
Ukraine signs deal with France to purchase 100 Rafale fighters
France Ukriane Arm Deal : कीव/पॅरीस : एक मोठे वृत्त समोर आले आहे. युक्रेनने फ्रान्ससोबत मोठा शस्त्रास्त्र करार केला आहे. यामुळे आता पुढील दहा वर्षे युक्रेनला फ्रान्सकडून युद्धासाठी शस्त्रे पुरवली जाणारा आहेत. गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukriane War) सुरु आहे. यामध्ये रशिया सातत्याने युक्रेनला पराभूत करत आहे. यामुळे झेलेन्स्की यांची चिंता वाढली आहे. या कारणास्तवच रशियाला तोंड देण्यासाठी त्यांनी फ्रान्ससोबत शस्त्रास्त्र करार केला आहे.
‘रशियासोबत व्यापार केला तर…’ ; डोनाल्ड ट्रम्प यांची जगभरातील देशांना पुन्हा उघड धमकी
सोमवारी(१७ नोव्हेंबर) युक्रेन आणि रशियामध्ये हा करार करण्यात आला. या करारांतर्गत युक्रेनला फ्रान्सकडून १०० राफेल लढाऊ विमाने आणि हवाई संरक्षण प्रणाली, ड्रोन्स मिळणार आहेत. पुढील १० वर्षापर्यंत फ्रान्स युक्रेनला याचा पुरवठा करणार आहे. यामुळे रशिया युक्रेन युद्धाचे रुख बदलण्याचे शक्यता आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या ऐतिहासिक करारवर स्वाक्षरी केली आहे.
दोन्ही नेत्यांनी पक्षकार परिषदेत याची माहिती दिली. झेसेन्स्की यांनी म्हटले की, फ्रान्सकडून १०० राफेल जेट आणि रडार युक्रेन खरेदी करत आहे. तसेच हवाई संरक्षण प्रणाली आणि प्रक्षेपण प्रणालीची खरेदी केली असल्याचेही त्यांनी सांगितले. हा करार २०२६ पासून सुरु होणार असून येत्या १० वर्षापर्यंत फ्रान्स युक्रेनला या शस्त्रांचा पुरवठा करणार आहे. याच वेळी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी या निर्मयाचे कौतुक केले आहे. तसेच यामुळे फ्रान्स आणि युक्रेनचे संबंध मजबूत झाल्याचे म्हटले.
तुर्कीमध्ये पार पडणार शांतता चर्चा?
याच वेळी हे युद्ध थांबवण्यासाठी जागतिक स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहे. सध्या तुर्कीच्या आग्रहामुळे रशियाने युक्रेनसोबत शांतता चर्चेसाठी सहमती दिली आहे. तुर्कीच्या राजधानी इस्तंबूलमध्ये ही चर्चा होण्याची शक्यता आहे. पण अद्याप युक्रेनने याला सहमती दिलेली नाही. सध्या युक्रेन कोणत्या प्रकारे देशाचे सार्वभौमत्त्व गमवण्यास तयार नसल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी देखील युद्ध थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी चर्चाही केली होती. परंतु त्यांचे सर्व प्रयत्न असफल ठरले. सध्या दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरुच आहे. युक्रेनच्या फ्रान्सकडून राफेल खरेदीमुळे रशियावर दबाव निर्माण होणार की युद्ध अधिक तीव्र होणार असा प्रश्न पडला आहे.
Ans: युक्रेनने फ्रान्ससोबत मोठा शस्त्रास्त्र करार केला आहे.
Ans: या करारांतर्गत युक्रेनला फ्रान्सकडून १०० राफेल लढाऊ विमाने आणि हवाई संरक्षण प्रणाली, ड्रोन्स मिळणार आहेत. पुढील १० वर्षे हा पुरवठा केला जाणार आहे.
Ans: गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ रशिया युक्रेन युद्ध सुरु आहे.
Ans: गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ रशिया युक्रेन युद्ध सुरु आहे. गेल्या काही मबिन्यात हे युद्ध एकांगी बनले आहे. रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ला करत आहे. यामुळे रशियाला तोंड देण्यासाठी झेलेंन्स्की यांनी फ्रान्ससोबत शस्त्रास्त्र करार केला आहे.