मंगळवारी (१६ डिसेंबर) त्यांनी पंतप्रधान मोदी यांना ‘महान मित्र’ म्हणून संबोधत, भारत हा अमेरिकेसाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील महत्त्वाचा भागीदार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या दूतावासाने या संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टच केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ट्रम्प भारताला जगातील सर्वा प्राचीन सभ्यतांपैकी एक अद्भुत देश म्हणून गौरवतात. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार आहे. ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे , जेव्हा अमेरिकेने काही दिवसांपूर्वी भारताला PAX सिलिका इनिशिएटिव्हमधून वगळण्याचा निर्णय घेतला होता.
शिवाय काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली होती. दोन्ही नेत्यांनी भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय व्यापार, आर्थिक भागीदारी आणि धोरणात्मक सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. सध्या दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापार करारावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या चर्चेनंतर भारतावरील टॅरिफ (Tarrif) चा भार कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ऑगस्ट महिन्यात ट्रम्प यांनी भारतावर ५०% टॅरिफ लागू केले होते. यामध्ये रशियाकडून कच्चा तेलाच्या खरेदीवर अतिरिक्त शुल्कही त्यांनी लागू केला होता. यामुळे भारत अमेरिकेचे व्यापार संबंध, शिवाय राजनैतिक संबंधही काहिसे ताणले गेले होते. मात्र नुकत्याच मोदींवर कौतुकांच्या वर्षावानंतर दोन्ही देशांतली संबंध आता सुधारण्याच्या दिशेने वाट करत असल्याचे स्पष्ट होते.
“India is home to one of the world’s oldest civilizations. It is an amazing country and an important strategic partner for America in the Indo-Pacific region. We have a great friend in PM Modi” – President Donald J. Trump pic.twitter.com/lF3MWv10V6 — U.S. Embassy India (@USAndIndia) December 16, 2025
US-India Trade Update: अमेरिका-भारत व्यापारात तणाव! ट्रम्पच्या धोरणांनी अमेरिका स्वतःच नुकसानात?
Ans: ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना महान मित्र संबोधत भारत अमेरिकेसाठी इंडो पॅसिफिक क्षेत्रातील महत्त्वाचा भागीदार असल्याचे म्हटले.
Ans: काही दिवसांपूर्वी ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींमध्ये झालेल्या फोन संवादात द्विपक्षीय व्यापार, आर्थिक भागीदारी आणि धोरणात्मक सहकार्य वाढवण्यावर चर्चा करण्यात आली.
Ans: टॅरिफमुळे भारत आणि अमेरिकेतील संंबंधामध्ये तणाव निर्माण झाला होता.






