच आम्ही याची तयारी करु. सध्या आमच्या भेटीची तारिख निश्चित नाही. पण न्यूयॉर्कमध्ये सुधारणेच्या चर्चांसाठी आम्ही एकत्र येऊ.
VIDEO | Florida, USA: US President Donald Trump says he plans to meet with Zohran Mamdaniand adds that he “will work something out” with New York City’s mayor-elect.#DonaldTrump (Source: Third party) (Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/6f7zq7JOE9 — Press Trust of India (@PTI_News) November 17, 2025
ट्रम्प यांच्या जोहरान ममदानी यांच्याप्रती या बदलत्या भूमिकेने सध्या अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. ममदानी व्यावयाने वकील आहे, पण त्यांनी अमेरिकेच्या राजकारणात आपली मजबूत अशी प्रतिमा तयार केली आहे. त्यांना ट्रम्प यांचे कट्टर विरोधक मानले जाते. त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणांवर उघडपणे विरोध केला आहे. त्यांच्या विजयानंतर देखील त्यांनी दाखवून दिले होते की, त्यांनी अध्यक्षांचा देखील पराभव केला आहे.
जोहरान ममदानी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही विरोधक मानले जातात. त्यांनी २००२ च्या गुजरातच्या दंगलीवर मोदींविरोधात तीव्र टीका केली होती. तसेच त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि नरेंद्र मोदी यांची देखील तुलना केली होती. एकदा १५ मे रीज एका कार्यक्रमादरम्यान ममदानींनी गुजराती मुस्लिम असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानावरुन मोठा गोंधळ उडाला होता. त्यांच्या या विधानावरुन अनेकांकडून तीव्र टीका करण्यात आला.
Ans: डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Ans: ट्रम्प यांनी म्हटले की, "मला न्यूयॉर्कच्या महापौरांना भेटायचे आहे. लवकरच आम्ही याची तयारी करु. सध्या आमच्या भेटीची तारिख निश्चित नाही. पण न्यूयॉर्कमध्ये सुधारणेच्या चर्चांसाठी आम्ही एकत्र येऊ.