अमेरिकेची BLA विरोधात मोठी कारवाई ; दहशतवादी संघटनेच्या यादीत केले समाविष्ट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
America news in marathi : वॉशिंग्टन : अमेरिकेने (America) पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तानची संघटना बलुच लिबरेशन आर्मीला (BLA) दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी सोमवारी (११ ऑगस्ट) याची घोषणा केली.
या कारणांमुळे BLA ला केले दहशतवादी संघटना म्हणून घोषित
मार्को रुबियो सांगितले की, २०२४ मध्ये कराची विमानतळाजवळ आणि ग्वादर पोर्ट अथॉरिटी कॉम्प्लेक्स येथे आत्मघाती हल्ले झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी BLA ने स्वीकारली होती. तसेच मार्च २०२३ मध्ये जाफर एक्सप्रेस ट्रेन BLA ने हायजॅक केली होती. यावेळी ३१ नागरिकांसह सुरक्षा कर्मचारी ठार झाले होते. तसेच BLA ने ३०० हून अधिक प्रवाशांना बंदीस्त केले होते.
या सर्व दहशतवादी कारवाया असून ट्रम्प प्रशासन अशा कारवायांना तीव्र विरोध करते. यामुळे BLA ला दहशतवादी संघटनेच्या यादीत FTO मध्ये सामाविष्ट करण्यात आले आहे. या संघटनेला मिळणारी आर्थिक आणि शस्त्रांस्त्रांची मदत, व इतर आधार थांबवणे असा याचा हेतू आहे.
अमेरिकेने ही घोषणा अशा वेळी केली आहे, जेव्हा पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर अमेरिकेच्या दौऱ्यावर दुसऱ्यांदा गेले आहे. यापूर्वी जूनमध्ये त्यांनी अमेरिकेला दौरा केला होता. यामुळे लष्करप्रमुखांच्या सांगण्यावरुनच हा निर्णय घेण्यात आला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
BLA संघटना २००० च्या दशतकात स्थापन झाली होती. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेचा उद्देश पाकिस्तानी लष्कर, सरकारी संस्था आणि चीनच्या CPEC प्रकल्पांना थांबवणे होता. BLA च्या मते, बलुचिस्तानमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचे म्हणजे, तेल आणि खनिजांची लुट होत आहे.
याचा वापर केवळ बलुच जनेतेसाठी झाला पाहिजे. परंतु पाकिस्तान लष्कर चीन सोबत मिळून बलुचिस्तानचे स्वातंत्र हिरावून घेत आहे. यामुळे १४ मे २०२५ रोजी बलुच नेता मीर यार बलुच याने पाकिस्तानपासून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी केली.
FAQs (संबंधित प्रश्न)
अमेरिकेने BLA ला दहशतवादी संघटना म्हणून का घोषित केले?
अलीकडे BLA ने पाकिस्तानी लष्कराविरोधात कारवाया तीव्र केल्या आहेत. परंतु यामध्ये सामान्य नागरिक आणि सुरक्षा कर्मचारी बळी पडत आहेत. अमेरिकेच्या मते या सर्व दहशतवादी कारवाया असून ट्रम्प प्रशासन याला तीव्र विरोध करते. यामुळे BLA ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.
यापूर्वी अमेरिकेने पाकच्या कोणत्या संघटनेला दहशतवादी म्हणून घोषित केले?
यापूर्वी अमेरिकेने पाकिस्तान समर्थित द रेसिस्टन्स फ्रंट(TRF) ला जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.
TRF ला दहशतवादी संघटना म्हणून का घोषित करण्यात आले?
एप्रिल २०२५ मध्ये जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ला झाला होता. याची जबाबदारी TRF ने स्वीकारली होती. यामध्ये २६ जणांचा बळी गेला होता. या दहशतवादी हल्ल्याला अमेरिकेने विरोध केला आहे.
भारत-अमेरिका नव्हे… ‘या’ देशाकडे आहे सर्वात शक्तिशाली आणि घातक ड्रोन; शत्रूचा डाव क्षणात होईल नष्ट