US-China Tariff War: China denounces Trump tariff and threatens will file a lawsuit in the WTO
बिजिंग: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी (1फेब्रुवारी) कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर कर लादण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणमुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनुसार, कॅनडा आणि मेक्सिकोमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 25% आणि चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर 10% टॅरिफ लागू करण्यात येणार आहे. यामुळे चीनसह इतर देशांनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला प्रत्युत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे.
अमेरिकेने कॅनडावर लादलेल्या टॅरिफच्या बदल्यात जस्टिन ट्रुडो यांनी देखील अमेरिकन उत्पादनांवर सामान कर लागू करण्याची घोषणा केली आहे, तर चीनने या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत, हा एकतर्फी निर्णय जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) नियमांचे उल्लंघन करतो असे म्हटले आहे. यामुळे चीन WTO मध्ये अमेरिकेविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे.
चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केले की, “व्यापार युद्धात कोणताही देश विजयी होत नाही, पण आता आम्हाला आमच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी लागतील.” तसेच चीनने अमेरिका आणि अन्य देशांबरोबर चर्चेच्या माध्यमातून समस्येवर तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
चीन देखील अमेरिन उत्पादनांवर कर लादणार
कॅनडानंतर आता चीनही अमेरिकन उत्पादनांवरही शुल्क लादण्याचा निर्णय घेऊ शकतो. ट्रम्प यांच्या टॅरिफ लादण्याच्या निर्णयामागचे कारण देताना अमेरिकेन म्हटले आहे की, या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचे उत्पादन केले जाते आणि ते अमेरिकेत पाठवल्या जातात. मात्र, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या आरोपांवर उत्तर देताना स्पष्ट केले की, “ही समस्या अमेरिकेची आहे, आमचा यासोबत काहीही संबंध नाही.”
चीन आणि अमेरिका दोन्ही देश जागतिक बाजारपेठेत महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे या दोन देशांमधील तणावाचा प्रभाव संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. चीनने आशा व्यक्त केली आहे की, दोन्ही देशांमध्ये लवकरच चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यात येईल. यासाठी चीनने अमेरिकेला सहकार्य वाढवण्याचे आणि संवाद साधण्याचे आवाहन केले आहे.
व्यापार युद्धाचा धोका
मेक्सिको आणि कॅनडा अमेरिकेचे दोन सर्वात मोठे व्यापारी भागीदार आहेत. यामुळे ट्रम्प यांच्या टॅरिफ लादण्याचा निर्णयाने यामुळे व्यापार युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. कॅनडानेही अमेरिकेच्या 25% टॅरिफला प्रत्युत्तर देत त्याच प्रमाणात टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. तसेच चीनने देखील रणनिती आखली असून आता या संघर्षाचा पुढील परिणाम काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.