युक्रेनचा रशियावर ब्रिटीश क्रूझ क्षेपणास्त्रांनी जोरदार हल्ला; पुतिन संतापले म्हणाले...
कीव: रशिया-युक्रेन युद्धाने आता तीव्र वळण घेतले आहे. ट्रम्प यांचं प्रशासन सत्तेत येण्यापूर्वी अध्यक्ष बायडेन यांनी रशियाला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिल्यानंतर रशिया-युक्रेन युद्ध अधिक तीव्र झाले आहे. आता युक्रेनने अमेरिका निर्मित लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर आता ब्रिटीश क्रूझ क्षेपणास्त्रांचा हल्ला रशियावर केला आहे. यामुळे रशिया अधिकच संतप्त झाली आहे.
तिसरे महायुद्ध होण्याची भिती
युक्रेनच्या ब्रिटीश क्रूझ क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांमुळे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी आक्रोश दर्शवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, युक्रेनला रशियाविरुद्ध पाश्चात्य शस्त्रे वापरण्याची परवानगी देऊन, जो बायडेन यांनी तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनने काल रात्री रशियावर ब्रिटिश क्रूझ क्षेपणास्त्रे डागली. मात्र, रशियाने दावा केला आहे की, त्यांनी यापैकी बरीच क्षेपणास्त्रे पाडली आहेत.
हे नवीन क्षेपणास्त्र ब्रिटनचे पाश्चात्य शस्त्र आहे. युक्रेनने मास्कोवर अमेरिकन निर्मित ATACMS क्षेपणास्त्रे डागल्यानंतर अवघ्या 2 दिवसांनी ब्रिटीश क्रूझने रशियावर ताजा हल्ला केला आहे. रशियावरील लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर ब्रिचनलाही रशियन लक्ष्यांवर आपली क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे रशिया-युक्रेन युद्धाला नवे स्वरुप मिळाले आहे. यामुळे तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमेरिका आणि ब्रिटनच्या हलाचालींमुळे युक्रेनचे रशियावर हल्ले
अमेरिका आणि ब्रिटनच्या या हलाचालींमुळे युक्रेनने रशियावर पाश्चिमात्य शस्त्रास्त्रांचे हल्ले अधिक तीव्र केले आहेत. यामुळे रशिया देखील प्रत्युत्तराच्या तयारीत असून आणखीन तणापूर्ण स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. एका रशियन सैन्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रशिया देखील आक्रमक झाला असून युक्रेनला चोख प्रत्युत्तर दिले जाणार आहे. या आठवड्यात रशियाा-युक्रेन हल्ले अधिकच वाढले आहेत.
British Cruise Missile (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
युद्धाची वाढती तीव्रता
सध्याच्या परिस्थितीत रशिया आणि युक्रेनमधील तणाव अधिक वाढत आहे. लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर आणि त्यावरून होणाऱ्या संघर्षामुळे हा युद्ध मोठ्या प्रमाणावर विस्तारण्याची शक्यता आहे. कीवमध्ये अमेरिकन दूतावास बंद होणे हे गंभीर स्थितीचे संकेत मानले जात आहेत. यामुळे युक्रेनमधील नागरिक आणि परदेशी प्रतिनिधी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमेरिन दूतावास बंद
रशिया-युक्रेन युद्ध आता शिगेला पोहोचले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या युक्रेनला लांब पल्ल्यांच्या वापराच्या परवानगी नंतर युक्रेनने रशियावर अमेरिकन क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. या हल्ल्यांमुळे रशिया संतप्त झाला आहे. यामुळे रशियाकडून मोठा हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनची राजधीनी कीव येथील अमेरिकन दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाकडून हवाई हल्ल्याच्या शक्यतेबाबत महत्त्वाचा इशारा मिळाला आहे. यामुळे अमेरिकन दूतावास बंद करण्यात आला आहे.