Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या असे काय आहे यामध्ये खास? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Vladimir Putin Plane: मॉस्को : सध्या रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहेत. नुकतेच अलास्कामध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मात्र ट्रम्प यांना रशियापुढे पुतिन यांनी झुकते माप घ्यायला लावले असे मानले जात आहे. कारण अलास्का हा पूर्वी रशियाचा भाग होता. परंतु १८६७ च्या काळात अमेरिकेने ७२ मिलियन डॉलर्सला त्याची खरेदी केली होती. तेव्हापासून एकही रशियन अधिकारी किंवा नेता या ठिकाणी आला नव्हता.
यामुळे सध्या पुतिन यांची अमेरिकेत शान वाढली आहे. शिवाय खास पुतिनसाठी रेड कार्पेट देखील टाकण्यात आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील त्यांना अनेक वेळा सन्मान दिला. परिषेदतही त्यांनी प्रथम पुतिन यांना बोलू दिले. या सर्व घडामोडींमुळे ट्रम्प पुतिन पुढे झुकले अशी चर्चा सध्या सुरु आहे. याच वेळी आणखी एक विषयाची चर्चा सुरु आहे, ते म्हणजे पुतिन यांच्या विमानांची, ज्याची किंमत तब्बल ६ हजार २७५ कोटी आहे.
हे विमान जणू एक उडणारा राजवाडाच आहे. या रशियामध्ये एअर फोर्स वनची ओळख मिळाली आहे.