
Trump-Jinping-Putin
G-20 Summit News in Marathi : नवी दिल्ली : यंदा २०२५ ची G-20 शिखर परिषदत ही दक्षिण आफ्रिका देशात पार पडत आहे. यासाठी जगभरातील अनेक देशांनी उपस्थिती लावली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देखील जोहान्सबर्गमध्ये उपस्थित राहिले आहेत. मात्र तीन महासत्ता देशांचे प्रमुखनेते ट्रम्प-पुतिन-जिनपिंग यांनी या परिषदेपासून स्वत:ला दूर ठेवले आहे. यामागचे कारण काय आहे ते आपण जाणून घेऊयात.
पंतप्रधान मोदी आजपासून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर; तीन दिवसांचा असणार दौरा
ग्लोबल साउथमधील देशात G-20 शिखर परिषदेचे आयोजन करण्याचे हे सलग चौथे वर्ष आहे. २० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आफ्रिका खंडात ही परिषद पार पडत आहे. २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे ही परिषद पार पडत आहे. आज या परिषदेचे दुसरे सत्र आहे.
२०२३ मध्ये भारताने या परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. याच वेळी भारताच्या प्रयत्नांमुळे दक्षिण आफ्रिकेला या परिषदेचे सदस्यत्व मिळाले होते. या परिषदेत, विकास, हवामान बदल, आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI Intelligence) यांसारख्या मुद्यांवर जगभरातील नेते आपले विचार मांडणार आहेत.
परंतु जगतील तीन महासत्ता देशांचे नेते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शी-जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी स्वत:ला दूर ठेवले आहे. यामुळे सध्या यावर जागतिक चर्चांणा उधाण आहे. जगातील सर्वात शक्तीशाली देशांचे नेते उपस्थित का नाहीत असा प्रश्न विचारले जात आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आपण यामागचे कारण जाणून घेऊयात.
अमेरिका आणि त्यांचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या परिषदेवर बहिष्कार टाकला आहे. सध्या ही अत्यंत चिंतेची बाब मानली जात आहे कारण अमेरिकेकडे G-20 चे संस्थापक सदस्यत्व आणि पुढील अध्यक्षपद या देशाकडे आहे. ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेवर आरोप केला आहे की, त्यांच्या देशात गोऱ्या शेतकऱ्यांवर अत्याचार केला जातो. त्यांना तुच्छ वागणूक दिली जाते. ट्रम्प यांच्यामते दक्षिण आफ्रिका सरकारने गोऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेतल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या देशात ते जाणार नाहीत असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
तज्ज्ञांच्या मते, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्या परिषदेला न येण्यामागचे कारण म्हणजे अटकेची भीती. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने(ICC) युक्रेन युद्धासाठी पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. तेव्हापासून पुतिन यांनी आपले परदेशी दौरे कमी केले आहे. शिवाय दक्षिण आफ्रिका रोम कायद्याचा सदस्य आहे, यामुळे दक्षिण आफ्रिका ICC च्या वॉरंटचे पालन करण्यास बंधनकारक आहे. पुतिन G-20 ला उपस्थित राहिल्यात दक्षिण आफ्रिकेवर त्यांना अटक करण्याची जबाबदारी असले, यामुळे २०२३ मध्ये झालेल्या ब्रिक्स परिषदेतही पुतिन गैरहजर होते.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनचे अध्यक्ष शी-जिनपिंग (XI-Jinping) देखील G-20 परिषदेत आलेले नाही. चीन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्यांची प्रकृती बिघडली आहे. यामुळे त्यांच्या जागी चीनचे पंतप्रधान ली केकियांग प्रतिनिधी G-20 साठी म्हणून उपस्थित राहिले आहेत. शिवाय दक्षिण आफ्रिका आणि चीनचे व्यापारी संबंध अधिक मजबूत आहे. यापूर्वी ब्रिक्स परिषदेला चीनने याला उपस्थित दर्शवली होती. यामुळे त्यांची अनुउपस्थिती देखील महत्त्वाची मानली जात आहे. सध्या या तिन्ही नेत्यांच्या अनुउपस्थितीमुळे G-20 परिषदेत भारताचे महत्त्व अधिक वाढले आहे. पंतप्रधान मोदी या परिषदेत काय मुद्दे मांडतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ट्रम्प यांचा पुन्हा आक्रमक पवित्रा! G-20 परिषदेवर टाकला बहिष्कार; दक्षिण आफ्रिकेवर गंभीर आरोप