Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Strait of Hormuz: “जवळ आलात तर थेट उडवून देऊ..”; होर्मुजच्या नाकेबंदीवर ट्रम्प यांचा इराणला सर्वात मोठा इशारा; तेहरानमध्ये खळबळ

होर्मुजच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) अमेरिकन नौदलाने वेढा घातला असून, ट्रम्प यांनी इराणला थेट लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 13, 2026 | 09:45 PM
होर्मुजच्या नाकेबंदीवर ट्रम्प यांचा इराणला सर्वात मोठा इशारा (Photo Credit- X)

होर्मुजच्या नाकेबंदीवर ट्रम्प यांचा इराणला सर्वात मोठा इशारा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • “जवळ आलात तर थेट उडवून देऊ..”
  • होर्मुजच्या नाकेबंदीवर ट्रम्प यांचा इराणला सर्वात मोठा इशारा
  • तेहरानमध्ये खळबळ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नमवण्यासाठी आक्रमक पाऊल उचलले असून, इराणच्या सागरी सीमांवर ‘नौदल नाकेबंदी’ (Naval Blockade) लागू केली आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) अमेरिकन नौदलाने वेढा घातला असून, ट्रम्प यांनी इराणला थेट लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे. “इराणी जहाजे आमच्या नाकेबंदीच्या जवळ आली, तर त्यांना तात्काळ नष्ट केले जाईल,” अशा शब्दांत ट्रम्प यांनी तेहरानला धमकावले आहे.

ट्रम्प यांचा मोठा दावा

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर इराणला दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे की, “इराणची नौदलाची ताकद आता समुद्राच्या तळाशी असून ती पूर्णपणे नष्ट झाली आहे. आम्ही त्यांचे 158 हून अधिक जहाजे आधीच निकामी केली आहेत.” ड्रग तस्करांविरुद्ध ज्या वेगाने आणि कठोरपणे कारवाई केली जाते, त्याच पद्धतीने इराणी जहाजांना रोखले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मित्रराष्ट्रांनी फिरवली पाठ; ट्रम्प एकाकी?

एकीकडे ट्रम्प आक्रमक पवित्रा घेत असताना, अमेरिकेच्या सर्वात जवळच्या मित्रराष्ट्रांनी मात्र या लष्करी कारवाईतून स्वतःला वेगळे केले आहे.ब्रिटन, फ्रान्स, जपान, नेदरलँड्स, इटली, जर्मनी आणि कॅनडा या देशांनी एक संयुक्त निवेदन जारी करून अमेरिकेच्या या नाकेबंदीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. विशेषतः ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि ट्रम्प यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. ब्रिटनने स्पष्ट केले आहे की, ते जागतिक सागरी मार्गांच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहेत, ते मार्ग बंद करण्याच्या बाजूने नाहीत.

Hormuz Blockade : ‘जर अमेरिका आमच्या मार्गात आली तर…’ होर्मुझवरून महासत्तांमध्ये ठिणगी; चीनने ट्रम्पना दिला ‘रेड अलर्ट’

इराणचा प्रतिइशारा

अमेरिकेच्या या आव्हानाला इराणनेही जशास तसे उत्तर दिले आहे. इराणच्या सशस्त्र दलाच्या केंद्रीय मुख्यालयाने जाहीर केले की, इराणच्या बंदरांवर कोणताही हल्ला झाल्यास त्याचे परिणाम गंभीर असतील. “पर्शियन खाडी आणि ओमानच्या समुद्रात सुरक्षा ही एकतर सर्वांसाठी असेल किंवा कोणासाठीच नसेल,” असे इराणने म्हटले आहे. जर इराणची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला, तर या संपूर्ण क्षेत्रातील इतर देशांची बंदरेही सुरक्षित राहणार नाहीत, असा थेट इशारा इराणने दिला आहे.

जगाची चिंता वाढली

तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांनी या संघर्षावर प्रतिक्रिया देताना कूटनीतीचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले आहे. होर्मुजची सामुद्रधुनी ही जागतिक व्यापारासाठी महत्त्वाची असून, ती लष्करी बळाने बंद करणे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरू शकते. अनेक देशांनी या लष्करी नाकेबंदीपासून अंतर राखत शांततेच्या मार्गावर भर दिला आहे.

US China Tension : इराणशी मैत्री चीनला भोवणार? इंडो-पॅसिफिक क्षेत्रात ट्रम्प यांचा ‘तो’ मास्टरप्लॅन अन् ड्रॅगनची उडाली झोप

Web Title: Trumps strongest warning to iran over hormuz blockade tehran shaken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना
1

US-Iran Conflict: अमेरिका इराणवर करणार ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्स’चा वापर? जाणून घ्या काय आहे अमेरिकेची ‘ही’ गुप्त लष्करी योजना

Strait of Hormuz: ‘युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आल्या तर…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; 5 घातक शस्त्रांसह लष्कर सज्ज
2

Strait of Hormuz: ‘युद्धनौका होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आल्या तर…’ इराणचा अमेरिकेला थेट इशारा; 5 घातक शस्त्रांसह लष्कर सज्ज

Strait Of Hormuz : ओमानच्या आखातात अमेरिकेचा मोठा हवाई हल्ला: ‘ओशन मोलिका’ मालवाहू जहाज समुद्रातच निकामी
3

Strait Of Hormuz : ओमानच्या आखातात अमेरिकेचा मोठा हवाई हल्ला: ‘ओशन मोलिका’ मालवाहू जहाज समुद्रातच निकामी

US-Iran War : ट्रम्प यांचा मोठा दावा; निवडणुकीपूर्वी इराण करणार हल्ला? होर्मुझचे नाव बदलण्याचेही दिले संकेत
4

US-Iran War : ट्रम्प यांचा मोठा दावा; निवडणुकीपूर्वी इराण करणार हल्ला? होर्मुझचे नाव बदलण्याचेही दिले संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.