Ukraine killed 1240 Russian soldiers before ceasefire talks begin
कीव: गेल्या तीन वर्षापासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी देखील तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये युद्धबंदी चर्चेचा प्रस्तावर मांडला आहे. परंतु ही बैठक होण्याच्या २४ तासांपूर्वीच युक्रेनने रशियाविरोधात मोठी कारवाई केली आहे. यामुळे दोन्ही देशांत पुन्हा तणाव भडकण्याची शक्यता आहे. तसेच रशियाने देखील युक्रेनविरोधात कारवाई केली आहे.
एकीकडे रशियाने युक्रेनच्या तोफखाना नष्ट केल्या आहेत, याच वेळी युक्रेनने रशियन सैन्यावर हल्ला केला आहे. युक्रेनने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सैन्याने गेल्या २४ तासांमध्ये १२०० हून अधिक रशियन सैनिकांना ठार केले आहे.
द कीव्ह इंडिपेंडेंटने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेन दर तासाला ५२ रशियन सैनिकांचा खात्मा करत आहे. गेल्या २४ तासांमध्ये १२४० रशियन सैनिकांची गोळ्या गालून हत्या करण्यात आली आहे. तसेच रशियाच्या ४७ तोफखाना आणि २ टॅंक देखील नष्ट करण्यात आल्या आहे. युक्रनने रशियाचे एक एमएलआरएसल आणि १४ एएफव्ही हाणून पाडले आहे. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सुरु असलेल्या युद्धात रशियाने आतापर्यंत ९ लाख ७० हजार सैनिक मारले गेले आहे. दरम्यान रशियन सरकारने अद्याप याची अधिकृत पुष्टी केलेली नाही.
याच वेळी रशियाने देखील युक्रेनविरोधात मोठा कारवाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रशियन सैन्याने युक्रेनमधील सुमी शहरातील तोफखानांचे युनिट उद्ध्वस्त केले आहे. रशियन संरक्षण मंत्रालयने याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जारी केला आहे.
रशियाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ग्रॅड-एमएलआरएसवरुन सुमी शहरावर जोरदार हल्ला केला. दोन्ही देशांनी हल्ल्याचे आकडे जाहीर केले आहेत. सध्या दोन्ही देशात ३० दिवसांचा युद्धविराम सुरु आहे.
दरम्यान तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये पहिल्यांदाच रशिया आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आमने-सामने येणार आहेत. युद्धबंदीच्या चर्चेचा हा प्रस्ताव स्वत:हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी मांडला आहे. झेलेन्स्की यांनी हा प्रस्ताव स्वीकारला आहे. या चर्चेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान चर्चेनंतर रशिया-युक्रेन संघर्ष काय वळण घेईल यामध्ये अनिश्चितता आहे. जागतिक स्तरावर तीन वर्षापासून सुरु असलेले हे युद्ध थांबेल अशी आशा व्यक्त केलीज जात आहे.