Ukraine attacks Russia's largest oil refinery petrol shortage in Russia
युक्रेनने रशियाच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण केंद्रावर ड्रोन हल्ला करून मोठी आग लावली.
हल्ल्यांनंतर रशियात पेट्रोलची तीव्र कमतरता निर्माण झाली असून काही भागात पंप कोरडे पडले.
रशियाने तातडीने पेट्रोल निर्यातीवर बंदी घालत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
Russia Ukraine War Update : युक्रेन आणि रशिया यांच्यातील संघर्षाला तीन वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. युद्धाच्या रणांगणाबरोबरच आता ड्रोन हल्ल्यांनी या संघर्षाचे रूप आणखी भयावह केले आहे. नुकताच युक्रेनने रशियाच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण केंद्रावर मोठा ड्रोन हल्ला केला असून यामुळे रशियाच्या इंधन पुरवठा व्यवस्थेत मोठा ताण निर्माण झाला आहे.
लेनिनग्राड प्रदेशातील किरिशी रिफायनरी हा हल्ल्याचा प्रमुख बळी ठरला. ही रिफायनरी “सुरगुटनेफ्तेगास” या आघाडीच्या कंपनीच्या ताब्यात असून, दरवर्षी सुमारे १७.७ दशलक्ष मेट्रिक टन कच्चे तेल शुद्ध करण्याची क्षमता आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, दररोज तब्बल ३,५५,००० बॅरल तेल येथे शुद्ध केले जाते. अशा महत्त्वाच्या केंद्रावर हल्ला होणे हे केवळ आर्थिकच नव्हे तर धोरणात्मक धक्का मानला जातो.
🔥🔥Fuel crisis in russia after Ukrainian drone strikes on refineries
Gasoline shortages now hit 20+ regions.
Previously limited to the Far East and Crimea, in September it spread to:
Ryazan, Nizhny Novgorod, Saratov, Samara, Ulyanovsk, Penza, Rostov, Astrakhan, Kalmykia, and… pic.twitter.com/RAH7ECUK1g— Angelica Shalagina🇺🇦 (@angelshalagina) September 13, 2025
credit : social media
युक्रेनियन ड्रोनने रिफायनरीला लक्ष्य केल्यानंतर स्फोटाचे आवाज, ज्वाळांचे लोळ आणि धुराचे लोट संपूर्ण परिसरात दिसले. युक्रेनच्या जनरल स्टाफने रात्रीच्या आकाशात झेपावणाऱ्या आगीचे फोटो देखील जाहीर केले. प्रादेशिक गव्हर्नर अलेक्झांडर ड्रोजडेन्को यांनी सांगितले की, तीन ड्रोन पाडण्यात आले, मात्र त्याच्या अवशेषांमुळेच प्रतिष्ठानला आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण नुकसान लक्षणीय आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Qatar Strike : कतारमध्ये हमास नेत्यांना लक्ष्य करण्यास ‘मोसाद’ने दिला होता साफ नकार; नेतान्याहूंच्या हवाई हल्ल्यावर मोठा वाद
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या मते, केवळ एका रात्रीत क्रिमिया आणि अझोव्ह समुद्र परिसरात किमान ८० युक्रेनियन ड्रोन पाडण्यात आले. यावरून या युद्धात ड्रोन हे किती मोठे शस्त्र बनले आहे याची प्रचिती येते. दरम्यान, रशियन ड्रोन पोलंडमध्येही शिरल्याने नाटोला लढाऊ विमाने उड्डाण करावी लागली. या घडामोडींमुळे संघर्ष युक्रेनच्या सीमांपलीकडे पसरण्याची भीती अधिकच वाढली आहे.
हल्ल्यांनंतर रशियाच्या इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल निर्यातदार देश असूनही, रशियात गेल्या काही आठवड्यांपासून पेट्रोलचा तीव्र तुटवडा जाणवतो आहे. अनेक भागांतील पेट्रोल पंप कोरडे पडले आहेत. चालकांना तासन्तास रांगेत उभे राहून इंधन मिळवावे लागत आहे. काही ठिकाणी लोकांना “एकच टँक – अर्धे भरावे” अशी सक्ती करण्यात येत आहे.
Ukraine attacked an oil refinery in Kirishi, Leningrad Oblast, last night.
This is Russia’s largest oil refinery by fuel production volume.
Ukrainian sources report a successful attack. Regional authorities only mention the downing of drones in the village. pic.twitter.com/lX9qmTmAE0
— Sota News (@sotanews) September 14, 2025
credit : social media
स्थिती आणखी बिकट होऊ नये म्हणून रशियन प्रशासनाने तातडीने पेट्रोल निर्यातीवर बंदी लागू केली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत संपूर्ण बंदी, तर ३१ ऑक्टोबरपर्यंत व्यापारी व मध्यस्थांवर आंशिक बंदी असे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे जागतिक तेलबाजारातही अस्थिरता वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Kumari Devi : नेपाळची शक्तिदायिनी कुमारी देवी; आजही एक आलौकिक रहस्य, जिने आधीच वर्तवले होते देशाचे भविष्य
युक्रेनची भूमिका स्पष्ट आहे तो रशियासमोर झुकण्यास तयार नाही. त्यामुळे अशा हल्ल्यांची मालिका पुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे. रशियाकडूनही पलटवार तीव्र होताना दिसत आहे. परिणामी, या संघर्षाचा बोजा फक्त रणांगणावरच नाही तर सामान्य नागरिकांच्या खिशावर व जीवनमानावरही पडत आहे. युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याने रशियाच्या अर्थव्यवस्थेला आणि जनजीवनाला मोठा धक्का दिला आहे. इंधन टंचाईमुळे सामान्य रशियन नागरिक संकटात सापडले आहेत, तर जागतिक बाजारपेठेत अस्थिरतेचे वारे वाहू लागले आहेत. या संघर्षाचा पुढचा टप्पा किती भयंकर ठरतो, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.