ट्रम्प यांच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या विजयावर लागली मोहर; कमला हॅरिस यांनी अधिकृतपणे केले घोषित
वॉश्गिंटन: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विजयावर अधिकृतपणे काल ( दि. 6 जानेवारी) मोहर लागली. इलेक्टोरल मतमोजणीनंतर स्वत: कमला हॅरिस यांनी त्यांच्या विजयावर अधिकृत घोषणा केली. ट्रम्प यांचा विजय 6 नोव्हेंबरलाच घोषित झाला होता. मात्र, काल अधिकृत घोषणा करण्यात आली. आता 20 जानेवारी 2025 रोजी जो बायडेन यांनी सत्ता हस्तांतरण केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यपदाची जबाबदारी स्वीकारतील.
ऐतिहासिक क्षण – डोनाल्ड ट्रम्प
कॅपिटल हिल या ठिकाणी कॉंग्रेसच्या हाऊस ऑफ रेप्रेंझेंटिव्ह आणि सीनेट या संयुक्त अधिवेशनादरम्यान इलेक्टोरल कॉलेजचे मत मोजण्यात आले. ही प्रतिक्रीया उपराष्ट्रापती रमला हॅरिस यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली. विजयाच्या अधिकृत घोषणेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियावर विजयाबद्दल उत्साह व्यक्त केला. त्यांनी या क्षणाला ऐतिहासिक म्हटले.
अमेरिकेच्या या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ट्रम्प यांना 312 इलेक्टोरल मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांनी 226 मते मिळाली होती. अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीत विजयासाठी 270 मते आवश्यक असतात. आता 20 जानेवारीला ट्रम्प राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर कॅपिटल हिलच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
अमेरिकेतील निवडणूक प्रक्रिया
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणूका तीन टप्प्याच होतात. जनता डायरेक्ट राष्ट्रपतींला मतदान करत नाहीत, तर राज्यांचे प्रतिनिधी (इलेक्टर्स) निवडतात. हे इलेक्टर्स पॉप्युलर व्होटच्या आधारे निवडले जातात आणि त्यानंतर इलेक्टोरल कॉलेजद्वारे राष्ट्रपती निवडले जातात. इलेक्टोरल कॉलेजमध्ये 538 सदस्य असतात. प्रत्येक राज्यात बहुमताने जिंकणाऱ्या उमेदवाराला त्या राज्यातील सर्व इलेक्टोरल मते मिळतात. या प्रक्रियेला ‘विनर टेक्स ऑल’ म्हणतात.
कॅपिटल हिल हिंसाचाराचा इतिहास
6 जानेवारीला ट्रम्प यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झाली. मात्र, याच दिवशी 2021 साली जो बायडेन यांच्या विजयाच्या घोषणेनंतर ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल हिलवर हल्ला केला होता. या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रम्प यांच्यावर महाभियोग आणला गेला होता. ट्रम्प यांनी वचन दिले आहे की राष्ट्रपती झाल्यावर या हिंसेतील आरोपींना माफी दिली जाईल. शपथविधीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प परंपरेनुसार अध्यक्ष राष्ट्रपती जो बायडेन यांची भेट घेणार आहेत. ट्रम्प यांचा विजय त्यांच्या राजकीय पुनरागमनाचा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.