Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Ukraine War : रशियाला अब्जावधींचा फटका! युक्रेनियन सैन्याने उडवला रशियन तेल प्रकल्प; आकाशात धुराचे लोट, पहा VIDEO

Russia Ukraine War : 'द वॉल स्ट्रीट जर्नल'मधील एका वृत्तानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने वाढत्या जागतिक इंधन किमतींचा हवाला देत, रशियन तेल प्रकल्पांवरील हल्ले थांबवण्यासाठी युक्रेनवर दबाव आणला होता. ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दबाव वाढला होता.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 01, 2026 | 03:30 PM
Ukraine Drone Strike Russia Novokuybyshevsk Oil Refinery Attack

Ukraine Drone Strike Russia Novokuybyshevsk Oil Refinery Attack

Follow Us
Follow Us:
  • नोव्होकुयबिशेव्स्क रिफायनरीवर हल्ला
  • आकाशात धुराचे लोट व प्रचंड आग
  • आर्थिक व लष्करी फटका

रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War ) यांच्यातील युद्धाचा भडका पुन्हा एकदा उडाला आहे. युक्रेनियन सैन्याने रशियाच्या आर्थिक आणि लष्करी कणा मानल्या जाणाऱ्या ऊर्जा क्षेत्रावर मोठा प्रहार करत समारा प्रदेशातील प्रसिद्ध नोव्होकुयबिशेव्स्क तेल शुद्धीकरण प्रकल्पावर (Novokuybyshevsk Oil Refinery) प्राणघातक ड्रोन हल्ला चढवला आहे. या भीषण हल्ल्यानंतर रिफायनरीच्या परिसरात आगीच्या प्रचंड ज्वाला उठल्या आणि संपूर्ण आकाशात धुराचे काळे लोट पसरले. या घटनेचे काही व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

युक्रेनियन फौजांनी रशियाच्या सीमेच्या आत खोलवर जाऊन केलेल्या या हल्ल्यामुळे रशियन प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. जवळपास दोन आठवड्यांच्या कालावधीनंतर युक्रेनने रशियन तेल प्रक्रिया केंद्रांवर अशा प्रकारचा मोठा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेतील निवडणुकांच्या राजकीय घडामोडी आणि जागतिक बाजारपेठेतील इंधनाचे वाढते दर या पार्श्वभूमीवर या हल्ल्याकडे जगभरातील राजकीय विश्लेषकांचे लक्ष वेधले गेले आहे.

ड्रोन हल्ल्यामुळे रिफायनरीला भीषण आग; डॅशकॅम व्हिडिओने उडवली खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनियन लांब पल्ल्याच्या कामिकाझे ड्रोन्सनी थेट नोव्होकुयबिशेव्स्क रिफायनरीच्या मुख्य प्रक्रियेच्या युनिट्सना लक्ष्य केले. हल्ल्याचा फटका बसताच रिफायनरीच्या परिसरात लागोपाठ स्फोट झाले आणि भीषण आग लागली. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका १६-सेकंदांच्या डॅशकॅम व्हिडिओमध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनातून रिफायनरीच्या दिशेने प्रचंड धूर आणि आगीचे लोट निघताना स्पष्टपणे दिसून येत आहेत.

स्थानिक प्रत्यक्षदर्शींच्या मते, स्फोटाचा आवाज इतका तीव्र होता की आजूबाजूचा परिसर हादरून गेला. रशियन हवाई संरक्षण यंत्रणेने काही ड्रोन्स पाडल्याचा दावा केला असला तरी, अनेक ड्रोन्स थेट रिफायनरीच्या संवेदनशील भागांवर आदळले. या हल्ल्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : G20Atlanta : भारत बनला ग्लोबल पीसमेकर; रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मांडले 3 मुख्य अजेंडे

 रोसनेफ्टचा प्रमुख प्रकल्प आणि दरवर्षी ८८ लाख टन प्रक्रिया क्षमता

नोव्होकुयबिशेव्स्क तेल रिफायनरी ही रशियातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी ‘रोसनेफ्ट’च्या (Rosneft) पूर्ण मालकीची आहे. हा प्रकल्प रशियन अर्थव्यवस्थेसाठी आणि लष्करासाठी अत्यंत मोलाचा मानला जातो. या रिफायनरीची वर्षाला सुमारे ८८ लाख मेट्रिक टन (८.८ मिलियन टन) कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्याची प्रचंड क्षमता आहे.

🔥 Well, this is something we’ve never seen before! At least 11 columns of smoke have risen above the Novokuybyshevsk oil refinery “Our complaints have finally been heard, and now they’re starting to take out the entire refinery in a single attack, rather than just one unit,” writes the monitoring channel Exilenova+. — NEXTA (@nexta_tv) October 30, 2026

credit – social media and Twitter

या ठिकाणी युरो-५ मानकाचे पेट्रोल, डिझेल, विमानाचे इंधन (Jet Fuel), वंगण (Lubricants), बिटुमेन आणि पेट्रोलियम कोक यांसारख्या उच्च दर्जाच्या पेट्रोलियम उत्पादनांची निर्मिती केली जाते. विशेष म्हणजे, रशियन हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी लागणारे विशेष इंधन याच प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पुरवले जाते. त्यामुळे या प्रकल्पावरील हल्ला हा थेट रशियन सैन्याच्या लढाऊ क्षमतेवर झालेला मोठा प्रहार मानला जात आहे.

 रशियन लष्करी पुरवठ्याची साखळी तोडण्याचा युक्रेनचा धोरणात्मक डाव

युक्रेन गेल्या काही महिन्यांपासून रशियाच्या अंतर्गत भागातील तेल डेपो, ऊर्जा प्रकल्प आणि रिफायनरीजवर सातत्याने ड्रोन हल्ले करत आहे. या रणनीतिमागे युक्रेनचा मुख्य हेतू रशियन सैन्याला आघाडीवर होणारा डिझेल आणि विमानांच्या इंधनाचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत करणे हा आहे.

Multiple fires raging at the Novokuybyshevsk oil refinery in Russia’s Samara Oblast following Ukrainian drone attack carried out in the early hours of October 30. In the video below, at least six separate piles of smoke rising from the territory of the refinery can be seen. https://t.co/08PPlKnkZf — Status-6 (@Archer83Able) October 30, 2026

credit – social media and Twitter

याआधी ऑगस्ट महिन्यातही युक्रेनियन सैन्याने या रिफायनरीला लक्ष्य केले होते. त्यावेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अधिकृत वक्तव्य करताना स्पष्ट केले होते की, त्यांच्या सैन्याने सीमारेषेपासून तब्बल १,००० किलोमीटर अंतरावर असलेल्या रशियन तेल प्रकल्पांना यशस्वीरीत्या उद्ध्वस्त केले आहे. रशियाला तेल निर्यातीतून मिळणारा अब्जावधी डॉलर्सचा महसूल रोखणे आणि युद्धासाठी लागणारा त्यांचा आर्थिक पुरवठा तोडणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश असल्याचे झेलेन्स्की यांनी ठामपणे सांगितले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Midterms : अमेरिकेच्या राजकारणात ‘भारतीय तडका; निवडणुक प्रचारात कुणी बनवला डोसा तर कुणी मंदिरात टेकले डोके, VIDEO VIRAL

 अमेरिकेचा दबाव आणि रशियन अर्थव्यवस्थेवरील गंभीर परिणाम

रशियन तेल प्रकल्पांवरील हल्ल्यांमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडण्याची भीती आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या प्रशासनाने जागतिक इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि महागाई रोखण्यासाठी युक्रेनला रशियन ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले न करण्याचा सल्ला दिला होता. परंतु, युद्धाच्या मैदानावर रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी युक्रेनने पुन्हा एकदा आपली आक्रमक मोहीम सुरू केली असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते.

या ताज्या ड्रोन हल्ल्यामुळे नोव्होकुयबिशेव्स्क रिफायनरीचे नेमके किती आर्थिक नुकसान झाले आहे, याचा अंदाज रशियन अधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. परंतु प्राथमिक अंदाजानुसार, रिफायनरीचे मुख्य प्रक्रिया युनिट बंद पडल्यास रशियाला दररोज लाखो डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागणार आहे. रशिया-युक्रेन युद्ध आता केवळ सीमारेषेपुरते मर्यादित न राहता रशियाच्या अंतर्गत आर्थिक केंद्रांपर्यंत पोहोचले आहे. युक्रेनच्या या धोरणात्मक ड्रोन हल्ल्यांमुळे रशियाच्या इंधन पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी दिवसांत रशिया या हल्ल्याला कसा आणि काय प्रत्युत्तर देतो, याकडे संपूर्ण जगाचे डोळे लागले आहेत.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: युक्रेनने रशियाच्या कोणत्या तेल रिफायनरीवर ड्रोन हल्ला केला आहे?

    Ans: युक्रेनने रशियाच्या समारा प्रदेशातील 'रोसनेफ्ट' कंपनीच्या मालकीच्या नोव्होकुयबिशेव्स्क (Novokuybyshevsk) तेल शुद्धीकरण प्रकल्पावर ड्रोन हल्ला केला आहे.

  • Que: नोव्होकुयबिशेव्स्क रिफायनरीची वर्षाची तेल प्रक्रिया क्षमता किती आहे?

    Ans: नोव्होकुयबिशेव्स्क रिफायनरी दरवर्षी अंदाजे ८८ लाख मेट्रिक टन (८.८ मिलियन टन) कच्च्या तेलावर प्रक्रिया करते.

  • Que: रशियन तेल प्रकल्पांवर युक्रेन ड्रोन हल्ले का करत आहे?

    Ans: रशियन सैन्याला होणारा डिझेल व जेट इंधनाचा पुरवठा खंडित करणे आणि युद्धासाठी रशियाला मिळणारा इंधन निर्यातीचा महसूल रोखणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

Web Title: Ukraine drone strike russia novokuybyshevsk oil refinery fire hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • oil
  • Russia Ukraine War
  • World news

संबंधित बातम्या

UK-India Ties : ‘गुलामगिरीबद्दल ब्रिटन भारताची माफी मागणार पण नुकसानभरपाई…’; पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांचे ऐतिहासिक विधान
1

UK-India Ties : ‘गुलामगिरीबद्दल ब्रिटन भारताची माफी मागणार पण नुकसानभरपाई…’; पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांचे ऐतिहासिक विधान

G20Atlanta : भारत बनला ग्लोबल पीसमेकर; रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मांडले 3 मुख्य अजेंडे
2

G20Atlanta : भारत बनला ग्लोबल पीसमेकर; रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मांडले 3 मुख्य अजेंडे

US Midterms : अमेरिकेच्या राजकारणात ‘भारतीय तडका; निवडणुक प्रचारात कुणी बनवला डोसा तर कुणी मंदिरात टेकले डोके, VIDEO VIRAL
3

US Midterms : अमेरिकेच्या राजकारणात ‘भारतीय तडका; निवडणुक प्रचारात कुणी बनवला डोसा तर कुणी मंदिरात टेकले डोके, VIDEO VIRAL

World News : रशिया युक्रेनच्या युद्धाची शिक्षा डॉल्फिनला ;काळ्या समुद्रातील १ लाख २० हजारांहून अधिक डॉल्फिनचा मृत्यू
4

World News : रशिया युक्रेनच्या युद्धाची शिक्षा डॉल्फिनला ;काळ्या समुद्रातील १ लाख २० हजारांहून अधिक डॉल्फिनचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.