Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! अफगाणिस्ताणमधील ब्रिटिश सैनिकांच्या काळ्या कृत्यांचा खुलासा; अल्पवयीन मुलांवर देखील अमानुष अत्याचार

अफगाणिस्ताणमध्ये तैनात असलेल्या ब्रिटीशच्या सैनिकांनी 2010 ते 2013 दरम्यान अनेक नागरिकांना ठार मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सैनिकांनी न्यायालयीन प्रक्रियेविना अनेकांना मारले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 12, 2025 | 10:02 AM
धक्कादायक! अफगाणिस्ताणमधील ब्रिटिश सैनिकांच्या काळ्या कृत्यांचा खुलासा; अल्पवयीन मुलांवर देखील अमानुष अत्याचार
Follow Us
Close
Follow Us:

काबूल: युद्ध एक अशी गोष्टी आहे, ज्यामुळे केवळ विनाश आणि दु:ख निर्माण होते. मानवी जीवन, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि समाजरचना उद्ध्वस्त होते. निर्दोष लोकांचा बळी जातो, तर पुढच्या पिढ्यांवरही याचे परिणाम होतात. युद्ध हा प्रश्न सुटण्याचा मार्ग नाही, तर तो अधिक समस्या निर्माण करतो. शांतता आणि संवाद हाच प्रगतीचा खरा मार्ग आहे. तरीही अनेक देश सध्या युद्ध लढत आहेत. यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे.

अफगाणिस्ताणमधील ब्रिटीश सैनिकांवर आरोप

अफगाणिस्ताणमध्ये तैनात असलेल्या ब्रिटीशच्या सैनिकांनी 2010 ते 2013 दरम्यान अनेक नागरिकांना ठार मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सैनिकांनी न्यायालयीन प्रक्रियेविना अनेकांना मारले आहे. फक्त हत्या करण्याचाच नाही तर आपले गुन्हे लपवण्याचा देखील आरोप सैनिकांवर आहे. या संदर्भात बुधवारी (8 जानेवारी 2025) एका तपशीलवार अहवालात या काळातील युद्ध अपराधांचा कच्चा चिठ्ठा उघड करण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ढाकाच्या ‘या’ निर्णयाने आणखी बिघडले भारत-बांगलादेश संबंध; काय आहे नेमकं प्रकरण?

युद्ध अपराधांची चौकशी

मिळालेल्या माहितीनुसार, युनायटेड किंगडमच्या संरक्षण मंत्रालयाने 2022 मद्ये या घटनेची चौकशी सुरु केली होती. या चौकशीदरम्यान, ब्रिटीश सैनिकांच्या विशेष तुकडीने अफगाण नागरिकांवर केलेल्या अत्याचारांची आणि हत्यांची सविस्तर माहिती समोर आली आहे. चौकशीच्या अहवालानुसार, ब्रिटिश विशेष वायु सेवेच्या (SAS) सैनिकांनी ‘गोल्डन पास’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या अधिकाराचा गैरवापर केला असून या अंतर्गत सैनिकांना लोकांना ठार मारण्याची मोकळीक मिळाली होती, यातून ते कोणत्याही प्रकारच्या कारवाईतून वाचू शकतात असे म्हटले जात आहे.

सात सैनिकांची गुप्त गवाही

चौकशीदरम्यान ब्रिटिशच्या विशेष तुकडीच्या सात सैनिकांनी आपली साक्ष दिली, मात्र सुरक्षा कारणास्तव त्यांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत. या गवाहीत उघड झाले की, अनेक पीडित 16 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. सैनिकांनी निहत्थ्या आणि निरपराध अफगाण नागरिकांची हत्या केल्याचे म्हटले आहे. गवाही देणाऱ्या एका सैनिकाने खुलासा केला आहे की, क्रूर कार्य लपवण्यासाठी विविध उपाय करण्यात आले. अनेक प्रकरणांमध्ये सैनिकांनी बंदी बनवलेल्या व्यक्तींपासून कोणताही धोका नसतानाही त्यांना ठार मारले.

युद्ध अपराधांविरोधातील न्यायाची लढाई

ब्रिटिश संरक्षण मंत्रालयाने या गंभीर घटनांची चौकशी सुरू केली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा तज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र, या घटनांनी ब्रिटिशांच्या नैतिकतेवर आणि जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या काळ्या कृत्यांमुळे अफगाण नागरिकांवरील ब्रिटिश सैन्याच्या वागणुकीची भीषणता उघड झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्ध अपराधांविरोधात न्याय मिळवण्यासाठी आवाज उठवण्याची गरज तज्ञांनी अधोरेखित केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘मी ट्रम्प यांना पराभूत करु शकलो असतो पण…’; बायडेन यांनी दिले अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचे स्पष्टीकरण

Web Title: Uk special forces crisis dark deeds of british soldiers in afghanistan are revealed war crimes reoprt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 02:27 AM

Topics:  

  • Afghanistan
  • World news

संबंधित बातम्या

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
1

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा
2

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
3

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
4

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.