ट्रम्पचा अडमुटेपणा कायम! G-20 शिखर परिषदेत जाण्यास दिला नकार; दक्षिण आफ्रिकेला गटातून बाहेर काढण्याची मागणी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मियामी येथे अमेरिकन बिझनेस फोरमला संबोधित करताना ट्रम्प यांनी ही घोषणा केली. त्यांनी म्हटले की, ” मी G-20 साठी दक्षिण आफ्रिकेला जाणार नाही. दक्षिण आफ्रिकेला G-20 गटात राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे वादग्रस्त विधान त्यांनी केले.
त्यांनी म्हटले की, दक्षिण आफ्रिकेत जे काही घडत आहे, ते अत्यंत वाईट आहे. यामुळे मी स्पष्टपणे सांगतो की, मी दक्षिण आफ्रिकेला G-20 परिषदेसाठी जाणार नाही आणि अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणार नाही. ट्रम्प यांच्या या निर्णयाने जगभर चर्चांणा उधाण आले आहे.
१ डिसेंबर २०२४ रोजी दक्षिण आफ्रिकेने G-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले होते. यावेळी २२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे ही परिषद होणार आहे. यासाठी अनेक जागतिक नेते उपस्थित असतील. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच G-20 परिषदेत पार पडत आहे.
भारतात २०२३ मध्ये G-20 परिषद
यापूर्वी डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ च्या कालावधीत भारताने या परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. सप्टेंबर २०२३ मध्ये नवी दिल्लीत १८वी G-20 परिषदत यशस्वीपणे पार पडली होती. यावेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन अमेरिकेचे प्रतिनिधी म्हणून भारतात आले होते.
या देशांचा आहे G-20 मध्ये समावेश
G-20 गटातमध्ये एकूण १९ देशांचा आणि दोन संघटनांचा समावेश आहे. यामध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. तर युरोयपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन या स्थायी संघटनांचाबहबी समावेश आहे.
India Canada Relations : एस. जयशंकर पुढील आठवड्यात कॅनडा दौऱ्यावर ; भारताशी संबंधाना मिळणार नवी दिशा






