Nepal-Tibet earthquake: नेपाळ-तिबेटच्या भूकंपात आत्तापर्यंत 53 जणांचा बळी; शोधकार्य अद्यापही सुरुच(फोटो सौजन्य: iStock)
नवी दिल्ली: नेपाळ-तिबेटमध्ये 7.1 तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार धक्के आज पहाटे जाणवले आहेत. मंगळवारी (7 जानेवारी) सकाळी तिबेटमधील शिगात्से शहरात 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला, यामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली. दरम्यान या भीषण भूकंपामुळे आत्तापर्यंत 53 लोकांचा बळी गेल्याची माहिची मिळाली असून अद्याप शोधकार्य सुरु आहे. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. तिबेटमध्ये झालेल्या या भूकंपाच्या धक्क्यांनी चीन नेपाळ, भारत , बांगलादेशसह इतर अनेक देश हादरले आहेत.
7.1 रिश्टर स्केलचा भूकंप
नेपाळच्या भूकंप विज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6:35 वाजता नेपाळमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, हा भूकंप नेपाळ-चीन सीमेवरील तिबेटमधील डिंगे कांती येथे केंद्रित होता. हा भूकंप 7.1 तीव्रतेचा होता. या भूकंपाचा प्रभाव नेपाळच्या पूर्व ते मध्य भागात दिसून आला, यामुळे काठमांडूसह अनेक भागांतील नागरिक भयभीत झाले आहेत. हा भूकंप 10 किलोमीटर खोलीपर्यंत पसरला. या भूकंपाचे हादरे तिबेटसोबतच नेपाळमध्ये काही भागांमध्ये जाणवले.
भारताच्या इतर भागांमध्येही भूकंपाचा फटका
याशिवाय, तिबेटमधील भूकंपाने नेपाळ, चीन आणि बांगलादेश अनेक देशांमध्ये, दिल्ली-NCR, बिहार, आणि पश्चिम बंगालसह भारताच्या अनेक भांगांमध्ये देखील याचा फटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या वेळी पहिल्या भूकंपानंतर झालेला दुसरा हादर सात वाजता 4.7 तीव्रतेचा होता.
काठमांडूमध्येही भूकंपाचे परिणाम
नेपाळची राजधानी काठमांडूमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपामुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि अनेक लोक घराबाहेर पडले. गेल्या काही काळात काठमांडूमध्ये इतक्या तीव्रतेचा भूकंप जाणवला नव्हता. भूकंपामुळे नुकसान झाले आहे की नाही, याची अजून स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नेपाळच्या अन्य भागांतील लोकांनीही भूकंपाचे हादरे जाणवल्याचे सांगितले आहे.
भूकंपाचे केंद्र आणि त्याचा परिणाम
चीनच्या भूकंप नेटवर्क केंद्राने जारी केलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र तिबेटच्या शिगात्से शहरात होते. हे धक्के समुद्रसपाटीपासून 10 किलोमीटर खाली होते. नेपाळ सरकारने देखील पुष्टी केली की भूकंपाचे केंद्र नेपाळ-चीन सीमेवरील तिबेटमधील डिंगे कांती येथे होते. या भूकंपामुळे तिबेट आणि नेपाळमधील अनेक भागांना हादरे बसले. यामुळे दोन्ही देशांतील लोक भयभीत झाले आणि सुरक्षिततेसाठी घराबाहेर पडले. सध्या या भूकंपामुळे नेमका किती जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले आहे, याची माहिती नाही. मात्र, प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी सुरू केली आहे. भविष्यातील धोक्याचा अंदाज घेत स्थानिक प्रशासन लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे.