फोटो सौजन्य सोशल मीडिया
या करारानुसार सौदीच्या सुरक्षेसाठी ठरवण्यात आलेली लष्करी साधने आणि सैन्य तातडीने तैनात करण्यास तिन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे . त्यामुळे पाकिस्तान आता सौदीच्या मदतीसाठी प्रत्यक्ष लष्करी भूमिकेत उतरण्याची शक्यता आहे . यामागे म्हणजेच पाकिस्तानला हुतींविरोधात उतरवण्यात अमेरिकेचा हात असल्याचे बोलले जात आहे .
कारण अमेरिका आता खुलेआम पाने सौदीच्या साहाय्यासाठी हुथींविरोधात लढू शकत नाही . कारण इराण वरील युद्ध हे अमेरिकेतील ७० टक्के लोकांना आवडलेले नाही . त्यांच्या म्हणण्यानुसार मध्य पूर्वेतील युद्ध हे आता अमेरिकेचे युद्ध नाही त्यामुळे अमेरिकेने यात पडून आपला वेळ, पैसा आणि जीवितहानी करू नये . यासगळ्यामुळे ट्रम्प यांनी मक्का संयुक्त करार करून पाकिस्तानला पाचारण केले आहे . असे बोलले जात आहे .
सौदी अरेबियावरील हुथींचे हल्ले वाढल्यानंतर रियाधमध्ये मक्का करारातील देशांची तातडीची बैठक झाली . या बैठकीत सामूहिक प्रतिबंधात्मक उपाय सक्रिय करण्याचा निर्णय घेण्यात आला . करारानुसार एक सदस्य देशावर झालेला हल्ला हा इतर देशावर हल्ला झाला असे मानले जाते . त्यामुळे सौदीच्या रक्षणासाठी पाकिस्तान नई तुर्की कडून लष्करी क्षमता उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .
पाकिस्तानने सौदीच्या सुरक्षेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असून ,सौदीमध्ये लष्करी दल आणि आवश्यक संरक्षण क्षमता तैनात करण्यास सहमती दिली आहे . याआधीही पाकिस्तानकडून सौदीला हवाई संरक्षण यंत्रणा आणि इतर लष्करी मदत दिल्याचे वृत्त आहे .
मात्र पाकिस्तान थेट येमेनमध्ये हुतींविरोधात मोठ्या प्राणावर युद्धात उतरणार कि सौदीच्या भूभागाच्या संरक्षणपूर्तीच भूमिका घेणार हे अद्याप अजून स्पष्ट झाले नाही . पाकिस्तानने यापूर्वी हुंथींच्या प्रश्नाबाबत राजनैतिक तोडगा काढण्याचीही गरज व्यक्त केली होती .
World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
याचवेळी सौदीसमर्थ येमेनच्या सैन्याने हुथींच्या ताब्यातील भाग परत मिळवण्यासाठी मोठी लष्करी मोहीम सुरु केली आहे.बाब – अल -मंदेब सामुद्रधुनीच्या परिसरातही संघर्ष वाढला आहे . त्याला प्रतिउत्तर म्हणून हुथिंकडून सौदीतील विमानतळ ,तेल ,सुविधा आणि लष्करी ठिकाणांना लक्ष केल्याचे दावे करण्यात आले आहेत . त्यामुळे येमेनमधील संघर्षाचा परिणाम सौदीच्या सुरक्षा व्यवस्थेबरोबरच लाल समुद्रातील व्यापारी मार्गांवरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे .






