Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इकडे आड तिकडे विहीर! नेपाळ आर्थिक संकटात असतानाच भूकंपाचे सौम्य झटके

सध्या नेपाळमध्ये राजकीय गोंधळ सुरु आहे. याचदरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. शनिवारी (08 मार्च) नेपाळच्या दोन वेगवेगळ्या भागांत भूकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 08, 2025 | 02:45 PM
Twin earthquakes hit Nepal, no casualties

Twin earthquakes hit Nepal, no casualties

Follow Us
Follow Us:

काठमांडू: सध्या नेपाळमध्ये राजकीय गोंधळ सुरु आहे. याचदरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. शनिवारी (08 मार्च) नेपाळच्या दोन भूकंपाचे सौम्य झटके जाणवले आहेत. मात्र, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. नेपाळ राष्ट्रीय भूकंप केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळची राजधानी काठमांडूपासून 30 किमी अंतरावरील बांगलुंग जिल्ह्यात 4.1 तीव्रतेच्या भूकंपाचा झटका जाणवला.  या भूकंपाचे केंद्र खुखानी शहरात होते.

दोन वेळा नेपाळची जमीन हादरली

बांगलुंगपासून 40 किमी अंतरावर असलेल्या म्याग्दी जिल्ह्यात पहाटे 3:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूंकपाची तीव्रता 4 रिश्टर स्केलवर होती. या भूकंपाचे क्रेंद्रबिंदू म्याग्दी जिल्ह्यातील मुरी भागात होते. अशी माहिती भूकंप देखरेख केंद्राने दिली. हा झटका 4 रिश्टर स्केलचा असल्याने सौम्य धक्का जाणवला. कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

याआधीही भूकंप 

यापूर्वीही 28 फेब्रुवारी रोजी नेपाळमध्ये 6.1 तीव्रतेच्या धक्क्याने नेपाळची जमीन हादरली होती. हा भूकंप इतका जोरदार होता की, यामुळे लोकांच्या घराचे पंखे, खिडक्या आणि दरवाजेही हादरले होते. राष्ट्रीय भूकंप केंद्र आणि संशोधन केंद्राने याची पुष्टी केली होती. केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र काठमांडूपासून 65 किमी अंतरावर पूर्वेला होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- नेपाळ-तिबेटच्या भूकंपात आत्तापर्यंत 53 जणांचा बळी; शोधकार्य अद्यापही सुरुच

भूकंप का आणि कसे होतात?

भूकंप वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी पृथ्वीची रचना समजून घेणे महत्त्वाचे आहे. पृथ्वी टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. याखाली द्रवरूप लावाचे थर असतात, ज्यावर या प्लेट्स तरंगत असतात.

भूकंप घडण्याची प्रक्रिया

  • टेक्टोनिक प्लेट्स सतत हलत असतात आणि अनेकदा एकमेकांवर आदळतात.
  • या हालचालींमुळे काहीवेळा प्लेट्सच्या किनारी भागात मोठा दाब निर्माण होतो.
  • हा दाब मर्यादेच्या पलीकडे गेल्यावर प्लेट्सचा काही भाग अचानक तुटतो किंवा सरकतो.
  • याच प्रक्रियेमुळे निर्माण झालेली उर्जा जमिनीतून बाहेर पडते आणि भूकंप होतो.
नेपाळमध्येच सारखे भूकंप का?

आयआयटी कानपूरच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक आणि भूविज्ञान अभियांत्रिकीतील तज्ज्ञ प्रा. जावेद एन मलिक यांच्या मते, 2015 मध्ये नेपाळमध्ये 7.8 ते 8.1 तीव्रतेचे भूकंपही झाले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्व नेपाळ होता. हिमालय पर्वतरांगातील अस्थिर टेक्टोनिक प्लेट्समुळे भूकंपाचे धक्के जाणवत राहतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेच्या ‘या’ निर्णयाने नेपाळची अर्थव्यवस्था कोलमडली; जनतेकडून घ्यावे लागत आहे कर्ज

Web Title: Twin earthquakes hit nepal no casualties

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • earthquakes
  • nepal
  • World news

संबंधित बातम्या

Independence Day: पाकिस्तान ते बीजिंगपर्यंत फडकला तिरंगा; जगभरात भारतीय दूतावासांमध्ये 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
1

Independence Day: पाकिस्तान ते बीजिंगपर्यंत फडकला तिरंगा; जगभरात भारतीय दूतावासांमध्ये 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Indonesia Earthquake: ‘सर्वत्र किंकाळ्या आणि शोक…’ इंडोनेशियात भूकंपाचा कहर, 38 जणांचा मृत्यू, 2,000 बेघर, पहा VIDEO
2

Indonesia Earthquake: ‘सर्वत्र किंकाळ्या आणि शोक…’ इंडोनेशियात भूकंपाचा कहर, 38 जणांचा मृत्यू, 2,000 बेघर, पहा VIDEO

Giorgia Meloni vs Gen Z: इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यावर का भडकली तरुण पिढी? 2027 मध्ये सत्तापालटाची शक्यता
3

Giorgia Meloni vs Gen Z: इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यावर का भडकली तरुण पिढी? 2027 मध्ये सत्तापालटाची शक्यता

Rohingya Crisis: म्यानमार सरकारची मोठी घोषणा; बांगलादेशातून 3 लाखांहून अधिक रोहिंग्या मुस्लिमांची स्वदेशी वापसी होणार
4

Rohingya Crisis: म्यानमार सरकारची मोठी घोषणा; बांगलादेशातून 3 लाखांहून अधिक रोहिंग्या मुस्लिमांची स्वदेशी वापसी होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.