US Chian Trade Donald Trump extends tariff on china by 90 days
US China Trade news in marathi : वॉशिंग्टन : गेल्या काही काळात चीन (China) आणि अमेरिकेमधील (America) व्यापार तणाव चर्चेचा विषय बनला आहे. एप्रिलमध्ये ट्रम्प यांनी चीनवर १४५% अतिरिक्त कर (Tarrif) लादला होता. तर चीनने देखील अमेरिकेवर १२५% कर लागू केला होता. दोन्ही देशांमध्ये तीव्र व्यापार युद्ध सुरु झाले होते. परंतु त्यानंतर काही काळासाठी हा कर स्थगित करण्यात आला होता. आता ट्रम्प यांनी या स्थगितीची वेळ ९० दिवसांसाठी पुन्हा वाढवली आहे.
आता चीनला ९ नोव्हेंबरपर्यंत ही मुदत देण्यात आली आहे. ट्रम्प यांनी मुदत वाढवण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी देखील केली आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये यावर चर्चा सुरु आहे. सध्या चीनी उत्पादनांवर ट्रम्प यांनी ३०% टॅरिफ लागू केले होते. याची मुदत १२ ऑगस्ट रोजी समाप्त झाली असून आता यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान मुदत वाढवण्याच्या काही तास आधी ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत ट्रम्प यांना चीनवरील कर वाढवण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या वेळी ट्रम्प यांनी माझे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी जवळचे आणि चांगले संबंध असल्याचे म्हटले.
पुतिननंतर पंतप्रधान मोदींची झेलेन्स्कींशी चर्चा; शांतता करारावर दिला भर, ट्रम्प संतापणार?
ट्रम्प यांच्या निर्णयाचा जागतिक स्तरावर परिणाम
मात्र, काही तज्ज्ञांच्या मते जर येत्या ९० दिवसांमध्ये चीनवरील करावर कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही तर यामुळे टॅरिफ दर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक व्यापारमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होईल. अमेरिका जागतिक व्यापार संघटनेशी आंतरराष्ट्रीय वादावर मात करण्यासाठी मध्यस्थी करु शकते.
तज्ज्ञांच्या मते ही अमेरिकेचा हा निर्णय एक धोरणात्मक निर्णय आहे. परंतु चीन आणि अमेरिकेत व्यापार करार झाला नाही तर यामुळे जागतिक स्तरावर व्यापार युद्ध पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.
चीनवर कर लादणे अत्यंत कठीण
याच वेळी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, चीनवर कर लादणे अत्यंत कठीण आणि धोकादायक निर्णय आहे. फॉक्स न्यूजला सोमवारी (११ ऑगस्ट) दिलेल्या मुलाखतीत व्हॅन्स यांनी म्हटले की, सध्या अमेरिका चीनवरील कर लादण्याची निर्णयावर विचार करत आहे, अद्याप कोणताही ठोर निर्णय झालेला नाही.
तसेच यापूर्वी ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी देखील चीनवर कर लादण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले होते. यामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान होऊ शकते असे त्यांनी सांगितले होते.
अमेरिकेची BLA विरोधात मोठी कारवाई; दहशतवादी संघटनेच्या यादीत केले समाविष्ट