China urges US to take 'big step' as Beijing sends direct tariffs message to Washington
बिजिंग: सध्या अमेरिकेन चीनवर 145% कर लागू केला आहे. दरम्यान चीनने टॅरिफ युद्धातून माघार घेत ट्रम्प यांच्याकडे मोठी विनंती केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील लादलेल्या टॅरिफमुळे दोन्ही देशात मोठे व्यापार युद्ध सुरु झाले होते. सुरुवातील ट्रम्प यांनी चीनवर 34% रेसिप्रोकल टॅक्स लागू केला होता. याच्या प्रत्युत्तरात चीनने देखील अमेरिकेवर तितकाच कर लागू केला.यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसमोर वाटाघाटीचा प्रस्ताव मांडला होता. परंतु चीनने कोणतीही चर्चा करण्यास नकार दिला. यामुळे ट्रम्प यांनी पुन्हा संतप्त होत चीनवर पुन्हा 104% कर आकरला.
हे युद्ध इथेच थांबले नाही. हा घात-प्रतिघात इतका वाढला की, अमेरिकेने चीनवर 145% कर लागू केला. महासत्ता असणारे दोन्ही देश व्यापाराच्या मैदानात आमने सामने होते. परंतु यावेळी चीनने माघार घेत, अमेरिकेसमोर टॅरिफ पूर्णपण रद्द करण्याची विनंती केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (13 एप्रिल 2025) चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात चीनने अमेरिकेसमोर मोठी मागणी केली आहे. या निवदनात म्हटले आहे की, “आम्ही ट्रम्प यांना आवाहन करतो की, त्यांची आपल्या चुकांची दखल घ्यावी आणि योग्य ते पाऊल उचलावे. अमेरिकेने परस्पर टॅक्स रद्द करावा.
ट्रम्प यांनी चीनकडून ही मागणी करण्यापूर्वी, स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर टॅरिफ सवलतीची घोषणा केली होती. ही चीनला काहीसा दिलासा देणारी ठरली.
दरम्यान चीनने आपल्या निवेदनात ट्रम्प यांना टोला लगावत असेही म्हटले आहे की “वाघाच्या गळ्यात बांधलेली घंटी तोच काढू शकतो, ज्याने ती बांधली आहे”. या विधानातून चीनने स्पष्ट केले आहे की, टॅरिफ वॉर सुरू करण्यामागे ट्रम्प प्रशासन जबाबदार आहे, आणि याचे निराकरणही त्यांनीच करावे.
सध्या चीन काही विशिष्ट इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर टॅरिफ सवलतीच्या निर्णयाचा आढावा घेत आहे. कारण अमेरिकेच्या 90 दिवसांच्या टॅरिफ स्थगिती दिली असूनही या निर्णयानंतर बहुतेक चिनी वस्तूंवर 145 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लागू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, शुक्रवारी (11 एप्रिल) चीनने अमेरिकन वस्तूंवरील टॅरिफ 84 टक्क्यांवरून 125 टक्क्यांपर्यंत वाढवला होता. याच प्रत्युत्तरात अमेरिकेनेही चिनी उत्पादनांवर टॅरिफ वाढवून 145% टक्के केले.
चीनने याशिवाय इतर देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे, यामुळे ट्रम्प यांच्या एकतर्फी धोरणांचा आणि आर्थिक दबावाचा सामना करता येईल. त्यांनी इतर भागीदार देशांसोबत नव्या व्यापार संधी शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.