
H-1B Visa
KFF आणि NYT च्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतली अनेक स्थलांतरित हे इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या तपासणीपासून वाचण्यासाठी परदेश प्रवास टाळत आङे. २०२५ च्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेत सुमारे २७ टक्के स्थलांतरित असून या सर्व कुटुंबीयांनी परदेश प्रवास थांबवला आहे. ही भीती केवळ स्थलांरितांमध्ये नाही, तर वैध व्हिसा असलेल्या, नागरिकत्व असलेल्या लोकांमध्ये देखील निर्माण झाली आहे. लोक घराबाहेर देखील पडत नसल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. अहवालानुसार, हे लोक अटकेच्या आणि हद्दपार होण्याच्या भीतीने घरातच राहत आहे. यांनी आपली प्रोफाइल लो ठेवली आहे. जवळपास १५ टक्के स्थलांतरितांनी प्रवास थांबवला आहे. अगदी देशांतर्गत प्रवासही टाळला जात आहे.
सध्या अमेरिकेत ख्रिसमसच्या सुट्ट्या सुरु आहे. यावेळी दरवर्षी मोठ्या संख्येने लोक आपल्याला मायदेशात प्रवास करतात. मात्र यावेळी प्रवासात लक्षणीय घट झाली आहे. KFF आणि NYT च्या अहवालानुसार, ट्रम्प प्रशासनाच्या नव्या नियमांमुळे विमानतळांवर देखील कडक तपासणी केली जात आहे. देशांतर्गत उड्डाणांवर देखील लक्ष ठेवले जात आगे. प्रत्येक प्रवाशाचा प्रवास डेटा, इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंट अझिकाऱ्यांसोबत शेअर केला जात आहे. याद्वारे ICE अधिरकाऱ्यांना स्थलांरितांना आणि अवैध मार्गाने देशात राहणाऱ्यांना अटक करणे सोपे जात आहे.
जुलै २०२५ पासून अमेरिकेच्या एच-१बी व्हिसा आणि एच-४ व्हिसा संबंधित अनेक नियम बदलेले आहेत. यामुळे अनेकांच्या व्हिसा नूतनीकरणाच्या अपॉइंटमेंट देखील रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच नवीन अर्ज शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहे. व्हिसा धारकांचे सोशल मिडिया अकाऊंट्स तपासले जात आहे. तसेच केवळ जास्त पगार आणि कौशल्य असलेल्यांना प्राधान्य दिले जात आहे. या सर्व नियमांचा भारतीयांवर मोठा परिणाम होत आहे. अनेक भारतीय कामगार व व्यावसायिक अमेरिकेत अडकले आहेत. इमिग्रेशन वकील आणि मायक्रोसॉफ्ट, गुगुल सारख्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
ट्रम्पने भारतीयांचे अमेरिकन स्वप्न चिरडलं; एच-१बी व्हिसा लॉटरी सिस्टम केली बंद