UAE sentences 25 Indians to death over 10,000 nationals in foreign prisons
अबु धाबी: एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE)मध्ये 25 भारतीय नागरिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे असून अद्याप या लोकांना फाशी देण्यात आलेली नाही. भारतीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी ही माहिती दिली. कीर्ति वर्धन सिंह यांनी परदेशात तुरुंगात असलेल्या भारतीय कैद्यांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या 10 हजार 152 भारतीय कैदी तुरुंगात असून त्यांच्या विविध आरोपांखाली खटला सुरु आहे. वेगवेगळ्या देशाच्या तुरुंगात हे भारतीय कैदी आहेत. दरम्यान सिंह यांनी म्हटले की, परदेशी तुरुंगात असलेल्या या भारतीय नागरिकांची सुरक्षितता आणि कल्ल्याण सुनिश्चित करणे हे भारतीय सरकराचे प्रथम कर्तव्य आहे.
परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह दिलेल्या आकडेवारीनुसार, संयुक्त अरब अमिराती (UAE)मध्ये सर्वाधिक 25 भारतीयांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आकडेवारीनुसार, दुसऱ्या स्थानी सौदी अरेबिया असून 11 भारतीयांना, तर मलेशियात 6 जणांना कुवेतमध्ये 3 भारतीयांना मृत्यूदंड देण्यात आला आहे. यानंतर इंडोनेशिया, कतार, अमेरिका आणि येमेनमध्ये प्रत्येकी एक भारतीयाला कठोर शिक्षा ठोठवण्यात आली आहे.
सध्या भारत सरकार मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या भारतीय नागरिकांना कायदेशीर उपाययोजनांमध्ये मदत करत असल्याचे सिंह यांनी सांगितले. यामध्ये अपील दाखल करणे, दयायाचिका सादर करणे यांसारख्या मदतीचा समावेश आहे. “विविध देशांतील भारतीय दूतावास आणि मिशन्स या भारतीय नागरिकांना सर्वतोपरी मदत पुरवत आहे. न्यायालये, तुरुंग प्रशान, सरकारी वकील आणि इतर संबंधित यंत्रणांसोबत त्यांच्या प्रकरणांचा पाठपुरावा केला जात असल्याचेही कीर्ती वर्धन सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षाच कोणत्या ना कोणत्या देशांमध्ये भारतीय नागरिकांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. यामद्ये मलेशिया, कुवेत, कतार आणि सौदी अरेबियामध्ये सर्वाधिक खटले सुरु आहेत. आकडेवारीनुसार, 2024 मध्ये कुवेत आणि सौदी अरेबियात तीन भारतीयांना फाशी देण्यात आली होती, तर झिंबाब्वेत देखील एक भारतीय नागरिकाला मृत्यूदंड ठोठवण्यात आला होता.
शिवाय, 2023 मध्ये, कुवेत आणि सौदीमध्ये पाच भारतीयांना तर मलेशियात एका भारतीयांला मृत्यूदंड मिळाला होता. संयुक्त अरब अमिराती (UAE)संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी मिळालेली नाही. तरी अनौपचारिक माहितीवरुन 2020 ते 2024 दरम्यान भारतीय नागरिकाच्या फाशीची घटना समोर आलेली नाही.