Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia – Ukraine Breaking : रशियाला कळायचे बंद झाले ; युक्रेनचा रशियावर १ हजारांहून अधिक ड्रोनचा हल्ला

Russia - Ukraine Breaking : युक्रेनने १८ ऑक्टोबर रोजी रशियावर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केले. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने १,०१५ ड्रोन पाडल्याचा दावा केला. सेंट पीटर्सबर्गमधील तेल टर्मिनल आणि डेपोला आग लागली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू, तर पाच जण जखमी झाले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 18, 2026 | 05:25 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • रशियाच्या १५ प्रदेशांना लक्ष
  • तेल निर्यात केंद्र – AI सेंटरला लक्ष
  • रशियाने प्रतिहल्ला केला
Russia – Ukraine Breaking : रशिया युक्रेनच्या युद्धाची सुरवात २०१४ मध्ये झाली होती . पण खरे तर पूर्ण क्षमतेने युद्ध सुरु झाले ते म्हणजे २४ फेब्रुवारी २०२२ रोजी या दिवशी , कारण तेव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी आपल्या सैन्याला युक्रेनवर पूर्ण ताकतीने हल्ला चढवण्याचे आदेश दिले . आज १८ ऑक्टोबर २०२६ नुसार या युद्धाला ४ वर्ष ७ महिने आणि २४ दिवस झाले आहेत . तरीही हे युद्ध थांबायचे नाव घेत नाही .

याचवेळी एक नवीन माहिती समोर आली आहे . रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा भडका पुन्हा उडाला असून युक्रेनने रशियावर एक हजारांहून जास्तच ड्रोन डागल्याने रशियाला काही वेळेसाठी कळायचे बंद झाले . या हल्ल्यात रशियातील तेल साठवण आणि निर्यात यांना टार्गेट करण्यात आले असून सेंट पिटर्सबर्ग परिसरातील तेल डेपोला आग लागल्याने रशियाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांचे संरक्षणाचे प्रश्न पुन्हा रशियासमोर उभे राहिले आहेत . अशातच या झालेल्या हल्ल्यावर रशियाने जोरदार प्रतिहल्ला करण्याचे वचन युक्रेनला दिले आहे .

Sadhguru: ‘तरुण पिढी द्वेषाने भरलेली, आपल्या संस्कारांमध्ये…’; अमेरिकेतील हिंदू मंदिरावर हल्लाच्या कटावर सद्गुरूंचे भाष्य

रशियाच्या १५ प्रदेशांना लक्ष

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहिती नुसार , हवाई संरक्षण यंत्रणेने एका रात्रीत १,०१५ युक्रेनी ड्रोन पडल्याचा दावा केला आहे . हे ड्रोन रशियाच्या विविध प्रदेशांसह क्रिमिया आणि काळ्या समुद्राच्या परिसरात रोखण्यात आले आहेत . सेंट पिटर्सबर्गमध्ये झालेल्या या हल्ल्यात अनेक भागात आग लागली असून मोठ्या ड्रोन हल्ल्यामुळे रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे जवळपास तीन तेरा वाजले . असे मिळालेल्या माहितीवरून समजते आहे .

Portugal Protest: फ्रान्स, इटलीनंतर आता पोर्तुगाल पेटले; रोनाल्डोच्या मायदेशात घरांच्या वाढत्या किमतीविरोधात हजारो लोक रस्त्यावर

तेल निर्यात केंद्र – AI सेंटरला लक्ष

युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांमध्ये सेंट पिटर्सबर्ग मधील ऑइल टर्मिनल आणि रुची तेल डेपोला टार्गेट करण्यात आले आहे . या ठिकाणी आग लागल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे . याशिवाय रशियातील रिटेल कंपनी ओझोनच्या लॉजिस्टिक सेंटरलाही आग ;लागली आहे . VK या तंत्रज्ञान कंपनीचा डेटा सेंटरवरही हल्ला झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे . या हल्ल्यामुळे रशियाच्या ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाच्या पायाभूत सुविधांचाही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे .

रशियाने प्रतिहल्ला केला

दरम्यान , रशियानेही युक्रेनच्या शहरावर हल्ले केले आहेत . या हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून सहा वर्षाच्या मुलीसह इतर नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहे . दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाकडून ऊर्जा सुविधांवर सातत्याने हल्ले होत असल्याच्या आरोप केला आहे . त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या आठवड्यात युक्रेनच्या ऊर्जा , तेल , आणि वायूंवर ७६ वेळा हल्ले झाले आहेत . त्यामुळे युद्धसोबतच अमेरिका आणि युक्रेनमधील संबंधांमध्येही तणाव निर्माण झाला असून दोन्ही देशात एकमेकांबद्दल प्रचंड चीड आणि राग निर्माण झाला आहे .

 

Web Title: Russia ukraine breaking russia left in the dark ukraine launches an attack with over 1000 dronescp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Breaking News
  • marathi newss
  • Russia Ukraine War

संबंधित बातम्या

विहिरीचं खोदकाम सुरू असतानाच काळाचा घाला! मातीची दडी कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू
1

विहिरीचं खोदकाम सुरू असतानाच काळाचा घाला! मातीची दडी कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
2

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Pakistan Violence : गव्हर्नर राजवटीवरून पाकिस्तानमध्ये संघर्ष; पोलिसांच्या गोळीबारात पाच जण जखमी
3

Pakistan Violence : गव्हर्नर राजवटीवरून पाकिस्तानमध्ये संघर्ष; पोलिसांच्या गोळीबारात पाच जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.