US Iran War: ट्रम्पचे दोन्ही मुलगे युद्धातून अमाप संपत्ती कमावत आहेत! इराणचे नाव घेऊन धमकावून ते अरब देशांना ड्रोन विकत असल्याचा दावा कोण करतं? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Eric Trump Donald Trump Jr Powerus drone company : जगाच्या नकाशावर सध्या अमेरिका आणि इराण (World War 3) यांच्यातील संघर्ष पेटलेला असताना, या युद्धाच्या धुराळ्यातून एक धक्कादायक आर्थिक व्यवहार समोर आला आहे. एका बाजूला क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचे हल्ले होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे कुटुंबीय या युद्धजन्य परिस्थितीचा वापर आपला व्यवसाय वाढवण्यासाठी करत असल्याचा आरोप होत आहे. ‘असोसिएटेड प्रेस’ (AP) च्या एका अहवालाने अमेरिकन राजकारणात आणि जागतिक संरक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
जॉर्ज डब्लू. बुश यांच्या कार्यकाळात व्हाईट हाऊसमध्ये नीतिमत्ता वकील (Ethics Lawyer) म्हणून सेवा बजावलेले रिचर्ड पेंटर यांनी ट्रम्प बंधूंवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. पेंटर यांच्या मते, ही अमेरिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे जिथे राष्ट्राध्यक्षांचे कुटुंब अशा युद्धाचा फायदा घेत आहे ज्यासाठी काँग्रेसची अधिकृत परवानगीही घेतली गेलेली नाही. “अरब देशांवर असा दबाव आहे की, जर त्यांना अमेरिकेचे समर्थन हवे असेल, तर त्यांना राष्ट्राध्यक्षांच्या मुलांच्या कंपन्यांकडून वस्तू खरेदी कराव्या लागतील,” असा दावा पेंटर यांनी केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : RIAC: रशियाची नवी खेळी! भारतासोबतची मैत्री आता केवळ वरवरची नसेल; तद्यांनी मांडला परराष्ट्र धोरणाचा नवा ‘रोडमॅप’
फ्लोरिडा येथील ‘पॉवरस’ (Powerus) ही ड्रोन कंपनी सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या कंपनीचे सह-संस्थापक ब्रेट वेलिकोविच यांनी कबूल केले आहे की, त्यांची टीम सध्या मध्य पूर्वेतील अनेक आखाती देशांमध्ये आपल्या इंटरसेप्टर सिस्टीमचे (ड्रोनला हवेतच मारणारी यंत्रणा) प्रात्यक्षिक दाखवत आहे. एरिक ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांचा या कंपनीत मोठा वाटा (Equity Stake) असल्याचे बोलले जाते. इराणकडून होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांच्या भीतीचा फायदा घेत ही कंपनी आखाती देशांना आपले तंत्रज्ञान विकत आहे.
Powerus, a drone company backed by President Donald Trump’s eldest sons, has met with officials in Abu Dhabi to discuss selling weapons to the United Arab Emirates as the country looks to shore up its defense systems against attacks from Iran https://t.co/Gh68fOxyQJ — Bloomberg (@business) April 2, 2026
credit – social media and Twitter
टीकेला उत्तर देताना एरिक ट्रम्प यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. “ड्रोन हे भविष्याचे तंत्रज्ञान आहे आणि ज्या कंपन्यांवर माझा विश्वास आहे, तिथे गुंतवणूक करण्याचा मला सार्थ अभिमान आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. पॉवरसचे वेलिकोविच यांनीही याला ‘शस्त्रास्त्रांची स्पर्धा’ (Arms Race) असे संबोधले असून, जर अमेरिकेने वेगाने उत्पादन केले नाही, तर आपला देश मागे पडेल, असा युक्तिवाद केला आहे. त्यांच्या मते, ही गुंतवणूक राजकारणाच्या पलीकडची आहे आणि ती केवळ जीव वाचवण्यासाठी आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bahrain Bapco: इराणने बहरीनमध्ये घातला धुमाकूळ! ‘घातक’ हल्ल्यामुळे तेल उत्पादन ठप्प, कुवेतमध्ये अंधार; पाहा धक्कादायक VIDEO
या व्यवहारामुळे आता अनेक नैतिक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इराणविरुद्ध कठोर भूमिका घेतात, तेव्हा त्यांच्याच मुलांच्या कंपन्यांना अरब देशांकडून कोट्यवधींची कंत्राटे मिळणे, हा केवळ योगायोग आहे की पूर्वनियोजित चाल? आखाती देशांना इराणचा धोका दाखवून ही शस्त्रास्त्रे विकली जात असल्याचा दावा विरोधक करत आहेत. इराणच्या हल्ल्यांमध्ये ९०% घट झाल्याचा दावा व्हाईट हाऊस करत असताना, दुसरीकडे मात्र ‘इराणचा धोका’ सांगूनच हे ड्रोन विकले जात आहेत, हा मोठा विरोधाभास या रिपोर्टमधून समोर आला आहे.
Ans: ट्रम्प यांचे मुलगे एरिक आणि डोनाल्ड ज्युनियर हे इराण युद्धाच्या नावाखाली अरब देशांवर दबाव टाकून आपल्या कंपनीचे ड्रोन विकत असल्याचा आणि त्यातून नफा कमवत असल्याचा आरोप रिचर्ड पेंटर यांनी केला आहे.
Ans: ही फ्लोरिडास्थित कंपनी प्रामुख्याने 'ड्रोन इंटरसेप्टर सिस्टीम' तयार करते, जी शत्रूचे ड्रोन हवेतच नष्ट करण्यासाठी वापरली जाते.
Ans: एरिक ट्रम्प यांनी म्हटले आहे की त्यांना या तंत्रज्ञानावर विश्वास असून भविष्यातील तंत्रज्ञानात गुंतवणूक केल्याचा त्यांना अभिमान आहे.






