
uae mirage 2000 9 attack on iran lavan island oil refinery war updates 2026
UAE Mirage 2000-9 attack on Iran : आखाती देशांमधील युद्धविरामाची चर्चा सुरू असतानाच ८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता इराणमधील लावान बेटावर झालेल्या एका भीषण स्फोटाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. इराणच्या नॅशनल इराणी ऑइल रिफायनिंग अँड डिस्ट्रिब्युशन कंपनीच्या या महत्त्वाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर झालेल्या हल्ल्याने केवळ मालमत्तेचे नुकसान केले नाही, तर जागतिक शांततेच्या प्रयत्नांनाही मोठा तडा दिला आहे. या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे? हा प्रश्न विचारला जात असतानाच ‘मिराज २०००-९’ या लढाऊ विमानाचे नाव समोर आले असून, याचे धागेदोरे थेट संयुक्त अरब अमिरातीशी (UAE) जोडले जात आहेत.
या हल्ल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने तातडीने स्पष्ट केले की, त्यांनी या तेल प्रकल्पावर कोणताही हल्ला केलेला नाही. मात्र, सोशल मीडियावरील ‘ओपन सोर्स इंटेलिजन्स’ (OSINT) प्लॅटफॉर्मवर काही फोटो प्रसिद्ध झाले आहेत. या फोटोंनुसार, लावान बेटावर बॉम्बफेक करण्यासाठी ‘मिराज २०००-९’ विमानाचा वापर झाला होता. विशेष म्हणजे, जगातील केवळ युएई हा एकमेव देश आहे जो या विशिष्ट प्रगत आवृत्तीचे विमान वापरतो. फ्रेंच कंपनी डसॉल्टने हे विमान विशेषतः युएईच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन केले आहे. त्यामुळे हा हल्ला युएईनेच केला असावा, असा दाट संशय निर्माण झाला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran No Talks : इस्लामाबाद किल्ल्यासारखं सजवलं, पण पाहुणेच गायब; इराणचा शांतता चर्चेला सणसणीत नकार, त्यात पाकिस्तानचा अपमान
काही संरक्षण तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेने लादलेला युद्धविराम मोडीत काढण्यासाठी युएईने इस्रायलसोबत मिळून ही गुप्त मोहीम राबवली असावी. दुसरीकडे, युएईच्या संरक्षण मंत्रालयाने हे दावे फेटाळून लावले असून, त्यांनी म्हटले आहे की इराणकडून येणारे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे रोखण्यासाठी ही विमाने तैनात करण्यात आली होती. मात्र, इराणमध्ये यापूर्वी पाडण्यात आलेल्या चिनी ‘विंग लूंग II’ ड्रोनचे अवशेष सापडले आहेत, जे केवळ सौदी अरेबिया आणि युएई वापरतात. या सर्व घडामोडींमुळे युएई या युद्धात पडद्यामागून मोठी भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट होत आहे.
Iranian sources claim UAE Mirage‑2000‑9 jets struck Lavan Island refinery, while the U.S. says it and Israel were not involved. pic.twitter.com/4RxaYIGmNU — Open Source Intel (@Osint613) April 8, 2026
credit – social media and Twitter
ज्या विमानामुळे हा वाद निर्माण झाला आहे, ते मिराज २०००-९ हे मिराज कुटुंबातील सर्वात प्रगत लढाऊ विमान आहे. यात बसवलेले ‘RDY-2 रडार’ एकाच वेळी अनेक लक्ष्यांचा मागोवा घेऊ शकते. हे विमान केवळ हवेतून हवेतच नव्हे, तर जमिनीवरील लक्ष्यांवरही अचूक मारा करण्यास सक्षम आहे. ४५० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब वाहून नेण्याची आणि फ्रेंच ‘MICA’ क्षेपणास्त्राच्या मदतीने शेकडो किलोमीटर दूर असलेले लक्ष्य उद्ध्वस्त करण्याची याची क्षमता या विमानाला अत्यंत घातक बनवते. प्रगत लेझर डेझिग्नेशन पॉड्समुळे हे विमान रात्रीच्या अंधारातही शत्रूचा अचूक वेध घेऊ शकते.
VERY INTERESTING: Iranian military sources claim Mirage-2000-9 jets — operated by the UAE — were involved in the attack on the Lavan Island refinery today. Reports also say the U.S. told Iran the strikes were not linked to the U.S. or Israel. pic.twitter.com/tc2OYTQQtP — Clash Report (@clashreport) April 8, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Politics : पत्नीला ‘फायदा’ मिळवून देणे मंत्र्याला पडले महागात; पंतप्रधान बालेन शाह यांनी 15 दिवसांतच दाखवला बाहेरचा रस्ता
आपल्या लावान बेटावरील प्रकल्पावर हल्ला झाल्याच्या काही तासांतच इराणने ‘टिट फॉर टॅट’ (जशास तसे) उत्तर दिले. इराणची सरकारी वाहिनी IRIB ने दिलेल्या माहितीनुसार, इराणने युएई आणि कुवेतवर एकाच वेळी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. इराणचे म्हणणे आहे की, त्यांच्या भूमीवर हल्ला करणाऱ्या कोणत्याही देशाला सोडले जाणार नाही. या प्रत्युत्तरात्मक कारवाईमुळे कुवेत आणि युएईमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, जागतिक तेल बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे.
Ans: सोशल मीडियावरील दाव्यानुसार, हा हल्ला युएईच्या 'मिराज २०००-९' (Mirage 2000-9) या लढाऊ विमानातून झाला असल्याचा संशय आहे.
Ans: हे एक प्रगत चौथ्या पिढीचे विमान असून यात RDY-2 रडार आणि ४५० किलो वजनाचे बॉम्ब टाकण्याची क्षमता आहे, जे अचूक लेझर तंत्रज्ञानाने सज्ज आहे.
Ans: इराणने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि कुवेतवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे प्रत्युत्तरात्मक हल्ले केले आहेत.