Ukraine uses remote control warriors against Russia in war
Russia Ukraine War news in Marathi : कीव : रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) थांबण्याचे नाव घेईना. दोन्ही देशांमध्ये एकमेकांवर हल्ले सुरुच आहेत. रशियाने युक्रेनच्या अनेक भागांवर तीव्र हवाई हल्ले केले आहेत. यामुळे युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. अनेक पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. मात्र आता युक्रेन आपल्या संरक्षणासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. रशियाच्या प्राणघातक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना उत्तर देण्याची तयारी युक्रेनने सुरु केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनने आता मैदानावर स्वत:चे संरक्षण करण्यासाठी रिमोट कंट्रोल रोबोट्स मैदानावर उतरवले आहे. या रोबोट्समुळे संभाव्य हल्ल्यांची माहिती मिळत आहे. यामुळे युक्रेनला हल्ल्यांना हाणून पाडता येते आहे. सध्या युक्रेनमध्ये सैन्याची कमतरता भासक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
युक्रेनची जमीन पुन्हा हादरली! रशियाचा ६०० हून अधिक ड्रोन अन् क्षेपणास्त्रांचा मारा, अनेक जखमी
युक्रेनला भासत आहे सैन्याची कमरता?
रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ सुरु आहेत. या युद्धात दोन्ही बाजूचे अनेक सैन्या मारलेगेले आहे. रशियन सैन्याची ताकद ही युक्रेनपेक्षा अधिक आहे. तसेच त्यांच्याकडे अनेक आधुनिक शस्त्रे देखील उपलब्ध आहेत. मात्र युक्रेनच्या सैन्यात हजारो सैनिक मारले गेले आहे. यामुळे अनेक सैनिक जीव वाचवण्यासाठी पळून गेले आहे.
परिणामी युक्रेनला सैन्यात रिमोट कंट्रोल रोबोट्स उतरावे लागले असल्याचे म्हटले जात आहे. युक्रेनचे ही रिमोट कंट्रोल वाहने छोट्या टॅंकसारखी आहे. याच्या मदतीने सैन्यापर्यंत मदत पोहोचवली जात आहे. तसेच मृतांचा बाहेर काढणे, सुरुंग साफ करणे, सैनिकांचा जीव वाचवणे अशा प्रकारची कामे या रिमोट कंट्रोल वाहनामुळे सोपी झाली आहेत.
Ukraine is now also using ground robots, for different missions, protecting the lives of its soldiers :
-supplies
-fire support
-mine laying
-KIA/WIA evacuation pic.twitter.com/HWlfasZJpM— Clément Molin (@clement_molin) September 21, 2025
सैनिकांची जागा घेऊ शकत नाहीत रिमोट कंट्रोल वाहने
मात्र हे रोबोट्स युद्धात पूर्णपणे सैनिकांची जागा घेऊ शकत नाहीत. कारण युद्धात अनेक मोहिमा कराव्या लागतात. शत्रू देशाच्या सैनिकाला जाळ्यात अडकवणे, हल्ला करणे, शत्रूच्या प्रदेशात घुसखोरी अशा प्रकारची कामे करावी लागतात. ही कामे या रोबोट्स वाहनांच्या मदतीने करणे अशक्य आहे. शिवाय रशियाकडे युक्रेनपेक्षा मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रे आहेत. जी युक्रेनच्या या रिमोट कंट्रोल वाहनांचा सहजपण चूरा करु शकतात. अशा परिस्थिती ही वाहेन केवळी संभाव्य हल्ल्यांना टाळण्यासाठी उपयुक्त आहेत.
रशियाकडील वाहने
रशियाकडे सर्वात प्रगत रोबोटिक वाहन उरण-९ आहे. हे वाहन मशीन गन, अँटी-टँक क्षेपणास्त्रे आणि ग्रेनेडने लॉंचरने सुसज्ज आहे. तसेच याव्यतिरिक्त रशियाकडे शस्त्रे वाहून नेण्यासाठी आणि शत्रू देशावर नजर ठेवण्याठी नारेख्त देखील आहेत. यांसारखी अनेक रोबोटिक वाहने रशियाकडे आहेत.
रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनने कोणते पाऊल उचलले आणि का?
युक्रेनने रशियाविरुद्धच्या युद्धात देशाचे आणि सैनिकांचे संभाव्य हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी रिमोट कंट्रोल रोबोटिक वाहने उतरवली आहेत.
किती वर्षापासून सुरु आहे रशिया युक्रेन युद्ध?
फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया युक्रेन युद्ध सुरु झाले होते, आता या युद्धाला तीन वर्षाहून अधिक काळ उलटला आहे.