Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ukraine Russia: क्रेनचे ‘हाय-टेक’ प्रत्युत्तर! २५ हजार रोबोट्स रशियाच्या सैन्याचा करणार खात्मा; पाहा ‘के-२ ब्रिगेड’चा थरार

Ukraine Russia: युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने २०२६ पर्यंत २५,००० मानवरहित जमिनीवरील वाहने (UGVs) खरेदी करण्याचे कंत्राट दिले आहे, जे गेल्या वर्षीच्या एकूण संख्येच्या दुप्पटीहून अधिक आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 10, 2026 | 02:52 PM
ukraine robot force 25000 ugvs russia war k2 brigade 2026

ukraine robot force 25000 ugvs russia war k2 brigade 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • युक्रेनची ‘रोबोटिक क्रांती’
  • सैनिकांचे प्राण वाचवण्यास प्राधान्य
  • जगातील पहिली मानवरहित ब्रिगेड

Ukraine Robot Force 2026 : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला (Russia Ukraine War) आता चार वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. हे युद्ध केवळ शस्त्रास्त्रांचे राहिले नसून आता ते प्रगत तंत्रज्ञानाचे युद्ध बनले आहे. रशियाच्या अफाट लष्करी ताकदीला तोंड देण्यासाठी युक्रेनने आता एक असा पत्ता बाहेर काढला आहे, ज्यामुळे रशियन गोटात भीतीचे वातावरण पसरले आहे. युक्रेनने आता युद्धभूमीवर २५,००० ‘रोबोटिक सोल्जर्स’ किंवा मानवरहित जमिनीवरील वाहने (UGVs) तैनात करण्याची मोठी मोहीम हाती घेतली आहे. हे रोबोट्स येणाऱ्या काळात युद्धाची संपूर्ण दिशा बदलण्याची क्षमता ठेवतात.

युक्रेनची ‘भविष्यवेधी’ युद्धनीती

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०२६ पर्यंत २५,००० हून अधिक रोबोटिक वाहने खरेदी करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. हे रोबोट्स केवळ यंत्रे नसून ते रणभूमीवरील अत्यंत चपळ ‘योद्धे’ आहेत. ‘द सन’च्या वृत्तानुसार, हे रोबोट्स शत्रूच्या भागात जाऊन गुप्तपणे सुरुंग पेरणे, जखमी सैनिकांना वाचवणे आणि रसद पोहोचवणे यांसारखी जोखमीची कामे सहजपणे करत आहेत. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नुकतेच जाहीर केले की, एकट्या एप्रिल महिन्यात या रोबोट्सनी १०,२८१ यशस्वी मोहिमा पार पाडल्या आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global India:’ते सोबत रामायण अन् गीता घेऊन आले होते!’ PM कमला प्रसाद यांच्या भाषणाने भारतीय अंतर्मुख; नेल्सन बेटाचे होणार नामांतर

लष्करी इतिहासातील पहिला प्रयोग: के-२ ब्रिगेड

युक्रेनची ‘एलिट के-२’ ही जगातील पहिली अशी लष्करी तुकडी बनली आहे, जी पूर्णपणे रोबोटिक युद्धासाठी ओळखली जाते. या ब्रिगेडचे कमांडर मेजर ओलेक्झांडर अफनास्येव यांच्या मते, त्यांच्याकडे आता हजारो यूजीव्ही (UGVs) आहेत, जे शत्रूच्या ड्रोन हल्ल्यांपासून वाचून आपली कामगिरी फत्ते करतात. जेव्हा रशियन ड्रोन्समुळे मोकळ्या मैदानात सैनिकांचे पाऊल टाकणेही कठीण झाले होते, तेव्हा या रोबोट्सनी ‘तारणहार’ म्हणून काम केले. चिलखती वाहने नष्ट होत असताना आणि सैनिकांची कमतरता भासत असताना, या रोबोट्सनी रसद पुरवठ्याची १०० टक्के जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे.

Ukraine’s Shift to Robotic Battlefield Operations Ukraine is transitioning its battlefield strategy by incorporating robotic systems for assault and support missions. This aims to reduce the risk to soldiers on the front lines. Several advanced robotic systems are becoming… pic.twitter.com/5H9C64LFGE — Netram Defence Review (@NetramDefence) May 8, 2026

credit – social media and Twitter

‘अर्दाल’ रोबोटची थरारक कथा

युद्धभूमीवरील या रोबोट्सच्या सामर्थ्याचे एक उदाहरण म्हणजे ‘अर्दाल’ नावाचा रोबोट. अलीकडेच एका पुलावर अँटी-टँक माईन्स (सुरुंग) पेरण्यासाठी अर्दालला पाठवण्यात आले होते. कामगिरी करत असतानाच चालकांना तीन रशियन सैनिक जवळ असल्याचे दिसले. रोबोट चालवणाऱ्या युक्रेनियन सैनिकांनी क्षणाचाही विलंब न लावता रोबोटची दिशा बदलली आणि रशियन सैनिकांच्या जवळ नेऊन स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात तिन्ही रशियन सैनिक जागीच ठार झाले. हे उदाहरण सिद्ध करते की, हे रोबोट्स केवळ मदतीसाठी नसून आक्रमक हल्ल्यांसाठीही तितकेच सक्षम आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Sindhu 2.0: ‘दुसरी संधी नक्की मिळेल!’ पंतप्रधान मोदींच्या एका इशाऱ्यानंतर ‘ही’ संरक्षण यंत्रणाच करणार पहिला वार

आगामी काळातील वाढते आव्हान

युक्रेन आता या रोबोट्सवर फ्लेमथ्रोअर्स आणि रशियन सैनिकांकडून जप्त केलेल्या रायफल्स बसवून त्यांची मारक क्षमता वाढवत आहे. हायब्रीड इंजिनच्या वापरामुळे या रोबोट्सची रेंज ३० मैलांवरून थेट ९० मैलांपर्यंत वाढणार आहे. याचा अर्थ असा की, हे रोबोट्स रशियन सीमांच्या खूप आतपर्यंत घुसून हल्ला करू शकतील. युक्रेनचे संरक्षण मंत्री मिखाइलो फेडोरोव्ह यांचे ध्येय आहे की, आघाडीवरील सर्व रसदविषयक कामे पूर्णपणे रोबोटिक प्रणालीद्वारे व्हावीत, जेणेकरून एकही युक्रेनियन सैनिक विनाकारण मारला जाणार नाही.

Web Title: Ukraine robot force 25000 ugvs russia war k2 brigade 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Russia and Ukraine war update
  • Russia Ukraine War
  • World War 3

संबंधित बातम्या

US Politics:’अमेरिकेचा पैसा सुटकेसमध्ये भरून इराणला दिला!’ ट्रम्प यांचा ओबामांवर संताप; ‘ट्रूथ सोशल’वर मोठा गौप्यस्फोट
1

US Politics:’अमेरिकेचा पैसा सुटकेसमध्ये भरून इराणला दिला!’ ट्रम्प यांचा ओबामांवर संताप; ‘ट्रूथ सोशल’वर मोठा गौप्यस्फोट

Hormuz Strait: Iran-US संघर्ष विकोपाला! होर्मुझमध्ये ‘पर्शियन गल्फ डॉल्फिन’चा तैनात; जागतिक बाजारपेठेत इंधन दरवाढीचा भडका?
2

Hormuz Strait: Iran-US संघर्ष विकोपाला! होर्मुझमध्ये ‘पर्शियन गल्फ डॉल्फिन’चा तैनात; जागतिक बाजारपेठेत इंधन दरवाढीचा भडका?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.