
Trump says US to boycotts G-20 Summit in South Africa
Trump Boycotts South Africa G-20 Summit : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेविरोधी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या G-20 शिखर परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी या परिषदेत सहभागी होण्यासही नकार दिला आहे. याशिवाय ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेवर गंभीर आरोपही केले आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिका सरकारवर गोऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याचा आरोप केला आहे. ट्रम्प यांच्या मते, दक्षिण आफ्रिकेत डच, फ्रेंच आणि जर्मन वंशाचे लोक हिंसाचाराला बळी ठरत आहेत. या लोकांच्या शेती आणि जमीन जबरदस्तीने ताब्यात घेतल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले. यामुळे ट्रम्प यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होणाऱ्या देशात G-20 परिषदेच्या आयोजनाला लज्जास्पद म्हणून संबोधले आहे.
ट्रम्प यांनी असेही स्पष्ट केले की, दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या शेतकऱ्यांवरील हिंसाचार जोपर्यंत थांबत नाही, तेथील परिस्थिती जोपर्यंत सुधारत नाही, तोपर्यंत अमेरिका किंवा त्यांचा कोणताही अधिकारी G-20 परिषदेत सामील होणार नाही. ट्रम्प यांनी ते स्वत:ही उपस्थित होणार नसल्याचे जाहीर केले आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय आंतरराष्ट्रीय मंचावर बहिष्कार मानला जात आहे.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) सरकारने डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्व आरोप फेटाळले आहे. सरकारने म्हटले आहे की, त्यांच्या देशात कोणत्याही प्रकारचा वर्णीय भेदभाव केला जात नाही. याउलट गोऱ्या लोकांचे जीवन सामान्य काळ्या वर्णीय लोकांच्या तुलनेत अधिक चांगले आहे. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी स्पष्ट केले की, गोऱ्या शेतकऱ्यांवर होत असलेल्या अत्याचारांचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत.
सध्या ट्रम्प यांच्या या निर्णयाने अमेरिका आणि दक्षिण देशाच्या संबंधावर परिणाम होऊ शकतो. यापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी देखील G-20 परिषदेच्या बैठकीवर बहिष्कार घातला होता. यावेळी विविधता, समानता आणि हवामान बदल यांसारख्या मुद्यांवरुन आरोप करण्यात आले होते.
आफ्रिका खंडात पहिल्यांदाच पार पडतेय G-20 परिषद
१ डिसेंबर २०२४ रोजी दक्षिण आफ्रिकेने G-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले होते. यावेळी २२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे ही परिषद होणार आहे. यासाठी अनेक जागतिक नेते उपस्थित असतील. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच G-20 परिषदेत पार पडत आहे. या बैठकीत अर्थव्यवस्था, उर्जा आणि विकास सहकार्य या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे.
तुफान असो वा ढग… रशियाचे खतरनाक Weatherproof फायटर जेट तयार, क्षमता पाहून जगाला धडकी!
Ans: ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेवर गोऱ्या शेतकऱ्यांसोबत म्हणजेच डच, फ्रेंच आणि जर्मन वंशाच्या लोकांवर अन्याय केल्याचा आरोप केला आहे.
Ans: दक्षिण आफ्रिकेने ट्रम्प यांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावेल असून त्यांच्या देशात कोणत्याही प्रकारचा वर्णीय भेदभाव केला जात नसल्याचे म्हटले आहे.
Ans: G-20 परिषदेत अर्थव्यवस्था, उर्जा आणि विकास सहकार्य या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे.