Iran Attack US : इराणच्या आकाशात अमेरिकेच्या F-35 Lightning II ची शिकार; १०० दशलक्ष डॉलर्सचं नुकसान ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
US F-35 Emergency Landing Iran Attack : मध्य-पूर्वेतील रणसंग्राम (US-Israel Iran War) आता एका अशा वळणावर आला आहे, जिथे जगातील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या अमेरिकन हवाई दलाला थेट आव्हान दिले जात आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षात आता अमेरिकेची थेट एन्ट्री झाली असून, इराणच्या एका भीषण हल्ल्यात अमेरिकेचे सर्वात महागडे आणि अत्याधुनिक लढाऊ विमान F-35 Lightning II संकटात सापडले. या घटनेने केवळ अमेरिकन लष्कराचीच नाही, तर संपूर्ण जगाची झोप उडवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणमध्ये एका गुप्त लढाऊ मोहिमेवर असताना अमेरिकेच्या F-35 विमानाला इराणच्या संरक्षण यंत्रणेने लक्ष्य केले. यूएस सेंट्रल कमांडचे (CENTCOM) प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इराणने केलेल्या हल्ल्यात विमानाला गंभीर तांत्रिक इजा पोहोचली, ज्यामुळे वैमानिकाला मिशन अर्धवट सोडून जवळच्या हवाई तळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. इराणने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून या विमानावर हल्ला होत असल्याचे दाखवले आहे, ज्यामुळे या वादाला अधिक तोंड फुटले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-Iran ties: ‘इराण युद्ध जिंकेल आणि भारत…’ RAWच्या माजी प्रमुखांचा खळबळजनक दावा; दोन्ही देशांमधील संबंधांवर टाकला प्रकाश
F-35 हे जगातील सर्वात प्रगत ‘पाचव्या पिढीतील’ (5th Generation) लढाऊ विमान मानले जाते. याची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
१. स्टेल्थ तंत्रज्ञान: हे विमान शत्रूच्या रडारवर दिसत नाही, असे मानले जाते. याला ‘अदृश्य’ विमानही म्हटले जाते.
२. प्रचंड किंमत: एका विमानाची किंमत १०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त (सुमारे ८५० कोटी रुपये) आहे.
३. अत्याधुनिक सेन्सर्स: हे विमान एकाच वेळी अनेक शत्रूंवर नजर ठेवू शकते आणि माहिती गोळा करू शकते.
४. बहुआयामी भूमिका: हे विमान एकाच वेळी बॉम्बर, फायटर आणि गुप्तहेर म्हणून काम करू शकते.
F-35 हे विमान ‘स्टेल्थ’ क्षमतेसाठी ओळखले जाते. जर इराणने या विमानाला रडारवर पकडले असेल किंवा त्यावर यशस्वी हल्ला केला असेल, तर याचा अर्थ असा की इराणकडे अमेरिकेच्या अदृश्य तंत्रज्ञानाला रोखणारे प्रगत रडार किंवा क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या या संघर्षात अमेरिकेच्या विमानावर इराणने केलेला हा पहिलाच मोठा हल्ला आहे. या घटनेमुळे अमेरिकेच्या हवाई वर्चस्वाला मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
विमान सुरक्षितपणे उतरले असून वैमानिकही सुखरूप आहे, ही अमेरिकेसाठी दिलासादायक बाब असली तरी, विमानाचे झालेले नुकसान तांत्रिक बिघाडामुळे आहे की इराणच्या थेट हल्ल्यामुळे, याची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. जर हे विमान इराणच्या क्षेपणास्त्राने पाडले असते किंवा ते कोसळले असते, तर अमेरिकेचे कोट्यवधींचे नुकसान झाले असतेच, पण त्यांची गुप्त तांत्रिक माहितीही शत्रूच्या हाती लागली असती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ohio Meteor : अंतकाळाच्या सावटाखालील जग! NASA फेल, रडार शांत; कोणत्याही इशाऱ्याशिवाय पृथ्वीवर आदळला मोठा लघुग्रह
या घटनेनंतर अमेरिका आता इराणवर पलटवार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इस्रायल आणि अमेरिका दोघेही या प्रदेशात F-35 विमाने तैनात करत आहेत. मात्र, इराणच्या या प्रतिकारामुळे आता या लढाऊ विमानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. येत्या काही दिवसांत इराण आणि अमेरिकेतील हा ‘हवाई संघर्ष’ अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
Ans: नाही, विमानाचे नुकसान झाले आहे, मात्र वैमानिकाने यशस्वीपणे आपत्कालीन लँडिंग केले असून विमान आणि वैमानिक दोन्ही सुरक्षित आहेत.
Ans: एका F-35 विमानाची किंमत अंदाजे १०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा (सुमारे ८५० कोटी रुपये) जास्त आहे.
Ans: इराणने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये एफ-३५ विमानाला लक्ष्य केले जात असल्याचे आणि त्यावर हल्ला होत असल्याचे दिसत आहे.






