UK Team Assesses Tihar Jail As India Seeks extradition of fugitives
एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताची फसवणूक करुन परेदशात गेलेल्या फरार आरोपींना लवकरच भारतात परत आणले जाणार आहे. यासाठीच्या हालचालींनी वेग धरला आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या क्राउम प्रॉक्सिक्यूशन सर्व्हिस (CPS) च्या पाच सदस्यीय पथकाने दिल्लीतील तिहार जेलची पाहणी केली. हा दौरा जुलैमध्ये झाला होता. याचा उद्देश भारताची आर्थिक फसवणूक करुन फरार झालेल्या आरोपींना भारतात आणण्यासाठी ब्रिटनच्या न्यायालयाकडून परवानगी मिळावी हा होता.
दरम्यान ब्रिटनच्या CPS पथकाने दिल्लीतील तिहार तुरुंगाची पाहणी केली आहे. याचा उद्देश तुरुंगातील परुस्थिती आणि सुरक्षितता तपासणे होती. ज्यामुळे मानवी हक्कांचे उल्लघन होणार नाही, हे ब्रिटीश न्यायालयाला समजवता येईल. हा दौरा हाय-प्रोफाइल फररा आरोपींना परत आणण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा एक महत्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
कोण आहेत फातिमा पैमन? ऑस्ट्रेलियन संसदेत Gen Z स्टाईलमधील टीकात्मक भाषणामुळे पुन्हा चर्चेत
CPS पथकाची थेट कैद्यांशी चर्चा
तिहार तुरुंगाच्या उच्च सुरक्षा विभागाला भेट देऊन पथकाने थेट कैद्यांशी संवाद साधला आहे. तुरुंगातील अधिकाऱ्यांनी त्यांना खात्री दिली आहे कीस नीरव मोदी किंवा विजय माल्यासारख्या हाय-प्रोफाइल आरोपींना तिहार तुरुंगात ठेवणे योग्य असेल. त्यांच्या सुरक्षेची स्वतंत्र काळजी घेतली जाईल. सुरक्षा, सुविधा आणि मुलभूत हक्कांचा पुरेपूर सन्मान केला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यासाठी विशेष एनक्लेव्ह बांधला जाणारा आहे.
या भेटीचा संदर्भ फररा आरोपींना परत आणण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. गेल्या काही वर्षात ब्रिटनच्या न्यायालयाने भारताच्या आरोपींच्या अनेक प्रत्यार्पणाच्या याचिका फेटाळला आहे. यामागे तिहार सारख्या कारागृहांमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होईल, गैरकायदेशी चौकशी आणि कैद्यावर अत्याचार होईल अशी कारणे देण्यात आली आहे. ब्रिटनच्या न्यायालयाच्या याच शंका दूर करण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांची भेट भारताने तिहार तुरुंगाला घडवून आणली आहे.
सध्या भारताचे एकूण १७८ आरोपींचे अर्ज विविध देशांमध्ये आहेत. याचील २० प्रकरणातील आरोपी ब्रिटनमध्ये आहेत. यामध्ये आर्थिक घोटाळ्यातील आरोपी विजय माल्या आणि नीरव मोदी यांच्यासह शस्त्रास्त्र व्यापार संजय भंडारीचा, तसेच काही खलिस्तानी नेत्यांचाही समावेश आहे. यामुळे भारताला ब्रिटनकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास भारताच्या प्रयत्नांना मोठे यश मिळेल.
ब्रिटनच्या पथकाचा तिहार तुरुंगाचा हा दौरा औपचारिक होता. हा दौरा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास प्रस्थापित करण्याचा एक भाग आहे. यामुळे माल्या आणि नीरवसारख्या इतर आरोपींना देखील विविध देशातून भारतात आणण्याची शक्यता निर्माण होईल असे मानले जात आहे.