युक्रेनची जमीन पुन्हा हादरली! रशियाचा ६०० हून अधिक ड्रोन अन् क्षेपणास्त्रांचा मारा, अनेक जखमी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Russia Ukraine war : कीव/मॉस्को : रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर तीव्र हल्ला केला आहे. शनिवारी पहाटे रशियन सैन्याने युक्रेनच्या विविध भांगावर ड्रोन, क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत, तर तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त मिळाले आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६९९ हून अधिक ड्रोन हल्ले, तर ५० हून अधिक बॅलेस्टिक मिसाइल्स आणि क्रूझ क्षेपणास्त्रे त्यांच्यावर डागण्यात आली आहेत.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनच्या नभ प्रदेशांवर हल्ला केला आहे. यामध्ये डनिप्रोपेट्रोव्स्क, मायकोलाईव, चेर्निहिव, झापोरिझिया, पोल्टावा, कीनस ओडेस, सुमी आणि खार्किवचा समावेश आहे.
झेलेन्स्कींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात या सर्व प्रदेशातील पायाभूत सुविधा, निवसी क्षेत्र आणि उर्जा क्षेत्रांना लक्ष्य करण्यात आले आहे. रशियाचा हा हल्ला जाणूबुजून केलेल्या एका रणनीतीचा भाग आहे. या हल्ल्याचा उद्देश नागरिकांना धमकवण्याचा आणि पायाभूत सुविधा नष्ट करण्याचा आहे.
युक्रेनच्या डनिप्रोच्या भागात हल्ल्यामुळे अनेक लोक जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. स्थानिक बचाव अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ल्यात २६ जण जखमी झाले आहेत.
पुतिन समोर झुकले झेलेन्स्की? रशियाच्या तीव्र हल्ल्यांदरम्यान युक्रेनकडून शरणागतीच्या चर्चांणा उधाण
रशियाने युक्रेनवर ६१९ ड्रोन हल्ले केले आहेत. तसेच ५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. पण युक्रेनने यातील ५५२ ड्रोन आणि २९ क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला आहे. गेल्या काही काळापासून युक्रेनवर रशियाचे सतत हल्ले वाढत आहेत. यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
झेलेन्स्कींनी म्हटले आहे की, पुढील आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेट होण्याची आशा आहे.संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यानही भेट होईल असे त्यांनी सांगितले. यावेळी ते रशियाच्या हल्ल्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात उपस्थित करतील असेही झेलेन्स्कीं म्हणाले.
WATCH: The moment a Russian missile hit a building in Ukraine’s Dnipro this morning. pic.twitter.com/ibYRUz5ogp
— Clash Report (@clashreport) September 20, 2025
नुकतेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी थेट युद्ध कक्षात जाणून सैन्याला मार्गदर्शने केले होते. पुतिन यांच्या आदेशनानुसार, रशियन सैन्याने युक्रेनवर हल्लेही केले. यामुळे युक्रेन सैन्याला हार मानला असल्याचे सांगितले जात आहे. काल पुतिन यांनी Zapad 2025 च्या लष्करी सरावात गणवेश परिधान करुन सैन्याला मार्गदर्शन केले होते. यावेळी त्यांनी लष्करातील शस्त्रांची पाहणी केली, विशेष करुन परदेशी लष्करी उपकरणे, यंत्रणेची बारकाईने तपासणी पुतिन यांनी केली.
रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) कधीपासून सुरु आहे?
फेब्रुवारी २०२२ मध्ये रशिया युक्रेन युद्धाला सुरुवात झाली होती. आज या युद्धाला तीन वर्षाहून अधिक काळ उलटला आहे, प हे युद्ध थांबवण्याचे नाव घेईना.
रशियाने युक्रेनवर किती ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागली?
रशियाने शनिवारी (२० सप्टेंबर) केलेल्या हल्ल्यात ६१९ ड्रोन आणि ५० हून अधिक बॅलेस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागली आहेत.