Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nandurbar News : ‘काळजी करू नका,आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’; मंत्री आदिती तटकरे यांची बालिकाश्रमातील मुलींना ग्वाही

Nandurbar News : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नंदुरबारच्या रुखमाबाई बालिकाश्रमातील मुलींशी संवाद साधत शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शासन मदतीला असल्याची ग्वाही दिली. दरम्यान, आचल वसावे हिला ‘एक दिवसाची जिल्हाधिकारी’ होण्याची संधी मिळाली.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 13, 2026 | 08:22 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • शिक्षण, आरोग्य आणि सुविधांची घेतली माहिती
  • स्पर्धा परीक्षांची तयारी करा; प्रशासकीय सेवेत जाण्याचे आवाहन
  • ‘एक दिवसाची जिल्हाधिकारी’ उपक्रमातून आचल वसावेला संधी
Nandurbar News : मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता यांना प्राधान्य देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिला. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील रुखमाबाई बालिकाश्रमाला भेट देत त्यांनी तेथील मुलींशी संवाद साधला.

शिक्षण किंवा भविष्यातील वाटचालीत कोणत्याही अडचणी आल्यास घाबरू नका, शासन आणि प्रशासन तुमच्या मदतीसाठी सदैव तयार आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मुलींच्या समस्या जाणून घेत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

शिक्षण, आरोग्य आणि सुविधांची घेतली माहिती

मंत्री आदिती तटकरे यांनी रुखमाबाई बालिकाश्रमातील मुलींशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी मुलींच्या शिक्षणाची, आरोग्याची, निवासाची आणि भोजन व्यवस्थेची माहिती घेतली. बालगृहात उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा घेत मुलींच्या अडचणीही जाणून घेतल्या.

मुलींनी कोणताही संकोच न बाळगता आपल्या समस्या आणि सूचना मांडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. बालगृहांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, पोषक आहार, आरोग्य सुविधा आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी स्थानिक प्रशासनाने विशेष लक्ष देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

POCSO Campaign 2026 : बाल लैंगिक शोषण करणाऱ्यांना थेट इशारा ! मुंबई मेट्रोच्या डब्यांमध्ये झळकले पॉक्सो जनजागृतीचे पोस्टर्स

स्पर्धा परीक्षांची तयारी करा; प्रशासकीय सेवेत जाण्याचे आवाहन

बालिकाश्रमातील मुलींनी परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घ्यावे आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन तटकरे यांनी केले. स्वतःमधील क्षमता ओळखून आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला. शिक्षणासोबत क्रीडा आणि इतर क्षेत्रांतील संधींचा लाभ घेण्याचे त्यांनी सांगितले.

मुली भविष्यात विविध प्रशासकीय पदांवर कार्यरत होऊन समाजाच्या विकासात योगदान देऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बालगृहातील सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी प्रशासन सकारात्मक असून मुलींच्या हितासाठी आवश्यक मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Mumbai News : भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला काँग्रेसचा विरोध! भाई जगतापांची निविदा रद्द करण्याची मागणी

‘एक दिवसाची जिल्हाधिकारी’ उपक्रमातून आचल वसावेला संधी

बालदिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या संकल्पनेतून ‘एक दिवसाची जिल्हाधिकारी’ हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, सोरापाडा येथील अकरावीतील विद्यार्थिनी आचल धीरज वसावे हिला जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय कामकाज समजून घेण्याची संधी मिळाली. तिने जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेतली.

भविष्यात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सनदी अधिकारी होण्याचे आपले स्वप्न असल्याचे आचलने सांगितले. मुलींमध्ये प्रशासकीय सेवेविषयी आवड निर्माण व्हावी आणि त्यांना स्पर्धा परीक्षांची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी सांगितले. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त माधवी सरदेशमुख यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Nandurbar news aditi tatkare rukhmabai balikashram girls cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 08:22 PM

Topics:  

  • Aaditi Tatkare
  • Marathi News
  • Nandurbar News

संबंधित बातम्या

Karjat News : टोरंट प्रकल्पाला परवानग्या मिळत असताना खासदार काय करीत होते? ॲड. ऋषिकेश जोशी यांचा सवाल
1

Karjat News : टोरंट प्रकल्पाला परवानग्या मिळत असताना खासदार काय करीत होते? ॲड. ऋषिकेश जोशी यांचा सवाल

World News : इराणच्या अणुप्रकल्पाबाबत चिंता वाढली; इस्फाहानमधील भूमिगत केंद्राची पाहणी करण्यास इराणचा नकार
2

World News : इराणच्या अणुप्रकल्पाबाबत चिंता वाढली; इस्फाहानमधील भूमिगत केंद्राची पाहणी करण्यास इराणचा नकार

World News : युक्रेनला ड्रोन पुरवणाऱ्या जर्मन कंपनीवर सायबर हल्ला; जर्मन सैन्याने ड्रोन वापर थांबवला
3

World News : युक्रेनला ड्रोन पुरवणाऱ्या जर्मन कंपनीवर सायबर हल्ला; जर्मन सैन्याने ड्रोन वापर थांबवला

Nagpur News :स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची १० कोटींची बचत; दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैसे सवलत
4

Nagpur News :स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची १० कोटींची बचत; दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैसे सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.