Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Africa Continent: 500 वर्षांनंतर जगाचा नवा नकाशा! आफ्रिका खंड युरोप अन् अमेरिकेपेक्षा मोठा; 164 देशांचा UN मध्ये पाठिंबा

Africa Continent : संयुक्त राष्ट्र महासभेने आफ्रिकेचा आकार अचूकपणे दर्शवणाऱ्या नवीन नकाशाला मंजुरी दिली. १६४ देशांनी याला पाठिंबा दिला, तर अमेरिकेने याला विरोध केला. ५०० वर्षे जुन्या मर्केटर नकाशात आफ्रिका लहान दाखवला जातो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 05, 2026 | 08:21 PM
Equal Earth projection map vs Mercator

Equal Earth projection map vs Mercator

Follow Us
Follow Us:
  • संयुक्त राष्ट्रांचा ऐतिहासिक निर्णय
  • १६४ देशांचा पाठिंबा, अमेरिकेचा विरोध
  • मर्केटर नकाशातील ५०० वर्षांची चूक दुरुस्त

जगाचा भूगोल आणि विविध खंडांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारा एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) घेतला आहे. गेल्या ५०० वर्षांहून अधिक काळापासून जगभरात वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक ‘मर्केटर नकाशा’ (Mercator Map) मधील भौगोलिक त्रुटी दुरुस्त करत, संयुक्त राष्ट्रांनी नवीन ‘इक्वल अर्थ’ (Equal Earth) नकाशाला अधिकृत पाठिंबा दिला आहे. या नवीन नकाशामुळे आफ्रिका खंडाचा वास्तविक आकार जगासमोर आला असून, आता नकाशावर आफ्रिका (Africa Continent) हा युरोप आणि उत्तर अमेरिकेपेक्षा कितीतरी पटीने मोठा दिसणार आहे.

‘नकाशा दुरुस्त करा’ (Correct The Map) नावाचा हा ऐतिहासिक प्रस्ताव आफ्रिकेतील टोगो (Togo) देशाने आफ्रिकन युनियनच्या (AU) ५४ सदस्य राष्ट्रांच्या वतीने मांडला होता. संयुक्त राष्ट्र महासभेत झालेल्या मतदानात तब्बल १६४ देशांनी या प्रस्तावाच्या बाजूने कौल दिला. विशेष म्हणजे, या प्रस्तावाला अमेरिकेने (USA) तीव्र विरोध दर्शवत विरोधात एकमेव मतदान केले, तर भारत आणि फ्रान्ससह जगातील बहुतांश देशांनी प्रस्तावाचे समर्थन केले. सहा देशांनी या मतदानात सहभाग घेतला नाही. हा निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावर बंधनकारक नसला तरी शाळा, महाविद्यालये, प्रसारमाध्यमे आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर नवीन नकाशा वापरण्यासाठी प्रोत्साहन देणारा ठरेल.

१६ व्या शतकातील ‘मर्केटर नकाशा’ आणि त्यातील मोठ्या चुका

सध्या जगभरात वापरला जाणारा लोकप्रिय जगाचा नकाशा १५६९ मध्ये फ्लेमिश नकाशाकार गेरार्डस मर्केटर यांनी तयार केला होता. त्या काळात युरोपीय खलाशांना आणि दर्यावर्दींना जहाजांचे नेव्हिगेशन (दिशा दर्शन) सुलभ व्हावे या उद्देशाने हा नकाशा बनवला गेला होता. मात्र, गोल असणाऱ्या पृथ्वीला २D म्हणजेच सपाट कागदावर उतरवताना या नकाशात मोठ्या भौगोलिक तफावती निर्माण झाल्या.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Climate Change : मानवी मूत्रामुळे वितळत आहेत ग्लेशियर? माउंट एव्हरेस्टवरील संशोधनातून समोर आला थक्क करणारा खुलासा

मर्केटर नकाशाची सर्वात मोठी त्रुटी म्हणजे, यात विषुववृत्ताजवळ असणारे देश आणि खंड लहान दिसतात, तर उत्तर आणि दक्षिण ध्रुवांजवळ असणारे युरोप, उत्तर अमेरिका आणि ग्रीनलँड यांसारखे भाग त्यांच्या मूळ आकारापेक्षा खूपच मोठे दिसतात. या नकाशात आफ्रिका आणि ग्रीनलँड हे दोन्ही जवळजवळ समान आकाराचे दिसतात; परंतु प्रत्यक्षात आफ्रिका खंड हा ग्रीनलँडपेक्षा १४ पटीने मोठा आहे. तसेच, ब्राझील हा देश अलास्कापेक्षा ५ पटीने मोठा असतानाही जुन्या नकाशात अलास्का ब्राझीलएवढाच दिसायचा.

🎉Congratulations to the delegation of Togo 🇹🇬 on the adoption this morning by the #UNGA of resolution A/80/L.104, “Correct the Map”, an @_AfricanUnion initiative promoting more accurate and equitable global cartographic representation, particularly of #Africa. A significant… pic.twitter.com/oxZCbeMUTt — African Union Mission to the UN (@AfricanUnionUN) September 4, 2026

credit – social media and Twitter

नवीन ‘इक्वल अर्थ’ नकाशा काय आहे आणि तो का महत्त्वाचा आहे?

मर्केटर नकाशातील या त्रुटी आणि आफ्रिकेचे डावललेले अस्तित्व लक्षात घेऊन २०१८ मध्ये नकाशाकारांनी ‘इक्वल अर्थ’ (Equal Earth Projection) हा नवीन नकाशा विकसित केला. हा नकाशा पृथ्वीच्या गोलाकार वक्रतेला (Curvature) विचारात घेऊन सर्व खंडांचे वास्तविक क्षेत्रफळ आणि प्रमाण अचूकपणे दर्शवतो.

#CorrectTheMap मोहिमेतील तज्ज्ञांच्या मते, आफ्रिका हा खंड इतका महाकाय आहे की, त्याच्या क्षेत्रफळात अमेरिका, चीन, भारत, जपान, मेक्सिको आणि संपूर्ण युरोपचा मोठा भाग सहज सामावून जाऊ शकतो आणि तरीही जमीन शिल्लक राहू शकते. या नवीन नकाशात आफ्रिकेचे हेच विशाल रूप स्पष्टपणे दिसून येते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Vladimir Putin : ट्रम्प यांच्या प्रस्तावामुळे पुतिन नमले? कीववर 3 दिवस डागणार नाहीत क्षेपणास्त्रे; क्रेमलिनचा मोठा खुलासा

राजकीय मतभेद: अमेरिकेचा विरोध आणि इतर देशांचे समर्थन

या प्रस्तावावर बोलताना टोगोचे परराष्ट्र मंत्री रॉबर्ट ड्यूसी म्हणाले की, “एका न्यायपूर्ण आणि समान जगाची सुरुवात ही एका न्यायपूर्ण नकाशाने होते. नकाशे हे केवळ रस्ते दाखवत नाहीत, तर ते मानवी विचारसरणी आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन घडवतात.” फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बॅरो यांनीही या बदलाचे स्वागत करत म्हटले की, “नकाशा बदलल्याने जग बदलणार नाही, परंतु शतकानुशतके चाललेली एक चुकीची प्रतिमा दुरुस्त करणे हे सत्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.”

दुसरीकडे, अमेरिकेच्या प्रतिनिधी यारिना फेरेन्सेविच यांनी या प्रस्तावाचा विरोध करताना युक्तिवाद केला की, संयुक्त राष्ट्राने १६ व्या शतकातील नकाशांवर चर्चा करण्यात वेळ घालवण्याऐवजी जागतिक शांतता, समृद्धी आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मात्र, ‘आफ्रिका नो फिल्टर’ या संस्थेच्या लेराटो मोगोएटलाथे यांच्या मते, आफ्रिकेचा नकाशा लहान दाखवणे ही केवळ तांत्रिक चूक नव्हती, तर यामुळे जागतिक राजकारणात आफ्रिकेचे आर्थिक आणि सामाजिक महत्त्व कमी लेखले गेले होते. आता नवीन नकाशामुळे जगाचा आफ्रिकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सन्मानजनक आणि वास्तववादी बनेल.

Web Title: Un approves new equal earth world map showing true size of africa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 08:21 PM

Topics:  

  • Africa Continent
  • african country
  • United Nations Security Council

संबंधित बातम्या

Africa Map Update : आफ्रिकेचा नकाशा बदलणार; UNचा मोठा निर्णय, ‘Equal Earth’ नकाशाला १६४ देशांचा पाठिंबा
1

Africa Map Update : आफ्रिकेचा नकाशा बदलणार; UNचा मोठा निर्णय, ‘Equal Earth’ नकाशाला १६४ देशांचा पाठिंबा

Niger News : नायजरमध्ये लष्करी बंडाचा प्रयत्न; विमानतळ आणि राष्ट्रपती भवन परिसरात गोळीबार
2

Niger News : नायजरमध्ये लष्करी बंडाचा प्रयत्न; विमानतळ आणि राष्ट्रपती भवन परिसरात गोळीबार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.