'मी ट्रम्प यांना पराभूत करु शकलो असतो पण...'; बायडेन यांनी दिले अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचे स्पष्टीकरण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉश्गिंटन: 20 जानेवारी 2025 ला अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पदाभार सोडतील आणि डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील. दरम्यान अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ते 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभूत करू शकले असते, परंतु डेमोक्रेटिक पक्षाची एकता राखण्यासाठी त्यांनी निवडणूक लढण्याच्या शर्यतीतून माघार घेतली.
मी ट्रम्प यांनी पराभूत करु शकलो असतो – जो बायडेन
व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांना विचारण्यात आले की, “राष्ट्राध्यक्ष महोदय, तुम्हाला निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचा पश्चाताप होतो का? तुम्हाला वाटते का की, यामुळे तुमच्यासाठी परिस्थिती सोपी झाली?” यावर उत्तर देताना बायडेन यांनी “मला वाटत नाही की मी निर्णय चुकीचा घेतला. मी ट्रम्प यांनी पराभूत करु शकलो असतो याची मला खात्री होती.” याशिवाय , ” मला विश्वास होता की, कमला हॅरिस देखील ट्रम्प यांनी हरवू शकतील असेही ते म्हणाले.
पक्षाच्या हितासाठी घेतला निर्णय
त्यांनी सांगितले की, निवडणिकीतून माघार घेणे हा त्यांचा निर्णय त्यांच्या व्यक्तीगत विजयासाठी नव्हता. त्यांनी सांगितले की, पक्षाच्या एकतेबद्दल चिंता व्यक्त केली जात होती, यामुळे मला वाटले की पक्ष एकत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे. जरी मला वाटले की मी पुन्हा जिंकू शकलो असतो, तरी मला पक्षाच्या हितासाठी माघार घेणे योग्य वाटले.”
त्यांनी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणे हा त्यांच्या आयुष्यातील मोठा सन्मान असल्याचे सांगितले. पण मला असा नेता व्हायचे नव्हते जो पक्षाच्या अंतर्गत कलहामुळे निवडणुक हरला असे त्यांनी स्पष्ट शब्दात व्यक्त केले. यामुळएच त्यांनी अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेतल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी “उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस पक्षाला विजय मिळवून देतील असा त्यांनी विश्वास होता.”
कमला हॅरिस यांचा पराभव
जून 2024 मध्ये अटलांटामध्ये झालेल्या अध्यक्षीय वादविवादांमध्ये जो बाइडेन यांचे सुमार प्रदर्शन झाले. यानंतर त्यांच्या नेतृत्वावर पक्षाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. परिणामी, त्यांनी अध्यक्षीय निवडणुकीतून माघार घेतली आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला.
मात्र, अध्यक्षीय निवडणुकीत कमला हॅरिस यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात पराभव पत्करावा लागला. रिपब्लिकन पक्षाने या निवडणुकीत प्रचंड यश मिळवले. ट्रम्प यांना पुन्हा व्हाइट हाऊसमध्ये स्थान मिळाले, हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत कायम राहिले आणि सेनेटमध्येही त्यांनी विजय मिळवला. डेमोक्रेटिक पक्षासाठी ही निवडणूक मोठ्या प्रमाणात निराशाजनक ठरली.