Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युद्ध थांबणार? युक्रेनशी चर्चेनंतर ट्रम्प यांचा मॉस्कोला फोन; लवकरच झेलेन्स्की-पुतिन यांची घडवणार भेट

Trump Zelensky Meeting : तीन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेले रशिया युक्रेन युद्ध थांबणार असल्याचे संकेत मिळाले आहे. झेलेन्स्कीसोबत व्हाइट हाउसमध्ये झालेली बैठक यशस्वी ठरली असल्याचे स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 19, 2025 | 11:01 AM
Trump says Zelensky Putin meeting to be held soon to end Russia Ukraine war

Trump says Zelensky Putin meeting to be held soon to end Russia Ukraine war

Follow Us
Close
Follow Us:

Trump and Zelensky Meeting : वॉशिंग्टन : अखेर चार वर्षाहून अधिक काळ सुरु असलेले रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War)  लवकरच थांबणार असल्याची शक्यता आहे. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांच्या बैठक पार पडली. वॉशिंग्टनमध्ये व्हाइट हाउसमध्ये ही बैठक घेण्यात आली. यावेळी नाटो प्रमुख आणि युरोपीय देश देखील उपस्थित होते. दरम्यान या बैठकीनंतर ट्रम्प आणि इतरे सर्व नेत्यांनी लवकरच युद्ध संपणार असा आनंद व्यक्त केला आहे.

झेलेन्स्की-ट्रम्प बैठक यशस्वी

या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवरुन माहिती दिली. व्हाइट हाउसमध्ये झालेल्या झेलेन्स्कींसोबतची बैठक यशस्वी ठरली असे त्यांनी सांगितले. तसेच युक्रेनला देण्यात येणाऱ्या सुरक्षेवर युरोपीय देशांनी आणि अमेरिकेने हमी दर्शवली आहे. यामुळे आता लवकरच रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता बैठक पार पडेल असेही ट्रम्प म्हणाले. या बैठकीनंतर त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना देखील याची माहिती दिली.

ट्रम्प यांनी सांगितले की, आता लवकरच रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात बैठक होईल. सध्या याची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. यासाठी लवकरच वेळ आणि जागा निश्चिक केली जाईल. तसेच दोन्ही देशांचे राष्ट्राध्यक्ष या बैठकीत सामील होतील.

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?

हे युरोपीय नेते बैठकीला उपस्थित

ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात झालेल्या बैठकीदरम्यान व्हाइट हाउसमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, फिनलॅंडचे अध्यक्ष अलेक्झॅंडर स्टब, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर, जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ, युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेने आणि नाटोचे प्रमुख मार्क रुटो उपस्थित होते. या सर्वांसोबत चांगली चर्चा झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

झेलेन्स्की-पुतिन बैठकीनंतर आणखी एक बैठक

ट्रम्प यांनी पुतिन आणि झेलेन्स्कीमध्ये होणाऱ्या पुढील शांतात बैठकीत लवकर होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी असेही म्हटले की, मी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना फोन करुन बैठकीची माहिती दिली आहे. सध्या याची व्यवस्था सुरु आहे. या बैठकीनंतर पुन्हा एक बैठक होईल. यामध्या पुतिन, झेलेन्स्की यांच्यासह मी उपस्थित राहील असे ट्रम्प यांनी म्हटले.

ट्रम्प यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेले युद्ध आता थांबेल. यासाठी एक सकारात्मक पावलाच्या दृष्टीने आपण वाटचाल केली आहे. आता या प्रकरणावर उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स, परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि स्टीव्ह वीटकॉफ लक्ष्य ठेवतील.

 

FAQs (संबंधित प्रश्न)

रशिया युक्रेन युद्ध कधी सुरु झाले?

रशिया आणि युक्रेन युद्ध २०१४ फ्रेब्रवारी मध्ये सुरु झाले तेव्हापासून आतापर्यंत सुरु आहे.

काय आहे रशिया युक्रेन वादाचे कारण?

रशियाने युक्रेनच्या क्रिमियावर ताबा मिळवल्यापासून या युद्धाला सुरुवात झाली होती. पण त्यानंतर युक्रेनने देखील रशियाच्या डोनेट्स्कवर ताबा मिळवला. यामुळे २०२२ मध्ये पुन्हा एकदा दोन्ही देशात आपापला प्रदेश परत मिळवण्यासाठी संघर्ष सुरु झाला.

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?

Web Title: Trump says zelensky putin meeting to be held soon to end russia ukraine war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Russia Ukraine War
  • Vladimir Putin
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?
1

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?
2

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?

Tariff War: PM मोदींना आला पुतीनचा फोन; ट्रम्पशी काय झाले बोलणं? एक-एक गोष्ट अशी सांगितली की…
3

Tariff War: PM मोदींना आला पुतीनचा फोन; ट्रम्पशी काय झाले बोलणं? एक-एक गोष्ट अशी सांगितली की…

Russia Ukraine War :ट्रम्प-झेलेन्स्की बैठकीपूर्वीच रशियाचा युक्रेनवर हल्ला; खार्किव्ह प्रदेशात ड्रोन्सचा वर्षाव
4

Russia Ukraine War :ट्रम्प-झेलेन्स्की बैठकीपूर्वीच रशियाचा युक्रेनवर हल्ला; खार्किव्ह प्रदेशात ड्रोन्सचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.