
फोटो सौजन्य AI
आणि अमेरिकेला आव्हान देत असल्याने या दोन ताकदवान देशांनी एकत्र येऊन विविध मुद्द्यांवर बैठक घेणे ही जागतिक राजकारणात महत्वाची गोष्ट आहे . अशातच टॅरिफ युद्धाच्या वेळीही अमेरिकेच्या टॅरिफवर तेवढाच टॅरिफ चीनने लावला होता .त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध गरम झाले होते . आणि याच टॅरिफ युद्धावर या बैठकीत टॅरिफ युद्धाला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
सध्या तरी जगात अमेरिकेपेक्षा सगळ्यात जास्त रेअर अर्थ हे चीनकडे आहेत . अमेरिका ग्रीनलँडच्या मागे रेअर अर्थ साठी लागला असून अजूनतरी त्याला ग्रीनलँड मिळवणे शक्य झाले नाही . यामुळे टॅरिफ युद्धात अमेरिकेला चीनसमोर माघार घ्यावी लागली . आणि याचाच दुसरा प्रत्यय जीनपिंग आणि ट्रम्प यांच्या अमेरिकेतील भेटीमध्ये दिसून आला आहे .
चीन आणि अमेरिकेने दोन्ही बाजूने सुमारे ३० अब्ज डॉलरच्या वस्तूंवरील आयात कमी करण्याच्या व्यवस्थेवर सहमती दर्शवली आहे . हा करार प्रामुख्याने गैर – संवेदनशील वस्तूंशी संबंधित आहे . दोन्ही देशांच्या व्यापार पथकांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
याचा उद्देश गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या अमेरिका चीन टॅरिफ संघर्षातील तणाव कमी करणे आणि द्विपक्षीय व्यापारासाठी अधिक स्थिर वातावरण तयार करणे हा आहे .
दोन्ही देशांनी कृत्रिम बुद्दीमत्तेसोबत स्वतंत्र संवाद यंत्रणा सुरु करण्याचे मान्य केले आहे . या चर्चेत AI चे फायदे ,धोके,सुरक्षा आणि गैरवापर यावर चर्चा होणार आहार . तसेच AI शी संबंधित गंभीर घटनांसाठी दोन्ही देशांमध्ये संवादाचे माध्यम तयार करण्याचीही योजना आहे .
पुढील AI संवाद नोव्हेंबर २०२६ मध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले आहे . शी जिनपिंग यांनी चीन आणि अमेरिका AI क्षेत्रात स्पर्धक असले तरी AI च्या जोखमी कमी करण्यासाठी सहकार्य आणि संवादाची गरज असल्याचे म्हंटले आहे . त्यांनी AI वर मानवी नियंत्रण कायम राहावे आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर टाळण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र काम करावे ,असे सांगितले आहे .
हि सहमती अशा वेळी झाली आहे . जेव्हा अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार , तंत्रज्ञान ,AI आणि इतर धोरणात्मक मुद्यांवर स्पर्धा सुरु आहे . त्यामुळे ३० अब्ज डॉलरची शुल्क कपात आणि AI संवादाची सुरवात ही दोन्ही देशांमधील संबंध व्यवस्थापित करण्यासाठी झालेली महत्वाची पावले आहेत . मात्र या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती आणि कशी होते . हे पुढील काळात स्पष्ट होईल .