Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Voting Rules: ट्रम्प यांच्याकडून भारतीय मतदार ओळख प्रणालीचे कौतुक; जाणून घ्या इतर देशात कशी पटवली जाते मतदारांची ओळख?

Indian Voting System: ट्रम्प यांनी भारतीय मतदार ओळख प्रणालीची प्रशंसा केली. यामुळे अमेरिकेपेक्षा भारताच्या श्रेष्ठतेबद्दल वाद निर्माण झाला आहे. जगभरातील प्रमुख देशांमध्ये मतदारांची ओळख कशी पटवली जाते, हे जाणून घ्या.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 19, 2026 | 01:40 PM
Voting is done using voter ID cards in India How voters are identified from America to Japan

Voting is done using voter ID cards in India How voters are identified from America to Japan

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांच्याकडून भारतीय मतदार प्रणालीची प्रशंसा
  • अमेरिकेत राज्यानुसार भिन्न नियम
  • जागतिकस्तरावर मतदारांची ओळख प्रणाली

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  (Donald Trump) यांनी अलीकडेच भारतातील निवडणूक प्रक्रिया आणि मतदार ओळखपत्रांच्या (Voter ID) वापर पद्धतीचे जाहीर कौतुक केले आहे. निवडणुकीतील गैरप्रकार आणि बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी अमेरिकेनेही भारताच्या धर्तीवर मतदार ओळखपत्रे अनिवार्य करावीत, अशी शिफारस त्यांनी केली. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर भारतात आणि जागतिक स्तरावर राजकीय चर्चा रंगली आहे. सत्ताधारी पक्षाने याला भारतीय लोकशाहीच्या पारदर्शकतेचे मोठे यश मानले आहे, तर विरोधकांनी यावर विविध राजकीय प्रतिक्रिया दिल्या आहेत. या निमित्ताने जगातील प्रमुख लोकशाही देशांमध्ये मतदारांची ओळख कशी पटवली जाते आणि भारताची ही यंत्रणा इतर देशांपेक्षा कशी वेगळी आहे, यावर मोठा प्रकाश पडला आहे.

अमेरिकेतील मतदार ओळखपत्राचे नियम भारतातील केंद्रीय पद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. अमेरिकेत संपूर्ण देशासाठी एकच मतदार कायदा नाही, तर प्रत्येक राज्य स्वतःचे नियम ठरवते. तेथील काही राज्यांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा राज्य ओळखपत्र यांसारखे फोटो ओळखपत्र दाखवणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक लहान राज्यांत फोटो नसलेली ओळखपत्रे, बँक स्टेटमेंट किंवा वीज-पाणी बिले दाखवूनही ओळख सिद्ध करता येते. याशिवाय वॉशिंग्टन डी.सी. सह अनेक मोठ्या राज्यांत मतदाराला कोणतेही ओळखपत्र दाखवण्याची गरज नसते; तेथे केवळ जुनी नोंद आणि स्वाक्षरी (Signature Verification) जुळवून मतदानाची परवानगी दिली जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran-US war: दुबई, केशम अन् इराणी बेट अमेरिकेच्या हद्दीत? Trumpच्या दाव्याने मित्रराष्ट्रही चक्रावले; इराणने केली ट्विटरवर फजिती

जपान, चीन, मेक्सिको आणि ब्रिटनमधील मतदान नियम

इतर विकसित आणि प्रमुख देशांमध्ये मतदारांची ओळख सिद्ध करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो:

  • ब्रिटन: जगातील जुन्या लोकशाही देशांपैकी एक असलेल्या ब्रिटनमध्ये दीर्घकाळापासून मतदानासाठी फोटो ओळखपत्र अनिवार्य नव्हते. मात्र, निवडणुकीतील पारदर्शकता वाढवण्यासाठी ब्रिटनमध्ये आता फोटो ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.
  • जपान: अत्यंत प्रगत मानल्या जाणाऱ्या जपानमध्ये पारंपरिक फोटो आयडी कार्डची गरज नसते. जपानमध्ये मतदारांना मतदानासाठीचे प्रवेश तिकीट (Voting Ticket) आधीच टपालाने किंवा डिजिटल ईमेलद्वारे पाठवले जाते. मतदान केंद्रावर अधिकारी हे तिकीट स्कॅन करतात किंवा टपाल तिकिटाची बायोमेट्रिक पडताळणी करून मतदान करू देतात.
  • चीन: जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये स्थानिक निवडणुकांसाठी राष्ट्रीय रहिवासी ओळखपत्र (Resident ID) वापरले जाते. यामध्ये नागरिकांची मूळ माहिती आणि बायोमेट्रिक्स साठवलेले असते. चीनमध्ये प्रत्येक निवडणुकीपूर्वी स्थानिक समित्या घरोघरी जाऊन डेटाबेस अद्ययावत करतात.
  • मेक्सिको: अमेरिकेचा शेजारी देश असलेल्या मेक्सिकोमध्ये १८ वर्षांवरील नागरिकांना ‘INE’ कडून डिजिटल ‘मतदार ओळखपत्र’ दिले जाते. या कार्डवर मतदाराचा फोटो, बोटांचे ठसे आणि QR कोडच्या रूपात बायोमेट्रिक माहिती असते.
  • युरोपीय देश: ब्रिटन वगळता इतर बहुतांश युरोपीय राष्ट्रांमध्ये सरकारद्वारे जारी केलेले अधिकृत छायाचित्र ओळखपत्र दाखवल्याशिवाय मतदान करता येत नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UAEVsIran: दुबईत मोबाईलवर क्षेपणास्त्राचा इशारा अन् काही तासांतच संयुक्त अरब अमिरातीने संपवले इराणसोबतचे व्यापारी नाते

भारताच्या मतदार ओळखपत्र प्रणालीचा इतिहास

भारताची मतदार ओळखपत्र प्रणाली ही जगातील सर्वात विशाल आणि विश्वासार्ह लोकशाही ओळख प्रणाली मानली जाते. भारताने स्वातंत्र्य मिळल्यानंतर १९५१-५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपासूनच मतदार याद्या आणि ओळखीची ठोस व्यवस्था निर्माण करण्यास सुरुवात केली. कोट्यवधींची लोकसंख्या, भौगोलिक विविधता आणि अल्प साक्षरता असतानाही निवडणूक आयोगाने (ECI) सर्व नागरिकांची नोंदणी करून ही यंत्रणा यशस्वी केली.

काळाच्या ओघात भारतीय निवडणूक आयोगाने यात अमूलाग्र बदल घडवून आणले. १९९० च्या दशकात टी. एन. शेषन यांच्या कार्यकाळात छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र (EPIC) लागू करण्यात आले, ज्यामुळे बोगस मतदानाला आळा बसला. आजच्या डिजिटल युगात भारत डिजिटल मतदार ओळखपत्रे (e-EPIC) आणि आधारशी जोडलेली अद्ययावत मतदार यादी प्रणाली वापरत असून, जागतिक पटलावर भारतीय निवडणूक व्यवस्था एक मार्गदर्शक मॉडेल मानली जात आहे.

Web Title: Trump praises indian voter id system global voting rules us japan uk marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Voting Rights
  • World news

संबंधित बातम्या

World News :ट्रम्प यांच्या आश्वासनानंतर युक्रेनची चिंता कायम ;स्टारलिंक सेवा अद्याप पूर्ववत नाही
1

World News :ट्रम्प यांच्या आश्वासनानंतर युक्रेनची चिंता कायम ;स्टारलिंक सेवा अद्याप पूर्ववत नाही

Chernobyl : माणूस गेला अन् घोडे जगले! चेर्नोबिलच्या रेडिएशन क्षेत्रात 31 घोड्यांचा झाला भयानक प्रयोग; आजचे वास्तव काय?
2

Chernobyl : माणूस गेला अन् घोडे जगले! चेर्नोबिलच्या रेडिएशन क्षेत्रात 31 घोड्यांचा झाला भयानक प्रयोग; आजचे वास्तव काय?

Alberta Referendum: कॅनडाचे 2 तुकडे होण्यापासून टळले; भारतीय मतदारांच्या ‘या’ एका निर्णयामुळे इतिहासाला कलाटणी
3

Alberta Referendum: कॅनडाचे 2 तुकडे होण्यापासून टळले; भारतीय मतदारांच्या ‘या’ एका निर्णयामुळे इतिहासाला कलाटणी

Science Mysteries: पक्षी पुरुषांपेक्षा स्त्रियांना पाहिल्यावर अधिक वेगाने जातात उडून; शास्त्रज्ञांसमोर नवे वैज्ञानिक कोडे
4

Science Mysteries: पक्षी पुरुषांपेक्षा स्त्रियांना पाहिल्यावर अधिक वेगाने जातात उडून; शास्त्रज्ञांसमोर नवे वैज्ञानिक कोडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.