Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्प यांचे टॅरिफ प्रयोग अपयशी? अमेरिकन कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर 

Trump Tarrif Game : डोनाल्ड ट्रम्प यांनी परराष्ट्र विरोधी धोरणाचा स्वीकार करत अनेक देशांवर दबाव आणण्यासाठी टॅरिफ लादले आहे. परंतु ट्रम्प यांचा टॅरिमुळे अमेरिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 29, 2025 | 11:35 AM
Trump Tarrif

Trump Tarrif

Follow Us
Close
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ डाव त्यांच्यावरच उलटला
  • अमेरिकन कंपन्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर
  • अर्थव्यवस्थेला मोठा फटका
वॉशिंग्टन, वृत्तसंस्था. डोनाल्ड ट्रम्प यांनी साऱ्या जगावर टैरिफ लादून अनेक देशांना आपल्या पंखाखाली घेण्याचा प्रयत्न केला. पण, प्रत्यक्षात हा डाव अमेरिकेवरच उलटला आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एस ॲण्ड पी ग्लोबल डेटा इंटेलिजन्सच्या एका अहवालानुसार २०२५ मध्ये अमेरिकेतील कॉर्पोरेट दिवाळखोरी १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. अनेक कंपन्यांनी याला ट्रम्प टैरिफ कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. शिवाय, महागाईमुळे परिस्थिती आणखी बिकट झाल्याचेही कंपन्यांचे म्हणणे आहे.

डोनाल्ड ट्रम्पचे आवडीचे शस्त्र टॅरिफ; स्वतः मान्य करत वाचला आपल्याच गुन्हांचा पाढा

द वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार, २०२५ मध्ये यूएस कॉर्पोरेट दिवाळखोरीत लक्षणीय वाढ झाली आहे. ही दिवाळखोरी आता महामंदीनंतरच्या म्हणजेच २००८ च्या पातळीपर्यंत गेली आहे. एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या डेटानुसार, जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान ७१७ कंपन्यांनी चॅप्टर ७ किंवा चॅप्टर ११ अंतर्गत दिवाळखोरीसाठी अर्ज केला. २०२४ च्या तुलनेत हा आकडा १४% जास्त आहे आणि २०१० नंतरचा हा सर्वोच्च आकडा आहे.

कंपन्यांची टीका

अहवालानुसार, आयातीवर थेट अवलंबून असलेल्या अमेरिकन व्यवसायांना दशकांमधील सर्वाधिक शुल्काचा सामना करावा लागला, दिवाळखोरीसाठी अर्ज करणाऱ्या कंपन्यांमध्ये सर्वाधिक वाढ औद्योगिक क्षेत्रात दिसून आली. ज्यामध्ये बांधकाम, उत्पादन आणि वाहतूक कंपन्या समाविष्ट आहेत. दिवाळखोरीसाठी अर्ज करणाऱ्या बहुतेक कंपन्यांनी त्यांच्या आर्थिक आव्हानांसाठी महागाई आणि व्याजदर हे घटक जबाबदार असल्याचे सांगितले, त्यांनी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या व्यापार धोरणांवर पुरवठा साखळीत व्यत्यय आणणारी आणि खर्च वाढवणारी टीका केली.

ट्रम्प यांचे दावे पोकळ

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सतत बदलणा-या शुल्क धोरणांचा या सर्व क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाला आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी बराच काळ दावा केला आहे की, टैरिफ धोरणामुळे अमेरिकन उत्पादन क्षेत्र पुनरुज्जीवित करण्यास मदत होत आहे. फेडरल डेटा दर्शवितों की, नोव्हेंबरमध्ये संपलेल्या वर्षाच्या कालावधीत उत्पादन क्षेत्रात ७०,००० हून अधिक नोकऱ्या गेल्या. या संदर्भात, ट्रम्प यांचे सर्व दावे पोकळ वाटतात.

तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे ?

अर्थशास्त्रज्ञाच्या मते, टैरिफ वॉरमुळे आयात अवलंबित व्यवसायावर दबाव आला आहे. पण, ते उत्पादनांच्या किमती वाढवू शकत नाहीत. येल विद्यापीठातील प्राध्यापक जेफ्री सोनेनफेल्ड म्हणतात की, दिवाळखोरीसाठी अर्ज करणाऱ्या या अमेरिकन कंपन्यांना सामान्य अमेरिकन लोकांसमोर असलेल्या महागाईच्या संकटाची चांगली जाणीव आहे. ते टैरिफ खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्याला मर्यादा आहेत, ज्या कंपन्या किमती नियंत्रित करतात, त्याच्यामुळे अन्य कंपन्या बंद पडण्याची भीती आहे.

ट्रम्प यांची मांडूळाची चाल! अनेक टीकांनंतर गायले पंतप्रधान मोदींचे गुणगाण

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Trumps tariff strategy backfire many american companies on the verge of bankruptcy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • America
  • Tarrif
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Election : नेपाळच्या राजकारणात नवी लाट! बालेन शाह बनले पंतप्रधान पदाचे दावेदार
1

Nepal Election : नेपाळच्या राजकारणात नवी लाट! बालेन शाह बनले पंतप्रधान पदाचे दावेदार

BRICS Gold Reserves: डॉलरच्या वर्चस्वाची उलटी गिनती सुरू? ब्रिक्सचा सोन्याकडे निर्णायक कल
2

BRICS Gold Reserves: डॉलरच्या वर्चस्वाची उलटी गिनती सुरू? ब्रिक्सचा सोन्याकडे निर्णायक कल

रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या मार्गावर? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3

रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या मार्गावर? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

मेक्सिकोत भीषण रेल्वे दुर्घटना! रुळावरुन प्रवासी ट्रेन घसरल्याने १३ जणांचा मृत्यू, भयावह VIDEO
4

मेक्सिकोत भीषण रेल्वे दुर्घटना! रुळावरुन प्रवासी ट्रेन घसरल्याने १३ जणांचा मृत्यू, भयावह VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.