Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News : रशिया युक्रेनच्या युद्धाची शिक्षा डॉल्फिनला ;काळ्या समुद्रातील १ लाख २० हजारांहून अधिक डॉल्फिनचा मृत्यू

World News :रशिया-युक्रेन युद्धामुळे काळ्या समुद्रातील सागरी जीवसृष्टीला मोठा फटका बसला आहे. संशोधकांच्या अंदाजानुसार १ लाख २० हजारांहून अधिक डॉल्फिन आणि इतर सागरी सस्तन प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. सोनारचे आवाज, सागरी स्फोट आणि तेलगळतीमुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून सागरी परिसंस्था पूर्ववत होण्यासाठी ३० ते ५० वर्षे लागू शकतात.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 31, 2026 | 05:26 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • स्फोट आणि सोनाराच्या आवाजामुळे डॉल्फिनची दिशाभूल
  • तेलगळती आणि रासायनिक प्रदूषणाचा धोका
  • सागरी जीवसृष्टी सुधारण्यासाठी लागणार खूपच मोठा काळ
World News : रशिया आणि युक्रेनच्या सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम हा केवळ माणसावरच होत आहे असे नाही . माणसांचे जीवन , पायाभूत सुविधा या नष्ट तर होतातच . पण याच बरोबर खूपच महत्वाचा निसर्ग देखील नष्ट होत असतो . या माणसांच्या भांडणात आता काळ्या समुद्रामधील सागरी जीवसृष्टीवर गंभीर परिणाम होत आहेत .

युद्धामुळे आत्तापर्यंत १ लाख २० हजारांहून जास्तच डॉल्फिन आणि इतर सागरी सस्तन प्राण्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज युक्रेनमधील संशोधकांनी व्यक्त केला आहे . यामुळे काळ्या समुद्रातील नैसर्गिक परिसंस्थेसमोर मोठे संकट उभे राहिले आहे . याची किंमत खूप मोठी असून येणाऱ्या काळात ती माणसाला चुकवावी लागणार आहे .

स्फोट आणि सोनाराच्या आवाजामुळे डॉल्फिनची दिशाभूल

रशियन सैन्याकडून वापरण्यात येणारी शक्तिशाली सोनार यंत्रणा ,क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण आणि समुद्राखाली होणारे स्फोट डॉल्फिनसाठी घातक ठरत आहेत . डॉल्फिन हे दिशेचा अंदाज घेण्यासाठी आणि अन्न शोधण्यासाठी प्रतिध्वनीवर आधारित यंत्रणेचा वापर करतात .

मात्र युद्धातील मोठ्या आवाजामुळे त्यांच्या या नैसर्गिक क्षमतेवर परिणाम होत आहे . त्यांना दिशा ओळखणे , एकमेकांशी संपर्क साधने आणि अन्न शोधणे कठीण होत आहे . काही डॉल्फिन समुद्रकिनाऱ्यावर मृतावस्थेत आढळत असून अनेकांचे मृतदेह समुद्राच्या तळाशी जात असल्याने प्रत्यक्ष मृत्यूंची संख्या मोजनेही कठीण आहे .

Kim Jong Un : किम जोंग-उन यांना रोखण्यासाठी ‘या’ तीन महासत्ता एकत्र; उत्तर कोरियाच्या न्यूक्लीयर ताकदीविरोधात मोठी रणनीती

तेलगळती आणि रासायनिक प्रदूषणाचा धोका

युद्ध सुरु असताना अनेक युद्धनौका , तेलवाहुन ,मालवाहतूक करणारी जहाजे यांचे नुकसान झाले आहे . त्यामुळे समुद्रात तेल , इंधन आणि इतर रासायनिक पदार्थांची गळती मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि होत सुद्धा आहे . या प्रदूषणाचा परिणाम समुद्रातील मासे , शिंपले आणि इतर बऱ्याच जलचरांवर होत आहे .

यामुळे खूपच मौल्यवान अशी अन्नसाखळी विस्कळीत झाल्याने संपूर्ण सागरी परिसंस्थेला धोका निर्माण झाला आहे . समुद्रकिनाऱ्यावरील पक्षांनाही युद्धातील ड्रोन आणि स्फोटांच्या आवाजाचा फटका बसत असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे .

Poland Crisis : पोलंडमध्ये मोठा राजकीय भूकंप! सर्वोच्च न्यायालयातील ‘या’ वादानंतर राष्ट्रपतींनी थांबवला परदेश दौरा, विमान परतले

सागरी जीवसृष्टी सुधारण्यासाठी लागणार खूपच मोठा काळ

युक्रेनमधील तुझली लगून्स राष्ट्रीय उद्यानाचे संशोधनप्रमुख इव्हान रुसेव्ह यांच्या अंदाजानुसार, २०२२ मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर डॉल्फिनच्या मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. २०२६ पर्यंत मृत्यूंचा अंदाज १ लाख २० हजारांच्या पुढे गेला आहे. काळ्या समुद्रातील एकूण सागरी सस्तन प्राण्यांच्या संख्येच्या तुलनेत हा मोठा धक्का असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

युद्ध संपल्यानंतरही या जीवसृष्टीला पूर्वपदावर येण्यासाठी ३० ते ५० वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धाचा पर्यावरणावर उमटणारा परिणाम कित्येक दशकांपर्यंत कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे . यामुळे नैसर्गिक संपत्ती सुद्धा या युद्धामुळे पणाला लागली आहे .

 

Web Title: World news russia ukraine war black sea dolphin deaths 120000 marine life destruction cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • dolphin
  • Marathi News
  • Russia Ukraine War

संबंधित बातम्या

CLAT 2027: लॉ प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपणार; ‘या’ तारखेला होणार परीक्षा
1

CLAT 2027: लॉ प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपणार; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

Nagpur News : पाणीटंचाईचे संकट गडद; लवकरच कपात ;तोतलाडोह आणि कन्हानमधील जलसाठा निम्म्यावर
2

Nagpur News : पाणीटंचाईचे संकट गडद; लवकरच कपात ;तोतलाडोह आणि कन्हानमधील जलसाठा निम्म्यावर

UNESCO Report 2026: शिक्षणाबाबत अत्यंत धक्कादायक अहवाल!  ९५ टक्के तरुणांना पूर्ण शिक्षण मिळायला २१०५ उजाडणार
3

UNESCO Report 2026: शिक्षणाबाबत अत्यंत धक्कादायक अहवाल! ९५ टक्के तरुणांना पूर्ण शिक्षण मिळायला २१०५ उजाडणार

Nagpur News :बांधकाम सुरु असताना गणेशपेठेत क्रेन कोसळली; दोघांचा मृत्यू
4

Nagpur News :बांधकाम सुरु असताना गणेशपेठेत क्रेन कोसळली; दोघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.