Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भारतावर आम्हाला विश्वास… ; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार, काय आहे कारण?

Zelensky Thanks To PM Modi : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी भारताचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी भारतावर विश्वासही दाखवला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार का मानले हे जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 26, 2025 | 12:51 PM
Ukraine's Zelensky Thanks to PM Modi

Ukraine's Zelensky Thanks to PM Modi

Follow Us
Follow Us:
  • झेलेन्स्कींनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
  • भारतावर दाखवला विश्वास
  • झेलेन्स्की भारत दौऱ्यावर येणार
Ukraine’s Zelensky Thanks to PM Modi : कीव/नवी दिल्ली : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदींनी युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनी झेलेन्स्कींना शुभेच्छा दिल्या होत्या. यावर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी भारताच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. याशिवाय शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या भारताच्या प्रयत्नांचेही झेलेन्स्की यांनी आभार मानले आहेत.

पंतप्रधान मोदींनी युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच त्यांनी भारत शांततेच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान मोदींनी राजनैतिक मार्गाने आणि संवादाने समस्यासोडवण्याचे म्हटले होते. दरम्यान यावर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. तसेच भारताकडूनही शांततेच्या प्रयत्नांसाठी मदतीची आशा केली.

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले की, ‘युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनी मनापासून दिलेल्या शुभेच्छा बद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. शांततेसाठी भारताच्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो. आज संपूर्ण जग शांततेसाठी आणि युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांनी म्हटले की, आम्हाला विश्वास आहे की भारतही यामध्ये महत्वपूर्ण योगदान देईल. झेलेनस्की यांनी स्पष्ट केले की, राजनैतिक मुसद्देगिरीला मजबूत करण्याचा प्रत्येक निर्णय हा युरोपच नव्हे तर संपूर्ण जगाच्या सुरक्षेसाठी आहे.

भारताला अमेरिकेचा आर्थिक झटका; २५% अतिरिक्त कराची अधिसूचना जारी

झेलेन्स्की यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% कराची अधिकृत घोषणा करत निर्णायवर स्वाक्षरी केली आहे. रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प भारतावर नाराज आहेत.

Thank you, Prime Minister @narendramodi, for the warm greetings on Ukraine’s Independence Day. We appreciate India’s dedication to peace and dialogue. Now, as the entire world strives to end this horrible war with dignity and lasting peace, we count on India’s contribution. Every… pic.twitter.com/FtwkXUhtEH — Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) August 25, 2025

पंतप्रधान मोदींचे झेलेन्स्कींना पत्र

झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींचे पत्रही शेअर केले आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींनी युक्रेनच्या नागरिकांना आणि झेलेन्स्की यांना स्वांतत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच त्यांनी गेल्या वर्षी कीवमधील झालेल्या भेटीचीही आठवण करुन दिली. पंतप्रधान मोदींनी म्हटले होते की, “तुम्हाला आणि युक्रेनच्या नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतो. कीवच्या आठवणी आजही ताज्या आहेत. या काळात भारत आणि युक्रेन संबंधामध्ये प्रगती झाली आहे. भविष्यातही दोन्ही देशांमध्ये परस्पर सहकार्य आणि संबंध अधिक वाढेल अशा आशा आहे.”

झेलेन्स्कींचा भारत दौरा

तसेच झेलेन्स्कीही लवकरच भारताच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. युक्रेनचे राजदूत ओलेक्झांडर पोलिशचुक यांनी यांची माहिती दिली होती. त्यांनी दौऱ्याची तारीख निश्चित झालेली नसून यासाठी चर्चा सुरु असल्याचे म्हटले होते. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा असेल.

रशियाने निभावली दोस्ती! भारतीय तरुणांच्या नोकरीसाठी खुली केली महत्त्वपूर्ण क्षेत्रे

Web Title: Ukraines zelensky thanks to pm modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 12:50 PM

Topics:  

  • narendra modi
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.